वराहमिहिर

        ग्रहगोलांचा अभ्यास वैज्ञानिकदृष्टीने करणारे ५ व्या शतकातील एक थोर भारतीय शास्त्रज्ञ. खगोलशास्त्र आणि फलज्योतिषविज्ञान या विषयांचा आचार्य वराहमिहिर यांचा गाढा अभ्यास होता. गॅलिलिओच्या अगोदर फार पूर्वी त्यांनी पृथ्वीचा आकार चेंडूसारखा आहे, हे आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय विद्वत सभांमधून प्रात्यक्षिकांद्वारे सिद्ध केले होते. त्यांची निरीक्षणे पुढीलप्रमाणे आहेत –

  • जगातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे ऋतू असतात. पृथ्वी सपाट असती, तर सगळीकडे एकच ऋतू असता.
  • सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची वेळ सर्व ठिकाणी एक (सारखी) नसते.
  • उत्तरेकडील भागात सर्वसाधारण जास्त थंडावा असतो.
  • समुद्रतीरावरून पाहिले असता जाणार्‍या नौकेचे शीड दिसेनासे होते. येणार्‍या नौकेचे शीड प्रथम दिसते.

वरील निरीक्षणावरून त्याने ‘पृथ्वीचा आकार गोल आहे’ असा निष्कर्ष काढला आणि त्यांच्या निष्कर्षावर तत्कालीन भारतीय धर्मगुरूंनी तसेच मगध राजानेदेखील पूर्ण पाठिंबा दर्शवला होता.

‘भूकंप ढग’ या संदर्भात शास्त्रज्ञांनी हल्ली केलेल्या संशोधनापूर्वी शेकडो वर्षे वराहमिहिर यांनी त्याबाबत सखोल संशोधन केलेले असणे

          ‘वराहमिहिर यांनीदेखील त्याच्या ‘बृहद्संहिता’ या ग्रंथात अशा प्रकारच्या विचित्र ढगांचा निर्देश केला आहे. भूकंपाच्या लक्षणांच्या विषयी सांगतांना, ‘विराट विश्व व आकाशातील ग्रह आणि नक्षत्रे यांच्या प्रभावामुळे भूकंप होतात,’ असे वराहमिहिराने सांगितले. भूमीखालील जल, सागराच्या तळाचे जल, त्यांच्यावर ग्रह-नक्षत्रे यांचा प्रभाव पडून विचित्र असे निर्माण होणारे मेघ आणि भूकंपाआधीची पशूंची विलक्षण (Abnormal) वागणूक याविषयीही विस्तृत वर्णन वराहमिहिर यांनी आपल्या अध्यायात केले आहे.

         `भूकंपाच्या पूर्वी एक आठवडा असे ढग दिसतात’, असे त्यांनी सांगितले आहे. ते पुढे सांगतात, `भूकंपाच्या आधी ८ दिवस दिसणारे हे भूकंप-ढग (Quake Clouds) हत्तीसारखे प्रचंड आकाराचे असतात. ते निळ्या कमळासारखे दिसतात. त्यांचे गमन अत्यंत मंदगतीने व सुखावह असते. मधून मधून त्यांतून वीजा चमकतात व हळूहळू जलिंसचन होते. अशा प्रकारचे ढग दिसताच जो भूकंप होतो, तो सामान्यपणे समुद्र व नदी किनार्‍यांवर होतो आणि नंतर प्रचंड पाऊस पडतो.’ वराहमिहिर यांनी त्याच्या बृहद्संहिता ग्रंथात भूकंपाची कारणे, भूकंपाचा दिवस व वेळदेखील सांगितली आहे.’

संदर्भ : ‘ऋषिस्मृति – २, आचार्य वराहमिहिर’- प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी