अरबस्तानापर्यंत साम्राज्य असलेला उदार आणि जनहितकारी राजा विक्रमादित्य !

उज्जैन येथे सहाव्या शतकात विक्रमादित्य राजा होऊन गेला. त्याच्या राज्यात धर्मशास्त्राच्या आधारे सर्वत्र उत्तम व्यवस्था होती. आदर्श राजसत्ता चालविण्यासाठी त्याच्या दरबारी ९ प्रमुख रत्ने होत.

विक्रमादित्याचे वडील महेन्द्रदत्त, आई सौम्यदर्शना आणि भाऊ भर्तृहरि होता. विक्रमादित्याने अरबस्थानातील शकांना पराजित करून तो भाग आपल्या राज्यात सम्मिलित केला. या विजयाचे ‘बरहाम बिन सोई’ याने आपल्या कवितेत सुंदर रीतीने वर्णन केले आहे. विक्रमादित्याच्या ६० वर्षांच्या काळातील २५ वर्षे युद्धात गेली. सहिष्णुतेचे प्रतीक असलेला हा राजा उदार आणि सदैव जनहित कार्य करणारा शासक होता. तो शैव धर्माचा असूनसुद्धा सर्व धर्मांना समान दृष्टीने पहात होता. त्याच्या नवरत्न दरबारात धन्वंतरी, क्षपणक, अमरसिंह, शंकू, वेताळ भट्ट,खटकरपारा, कालिदास, वराहमिहीर आणि वररुचि हे होते.

राजसभेतील ९ रत्ने

१.कालिदास: ‘शाकुंतल’ या महान ग्रंथाचा रचयिता, महाकवी, नाटककार आणि भारतातील प्रमुख संस्कृत भाषापंडित

२.अमरसिंह: ‘संस्कृत अमरकोषा’चा निर्माता

३. क्षपणक : ज्योतिषशास्त्रात ख्याती अर्जित केलेला कृष्णज्योतिषी

४. धन्वंतरी : एका रोगावर अनेक औषधी आणि उत्तम प्रकारची रोगचिकित्सा यांत प्रवीण अन् वैद्यकशास्त्रात निपुण असा वैद्य

५. वररुची : उत्कृष्ट व्याकरणकार आणि भाषाशास्त्रज्ञ

६. वराहमिहीर : जगन्मान्य ‘बृहतसंहिता’ या ग्रंथाचा लेखक आणि होरा अन् सिद्धांत यांत प्रवीण असा ज्योतिषशास्त्र-तज्ञ

७.खटकरपारा: शिल्पकला आणि वास्तूशास्त्र यांचा तज्ञ

८. शंकू : भू-मापनशास्त्र प्रवीण (भू-मापनात आजही हे नाव प्रसिद्ध आहे.)

९.वेताळ भट्ट: मंत्रशास्त्र, जारण, मारण आणि उच्चाटण यांत प्रवीण

परकीय आक्रमणे नसतांना भारतीय राजसत्ता सर्वार्थाने परिपूर्ण होती आणि देशात सर्वत्र शांतता अन् सुबत्ता नांदत होती, याचे हे उदाहरण आहे.

– प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला.

Leave a Comment