अहंकार आणि गुरुद्रोह यांमुळे रसातळाला गेलेला बैजू बावरा यांचा शिष्य गोपाल !
बैजू बावरा म्हणाला, हे गुणचोर, गुरुद्रोही गोपाल नायक ! जर तुझ्याकडे एखादी विद्या, सामर्थ्य किंवा आपली योग्यता असेल, तर या दगडाला वितळवून माझा तंबोरा काढून दाखव. ज्याने अहंकारामुळे कित्येकांचा जीव घेतला होता आणि गुरुद्रोह केला होता, त्याच्या रागात आता दम होताच कुठे ? गोपालने गीत गाता-गाता कित्येकदा पाण्याचे घोट घशाखाली उतरवले, सर्व प्रयत्न केले; पण सर्व निष्फळ राहिले. तो गाता-गाता थकून गेला, ना दगड वितळला कि तंबोरा निघाला. शेवटी तो पराभूत झाला. Read more »