सृष्टीची निर्मिती

अशा भगवंताजवळ सृष्टीच्या निर्मितीचें कार्य कसें चालतें तें ब्रह्मदेवाला दिसलें श्रेष्ठ सिद्धासनीं आरोहण । रमासमवेत रमारमण । तेथें सृष्टीचे कार्यकारण । ब्रह्मा आपण स्वयें देखे ॥५१॥ करावया सृष्टिसर्जन । ब्रह्मा पुढें देखे नारायण । सृष्टीचें कार्यकारण । आपुलें आपण निजशक्ति दावी ॥५२॥ चारी पांच आणि सोळा । ऐसा पंचविसांचा मेळा । आज्ञाधारक हरिजवळा । विधाता … Read more

पार्षदगण

वैकुंठींचे मुख्य पार्षदगण वैकुंठी हरिभक्त पूर्ण । ब्रह्मा देखताहे आपण । त्यांची नांवें सांगूंशके कोण । मुख्य पार्षदगण ते ऐका ॥३३॥ नंद सुनंद मुख्यत्वें पूर्ण । बल आणि प्रबलार्हण । धाता विधाता निकटधन जय विजय जाण द्वारपाळ ॥३४॥ चंड प्रचंड सुशीळ । भद्र सुभद्र पुण्यशीळ । कुमुद कुमुदाक्ष सकळ । हा पार्षदमेळ श्रीहरीचा ॥३५॥ इहीं … Read more

श्रीविष्णूची स्तुति

नमो आदिपुरुषा अव्यक्ता । सच्चिदानंदा गुणातीता । विश्वात्मका सदोदिता । नमो अच्युता अव्यया तुज ॥१५॥ तूं योगीजनां अगोचर । वेदशास्त्रां नकळे पार । भक्तजनासी प्रियकर । दिधला चरणादर निजसेवे त्वां ॥१६॥ हरिचरणसेवेपरता । ठाव नाही परमार्था । मिथ्या मोक्षसायुज्यता । ह्नणती लाता हरिभक्त पैं ॥१७॥ हाती जोडल्या हरिचरण । भक्तां नाही जन्ममरण । यापरता परमार्थ … Read more

चतुःश्लोकी भागवत – हरिभक्तांचे स्वरुप

हरिभक्त शोभायमान । हरिचरणी आवडी गहन । नित्य नवीन प्रेमें हरिदर्शन । तेणें हरिसमान स्वयें झाले ॥७७॥ कीटकी भयें ध्यातां भृंगीसी । तद्रूपता बाणली तियेसी । मां जे जीवें भावें भजती हरीसी । ते हरिपासीं स्वयेचीं येंती ॥७८॥ भजनें पावले हरिरुपासी । ह्नणोनी झाले वैकुंठवासी । यालाईं त्यांच्या स्वरुपासी । परीक्षितीपासी शुक सांगे ॥७९॥ वैकुंठवासी … Read more

चतुःश्लोकी भागवत – वैकुंठ स्थिति

ज्या लोकाची निजस्थिती । शुद्धसत्वजन वर्तती । रजतममिश्रित गती । ज्या लोकाप्रती असेना ॥६९॥ नवल ते लोकींचा ठसा । बाल्यतारुण्यवृद्धदशा । नाहीं तेथें तिन्ही वयसा । क्षय आहे कैसा हें नेणिजे ॥७०॥ तेथें समूळ माया नाहीं । मा कलिविक्रम कैंचा ते ठायी । मोहलोभादिद्वेष पाही । मायेच्याठाई वर्तती ॥७१॥ उगमीं वाकडी लागे नेटें । तेणें … Read more

चतुःश्लोकी भागवत – वैकुंठमहिमा

तें वैकुंठ जाण साचार । सर्व लोकां वरिष्ठवर । त्याहून परतें नाही पर । यालागीं परात्पर ह्नणती त्यातें ॥६०॥ जेथें परमात्मा नांदे स्वयंज्योती । त्या वैकुंठाची वैभवस्थिती । वर्णितां खुंटली परेची गती । यालागी ह्नणती वैकुंठ लोक ॥६१॥ ज्या लोकाचिये ठायी । क्लेशमात्र प्राणियांसी नाहीं । मोहाची वार्ता कांहीं । कोणी स्वप्नीही नदेखती ॥६२॥ नित्य … Read more

चतुःश्लोकी भागवत – तप याचा अर्थ

स्वयंचिंतनांतून ‘ तप ’ याचा अर्थ त्याला स्फुरला ह्नणे दंतौष्ठपुटेंवीण । नव्हे या अक्षराचें उच्चारण । हो कां येथें बोलिला कोण । देहधारी आन दिसेना ॥९९॥ तप या नांवाची काय स्थिती । तपें पाविजे कोण प्राप्ती । ऐसें विधाता निजचितीं । तपाची स्थिति गति विवंचीत ॥१००॥ तप ह्नणिजे परमसाधन । येणें साधे निजात्मधन । ऐकोनी … Read more

श्री गजानन विजय – अध्याय १७

॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला । जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥ हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर । तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥२॥ प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं । रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥३॥ दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर । नेत्र … Read more