श्री मनाचे श्लोक – १०१ ते १२०

जया नावडे नाम त्या यम जाची। विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची॥ म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे। मुखे बोलतां दोष जाती स्वभावें॥१०१॥ अती लीनता सर्वभावे स्वभावें। जना सज्जनालागिं संतोषवावे॥ देहे कारणीं सर्व लावीत जावें। सगूणीं अती आदरेसी भजावें॥१०२॥ हरीकीर्तनीं प्रीति रामीं धरावी। देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी॥ परद्रव्य आणीक कांता परावी। यदर्थीं मना सांडि जीवीं करावी॥१०३॥ … Read more

श्री मनाचे श्लोक – १२१ ते १४०

महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला। म्हणोनी तयाकारणे सिंह जाला॥ न ये ज्वाळ वीशाळ संनधि कोणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२१॥ कृपा भाकिता जाहला वज्रपाणी। तया कारणें वामनू चक्रपाणी॥ द्विजांकारणे भार्गवू चापपाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२२॥ अहल्येसतीलागी आरण्यपंथे। कुडावा पुढे देव बंदी तयांते॥ बळे सोडितां घाव घालीं निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥१२३॥ तये द्रौपदीकारणे लागवेगे। त्वरे धांवतो सर्व … Read more

श्री मनाचे श्लोक – १४१ ते १६०

म्हणे दास सायास त्याचे करावे। जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥ गुरू अंजनेवीण तें आकळेना। जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥ कळेना कळेना कळेना कळेना। ढळे नाढळे संशयोही ढळेना॥ गळेना गळेना अहंता गळेना। बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥ अविद्यागुणे मानवा उमजेना। भ्रमे चुकले हीत ते आकळेना॥ परीक्षेविणे बांधले दृढ नाणें। परी सत्य मिथ्या असें कोण जाणें॥१४३॥ जगी पाहतां … Read more

श्री मनाचे श्लोक – १६१ ते १८०

अहंतागुणे सर्वही दुःख होते। मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥ सुखी राहता सर्वही सूख आहे। अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥१६१॥ अहंतागुणे नीति सांडी विवेकी। अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी॥ परी अंतरी अर्वही साक्ष येते। प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते॥१६२॥ देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला। देहातीत ते हीत सांडीत गेला॥ देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥१६३॥ मनें … Read more

श्री मनाचे श्लोक – १८१ ते २०५

नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु। नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥ नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू। जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू ॥१८१॥ नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी। क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥ मुखे बोलिल्यासारिखे चालताहे। मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे ॥१८२॥ जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी। कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥ प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे। तयाचेनि योगे समाधान बाणे ॥१८३॥ … Read more

भगवंताचा धांवा

किंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा कृपा करी गा अच्युता । धांवे पावे गा भगवंता । या एकार्णवाआंतोता । होई रक्षिता मज स्वामी ॥६९॥ मी अतिशयें तुझें दीन । मजवरी कृपा करी संपूर्ण । निजभावें अनन्यशरण । मनी लोटांगण घालितसे पैं ॥७०॥ ऐसी ब्रह्मयाची ती चिंता । तत्काळ कळली भगवंता । तो अंतर्यामी जाणता । करता करविता … Read more

सृष्टिरचना

स्वरुपाची यथार्थ ओळख न झाल्यामुळें ब्रह्मदेव सृष्टिरचना करण्यास भांबावला एवं नाभिकमळीं कमलासन । बैसला केवळ अज्ञान । तंव हदयी झाली आठवण । मी येथें कोण कैचा पां ॥६१॥ मज कैचें हें कमलासन । येथें याचें मूळ तें कवण । तें पाहावया आपण । जळीं निमग्न स्वयें जाहला ॥६२॥ सहस्त्रवरुषें बुडी देतां । कमळमूळ नयेचि हाता … Read more

भगवत्प्राप्ति

कामनारहित तपानें भगवत्प्राप्ति कामनारहित निष्पाप । श्रद्धापूर्वक सद्रूप । निष्कपट करितां तप । भगवत्स्वरुप तें भेटे ॥५५॥ नकरितां भगवदभजन । ब्रह्मा होऊं न शके पावन । यालागीं तपादि साधन । स्वयें निजभजन हरी प्रेरी ॥५६॥ या ब्रह्मयाची निजस्थिती । कल्पाचिये आदिप्राप्ती । कैशी होती परीक्षिती । ते मी तुजप्रती सांगेन पां ॥५७॥ इंद्रादिदेवां पूज्य तत्त्वतां … Read more

ज्ञानप्राप्ति

भगवदभजनाशिवाय ब्रह्मदेवालासुद्धां ज्ञानप्राप्ति नाहीं न करितां भगवदभक्ती । ब्रह्मयासी नव्हे ज्ञानप्राप्ती । तेथें इतरांची कोण गती । अभजनी प्राप्ती पावावया पैं ॥५२॥ जीवाचे निरसावया अज्ञान । मुख्यत्वें असे भगवदभजन । स्वयें करिताहे चतुरानन । तेंचि निरुपण शुक सांगे ॥५३॥ केवळ चैतन्य विग्रहो । सत्यसंकल्प भगवद्देहो । त्याचे दर्शनार्थ पहाहो । तपादि उपावो हरी प्रेरी ॥५४॥

ब्रह्मदेवाची कथा

श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात आदिकल्पाचिये आदीं । एकार्णवजळामघी । ब्रह्मा झाला जडमूढबुद्धी । सृष्टिसर्जनविधि स्फुरेना ॥३२॥ यापरी केवळ अज्ञान । नाभिकमळीं कमळासन । विसरलां आपणा आपण । मी हें कोण स्फुरेना त्या ॥३३॥ यालागीं श्रीनारायण । द्यावया निजात्म शुद्ध ज्ञान । आपुली निजमूर्ती चिदधन । तिचे दर्शन देऊं पाहे ॥३४॥ श्रीनारायणाची दिव्य मूर्ती । … Read more