समाधि

समाधि म्हणजे काय ? सर्वत्र जे समसाम्यता । यानांव समाधी तत्त्वतां । परी तटस्यादि काष्ठावस्था । समाधि सर्वथा नव्हे ब्रह्मा ॥६१॥ समाधिमाजी जो तटस्थ । तो जाणावा वृत्तियुक्त । वृत्ति असतां समाधिस्थ । तें मी अनंत सत्य नमनी ॥६२॥ मूर्छित वृत्ति असतां पोटीं । समाधि ह्नणणें गोष्ट खोटी । जेथ अहं सोहं विराल्या गांठी । … Read more

मताचें सामर्थ्य

या मताचें सामर्थ्य अभिनव या मताची थोरी । मी एक विस्तारें नानापरी । परी एकपणाच्या अंगावरी । नाहीं दुसरी चीर गेली ॥४२॥ या मताचेनि महायोगें । निजले ठायीं मी जागें । जागाही निजें, निजोनि जागें । यापरी दाटुगें मत हें माझें ॥४३॥ हें मत कशानेंहि प्राप्त होत नाहीं हें मत नातुडे अष्टांग योगें । हें … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय विसावा)

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‍गुरु चित्समुद्‍रा । मुक्तमोतियांचा तुजमाजीं थारा । ज्ञानवैराग्यशुक्तिद्वारा । सभाग्य नरा तूं देशी ॥ १ ॥ तुझी खोली अमर्याद । माजीं चिद्‍रत्‍नें अतिविविध । देखोनि निजप्रबोधचांद । भरतें अगाध तुज दाटे ॥ २ ॥ उलथल्या स्वानंदभरत्यासी । गुरुआज्ञा-मर्यादा नुल्लंघिसी । स्वानंदलहरी चढोवढीसीं । तुजमाजीं अहर्निशीं उसळती ॥ … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय बाविसावा)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गु॥रु खांबसूत्री । चौर्यांरशीं लक्ष पुतळ्या यंत्रीं । नाचविशी निजतंत्रीं । प्राचीनदोरीस्वभावें ॥ १ ॥ दोरी धरिली दिसो न देशी । परी पुतळ्या स्वयें नाचविशी । नवल लाघवी कैसा होशी । अलिप्ततेंसीं सर्वदा ॥ २ ॥ तेथ जैशी ज्याची पूर्वगती । तें भूत नाचे तैशा रीतीं … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय एकविसावा)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरू वैकुंठनाथा । स्वानंदवैकुंठीं सदा वसता । तुझे ऐश्वर्य स्वभावतां । न कळे अनंता अव्यया ॥ १ ॥ तुझ्या निजबोधाचा गरुड । कर जोडूनि उभा दृढ । ज्याच्या पाखांचा झडाड । उन्मळी सुदृढ भववृक्षा ॥ २ ॥ तुझें स्वानुभवैकचक्र । लखलखित तेजाकार । द्वैतदळणीं सतेजधार । … Read more

भागवत सार

करी जो सृष्टीची रचना । तया न कळे ब्रह्मज्ञाना । तो श्रीनारायणा । शरण रिघे ॥१॥ न कळे ब्रह्मज्ञान । म्हणोनी धरितसें चरण । नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रह्मा ॥धृ. ॥२॥ ब्रह्मा अत्रीतें सांगत । ब्रह्मज्ञान हदयीं भरित । अत्रि पूर्ण कृपें स्थित । दत्तात्रया सांगतसे ॥३॥ दत्तात्रय कृपें पूर्ण । जनार्दनी पूर्ण ज्ञान । … Read more

गीताई – (अध्याय १८)

अर्जुन म्हणाला संन्यासाचे कसे तत्त्व त्यागाचे हि कसे असे । मी जाणू इच्छितो कृष्णा सांगावे वेगवेगळे ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणाले सोडणे काम्य कर्मे तो ज्ञाते संन्यास जाणती । फळ सर्व चि कर्माचे सोडणे त्याग बोलती ॥ २ ॥ दोष-रूप चि ही कर्मे सोडावी म्हणती कुणी । न सोडावी चि म्हणती यज्ञ-दान-तपे कुणी ॥ … Read more

गीताई – (अध्याय १७)

अर्जुन म्हणाला जे शास्त्र-मार्ग सोडूनि श्रद्धा-पूर्वक पूजिती । त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस ॥ १ ॥ श्री भगवान् म्हणाले तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी । ऐक सात्त्विक ती होय तशी राजस तामस ॥ २ ॥ जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे । श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसा चि तो … Read more