चतुःश्लोकी भागवत – चित्तशुद्धी

चित्तशुद्धीशिवाय हरीची भेट नाहीं त्यासी द्यावी आपुली भेटी । कृपा उपजली हरीचे पोटी । नव्हती चित्तशुद्धि गोमटी । ह्नणुनी हरिरुपी दृष्टी रिघेना ॥७९॥ जरी ह्नणाल बहुत दूरी । इंद्रियां तो व्यापारी । निजज्ञानें नांदे श्रीहरी । घडे कैशापरी प्राणिया प्राप्ती ॥८०॥ इंद्रियव्यापार ज्ञानेंहोती । तें ज्ञान वेंचलें विषयासक्तीं । या लागीं हदयस्थाची प्राप्ती । प्राणी … Read more

चतुःश्लोकी भागवत – हरिकृपा

हरिकृपेशिवाय अनुताप नाहीं जंव हरी हदयीं कृपा न करी । तंव अनुताप नुपजे शरीरीं । त्याची पूर्ण कृपा ज्यावरी । तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥ विवेकाविण वैराग्य उठी । तें अपायीं घाली कडेकपाटीं । कीं वैराग्यविण विवेक उठी । तो जन्मला पोटी नपुंसक ॥७३॥ विवेकाविण वैराग्य आंधळे । वैराग्याविण विवेक पांगुळें । हें एकएका अवेगळें । … Read more

चतुःश्लोकी भागवत – भगवंताचा धांवा

किंकर्तव्यमूढ ब्रह्मदेवाचा भगवंताचा धांवा कृपा करी गा अच्युता । धांवे पावे गा भगवंता । या एकार्णवाआंतोता । होई रक्षिता मज स्वामी ॥६९॥ मी अतिशयें तुझें दीन । मजवरी कृपा करी संपूर्ण । निजभावें अनन्यशरण । मनी लोटांगण घालितसे पैं ॥७०॥ ऐसी ब्रह्मयाची ती चिंता । तत्काळ कळली भगवंता । तो अंतर्यामी जाणता । करता करविता … Read more

श्री गजानन विजय – अध्याय ११

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे ओंकाररुपा पशुपती । हे भवानीवरा दक्षिणामूर्ति । ब्रह्मांडांत जितुक्या विभूति । तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥ तुझें रुप जें निराकार । जेणें हें व्यापक चराचर । जें सर्वस्वीं आधार । अविद्या माया प्रकृतीला ॥२॥ तें स्वरुप जाणावया । अशक्य आहे देवराया । म्हणून तूं करण्या दया । सगुण रुपें धरलींस … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय पहिला)

श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यैः नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्री दत्तात्रेयाय नमः ॥ श्री रुक्मिणिपांडुरंगाभ्यां नमः ॥ संतोषं च गुरुं वन्दे परं संवितदायकं । शांतं सिंहासनारूढं आनंदामृतभोगदम् ॥ १ ॥ भक्त्या भागवतं भावं अभावं काव्यपाठतः । पठनाद् पदव्युत्पत्तिर्ज्ञानप्राप्तिस्तु भक्तितः ॥ २ ॥ ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भव अभवभावना । न देखोनि मीतूंपणा … Read more

श्री गजानन विजय – अध्याय १२

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति । माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥ तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता । विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥२॥ तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी । आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥३॥ माझ्या मनींची अवघी चिंता … Read more

श्री एकनाथी भागवत – (अध्याय दहावा)

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‍गुरु धन्वंतरी । ज्याची दृष्टीचि निरुज करी । त्यावांचोनि संसारीं । भवरोगु दुरी न करवे ॥१॥ ज्या भवरोगाचेनि दर्पें । फुंफात तापलीं त्रिविधतापें । 'मी माझे' येणें संकल्पें । वाग्जल्पें जल्पती ॥२॥ पडिलीं द्वैताचिया दुखणा । तोंडींची चवी गेली जाणा । मुखा आला कडवटपणा । कटु वचना … Read more