श्री मनाचे श्लोक – ६१ ते ८०
उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे। तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥ जनी सज्जनी वाद हा वाढवावा। पुढें मागता शोक जीवीं धरावा॥६१॥ निजध्यास तो सर्व तुटोनि गेला। बळें अंतरीं शोक संताप ठेला॥ सुखानंद आनंद भेदें बुडाला। मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥६२॥ घरी कामधेनू पुढें ताक मागें। हरीबोध सांडोनि वेवाद लागे॥ करी सार चिंतामणी काचखंडे। तया मागतां देत आहे … Read more