एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात !
युवकांना राष्ट्र धर्माच्या कार्यासाठी कृतिशील करणारी मोहीम !
गड-दुर्ग हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून, ते आपल्या मावळ्यांचे शौर्य, धैर्य आणि कुशल नेतृत्व यांची प्रतीके आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी या किल्ल्यांच्या माध्यमातून स्वराज्याचे स्वप्न साकार केले; परंतु आज, या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि सांस्कृतिक वारसा तरुण पिढीपर्यंत पोचत नाही. यासाठीच हिंदु जनजागृती समितीने शिवरायांच्या पराक्रमांची आठवण करून देणार्या गड-दुर्गांच्या सेवेसाठी ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम चालू केली आहे.
मोहिमेचा कालावधी
दिनांकानुसार शिवजयंती (१९ फेब्रुवारी) ते तिथीनुसार शिवजयंती (फाल्गुन कृष्ण तृतीया)
विजयादशमी ते नोव्हेंबर महिन्याचा शेवट
मोहिमेचे स्थळ
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील गड-दुर्ग
मोहिमेचा उद्देश
शौर्य निर्माण करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील होणे
गडांचे महत्त्व जाणून त्यांच्या संवर्धनासाठी कृतीशील होणे
शिवरायांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी कृतीशील होणे
मोहिमेचे स्वरूप
गड-दुर्ग स्वच्छता
गड-दुर्गांचे सौंदर्य टिकवण्यासाठी त्या परिसरात पडलेला कचरा, प्लास्टिक, आणि अन्य घाण काढून स्वच्छता मोहीम राबवली जाईल.
गड भ्रमंती आणि गडांचा अभ्यास
गडांची रचना, गडांवरील वास्तुशास्त्र, तोफखाना, गडांवर स्थापित मंदिरे तसेच अन्य संरचनांबद्दल सविस्तर माहिती आणि इतिहास सांगितला जाईल.
सामूहिक नामजप
गड-दुर्गांवर असलेल्या मंदिरासमोर किंवा गडाच्या एका बाजूला बसून सामूहिक नामजप आणि प्रार्थना केली जाईल.
शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यास
शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर चर्चा, ऐतिहासिक सत्रे आणि संवाद आयोजित केले जाईल.
शौर्य प्रशिक्षण
शौर्यजागृती साठी लाठी-काठी, कराटे आणि अन्य स्वसंरक्षण तंत्रांवर आधारित प्रायोगिक सत्रांचे आयोजन केले जाईल.
सामूहिक प्रतिज्ञा
गड-दुर्गांच्या सान्निध्यात तरुणांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटिबद्ध होण्यासाठी प्रतिज्ञा केली जाईल.
युवकांचे अभिप्राय
फोटो गॅलरी
गड-दुर्गांची सध्यस्थिती
बहुतेक लोक गडदुर्गांवर केवळ पिकनिक स्पॉट म्हणून मौज-मजा करण्यासाठी जातात
गडांच्या परिसरात प्लास्टिक, कचरा आणि इतर घाण टाकण्याचे प्रमाण वाढले आहे
गडांचा मूळ ढाचा आणि ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत
अनेक गडांवर शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित माहिती देणारे फलकही लावलेले नाहीत
गडांवर अनधिकृत बांधकामे, वसाहती किंवा दर्गे-मजार इत्यादी बांधण्यात आले आहेत
गडांवरील पाण्याच्या टाक्या आणि तलाव यांची स्वच्छता अन् देखभाल होत नाही
तुम्ही काय करू शकता ?
किल्ल्यांचे संरक्षण आणि जतन हे केवळ प्रशासनाचे काम नसून ते प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे. आपण केलेल्या लहानसहान प्रयत्नांमुळे गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जतन होऊ शकतो.