गाय ही हिंदूंकरता अत्यंत पवित्र आहे. गोरक्षणाकरता हिंदु सहज प्राण देतो. आजही रस्त्याने जातांना गाय दिसली, तर नकळत अगदी सहज भक्तीभावाने गायीला तो स्पर्श करतो, वंदन करतो. मात्र हिंदूंची यच्चयावत श्रद्धास्थाने नष्ट करण्याचा सरकारने विडाच उचलला आहे. हिंदुस्थानात सहस्त्राे कत्तलखाने असून या कत्तलखान्यांतून हिंदूंच्या श्रद्धांची कत्तल चालू आहे.
गोहत्येचा इतिहास
१८५७ : ‘गाईच्या चरबीचा वापर केलेली काडतुसे वापरली; म्हणून हिंदुस्थानी सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले.
१८५७ चा उठाव किंवा क्रांतीयुद्धाच्या वेळी काडतुसाला गायीची चरबी लावल्याने काडतुसाचे बंद दाताने काढावे लागतात, ही वार्ता सैनिकांत
पसरल्यावर ‘इंग्रज आपणाला बाटविणार असून धर्म बुडवत आहेत’, या श्रद्धेने सर्व सैनिक पेटून उठले आणि त्यांनी ब्रिटिशांना ‘देमाय धरणी ठाय’ केले. १८५७ च्या युद्धाआधी ४ हिंदी शिपायांमागे १ इंग्रज शिपाई असे प्रमाण होते; परंतु ब्रिटिशांना इतकी धास्ती वाटू लागली की, त्यांचा हिंदी शिपायांवरील विश्वासच उडून गेला आणि त्यांनी दोन हिंदी शिपायांमागे १ इंग्रजी शिपाई असे प्रमाण ठेवले.
गोवध बंदी चळवळीने पुन्हा एकदा १८८० ते १८९० या काळात असंतोषाचा भडका उडाला. हिंदू भयंकर प्रक्षुब्ध झाले. उत्तर, मध्य आणि
पश्चिम भारतात लोकक्षोभाला आवर घालणे ब्रिटिशांना जमत नव्हते.
१८५७ – ५८ या उठावाच्या वेळी लोकक्षोभाची जी काही तीव्रता व स्फोटकता होती, त्यापेक्षाही अधिक ज्वाळा उफाळत होत्या. ब्रिटिशांच्या
भारतातील मंत्र्यांनाच धडकी भरली. त्यांनी महाराणी व्हिक्टोरियाला कळविले, `ही चळवळ वस्तुतः ब्रिटिशांच्या विरोधात आहे. धर्मांध
समाजानेही हे ओळखले आहे. हिंदूंना गोहत्या नको असेल, तर आपणही गाय मारायची नाही’, असे मुसलमानांनी जाहीर सभांमधून घोषित केले.
(‘India : The Transfer of Power’ या तिसर्या खंडात हा सर्व वृत्तांत विस्ताराने दिला आहे.)
मुसलमानांना हिंदूंविरुद्ध फोडल्याशिवाय ब्रिटिशांना हिंदुस्थानावर राज्य करता येणार नाही. आताच दोन लाखांच्या जवळपास खडी इंग्रज फौज आहे. इतका खर्च व मनुष्यबळ आपल्याला हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी उपयोगात आणणे असंभव आहे. हिंदुस्थान सोडून आपल्याला जावे लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे त्यांनी ओळखले. हिंदु समाज आणि संस्कृती ही रानटी असून इंग्रजी संस्कृतीच एकमेव हिंदूंची तारणहार आहे. गाय हा पशू असून रानटी हिंदू गायीलाच ‘देव’ मानतात.
राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक यांना हाताशी धरून हिंदु समाज व संस्कृती यांचा कणा (गाय) मोडण्यास इंग्रजांनी प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी मुसलमानांना पेटविले. त्यांनी गोहत्या चालू केली. ब्रिटिशांना राज्य करण्यासाठी मुसलमानांचा हुकुमी पत्ता मिळाला. पुढे एका नेत्याने ब्रिटिशांना पाठिंबा देऊन दलित समाजाचा दुसरा हुकुमी पत्ता मिळवला आणि हिंदुस्थानवरची आपली पकड घट्ट केली.
आज दुर्दैवाने आम्ही ‘गाय’ हा हिंहदुस्थानचा कणाच मोडून टाकला. आता पुरुषार्थहीन, क्लिंब असा हिंदु समाज किडा, मुंगीसारखा न जगला तर नवलच. Civil Disobedience and Indian Tradition या धर्म पाल यांच्या ग्रंथात वरील विषयाची पुराव्यानिशी माहिती आहे. (`गाय न कटे’ खंड २ या अप्रकाशित ग्रंथामधून)’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साप्ताहिक सनातन चिंतन, अंक ४४)
सध्याची स्थिती
१. १९४८ मध्ये भारताची राज्यघटना अमलात आली. संपूर्ण हिंदुस्थानात गोहत्या बंदी करावी, असे `कलम’ आहे. आजवर गोहत्या बंदी झाली नाही.
२. महाराष्ट्र शासनाने विधीमंडळाने १९९५ मध्ये गोवध बंदीचा कायदा संमत केला आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीकरिता पाठवला. २० वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये कायदा संमत झाला.
३. केंद्र सरकारने गोहत्या बंदीसंबंधी काहीही केले नाही. केंद्र आणि राज्य शासन गोहत्या बंदीचा कायदा करण्याला नाखूष आहेत. इथे धर्मांधांचे तुष्टीकरण तर आहेच, शिवाय केंद्र आणि राज्य शासनाला गोमांसापासून प्रचंड पैसा मिळतो. प्रचंड प्रमाणात डॉलर्स, युरो, रियाल, दिनार अशा स्वरूपात धन प्राप्त होते. शासनाला केवळ पैसा हवा आहे. हिंदूंचे काही सोयरसुतक नाही.
४. मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांनी गोहत्या बंदी कायदा केला. तिथेही गोहत्या होतेच. हिंदुस्थानच्या अनेक राज्यांत गोवध बंदीचा कायदा असूनही गोवध सर्रास चालू आहे. तेव्हा गोवध बंदी नसलेल्या केरळ, पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील अनेक राज्यांत गोहननाच्या संदर्भात काय सांगावे ?
५. ज्या राज्यात गोवध बंदी आहे, त्या राज्यातून धर्मांध जिथे बंदी नाही, त्या राज्यात ट्रक भरभरून गायी आणतात. तिथे गायींच्या कत्तली करतात. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सहदााो गायी आणतात आणि अन्य नगरातील मोठी गावे, मुंबईतील धर्मांध बहुल भागात कत्तली करतात. नागपूरला एका भागात उघड उघड घराघरांतून धर्मांध गोहत्या करतात. कत्तलखान्याच्या व्यतिरिक्त नागपूर, दिल्ली, पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, सातारा अशा मोठ्या शहरांतून आणि ग्रामीण भागांतून धर्मांधबहुल स्थानांतून घराघरातून मोठ्या प्रमाणावर उघड उघड कत्तल होते.
६. हैद्राबादचा कत्तलखाना मुंबईजवळील देवनारच्या कत्तलखान्यासारखाच प्रचंड आहे. आशिया खंडातले हे दोन्ही कत्तलखाने अद्ययावत असून सर्वांत मोठे कत्तलखाने आहेत.
७. खानदेशातील नडोंजा या गावी प्रतिदिन ४०० गायींची कत्तल होते. सहदााो गोमांसाने भरलेले ट्रक मुंबईत येतात. येथून विदेशात गोमांसाची निर्यात होते. कुवेत, अरब राष्ट्रे, मलेशिया, इजिप्त, मध्य आशियातील देशांना लाखो टन गोमांस विकले जाते.
८. मानखुर्द येथे दोन ट्रकमध्ये खच्चून भरलेले सहा टन गोमांस पोलिसांनी जप्त केले. सहा टन गोमांस म्हणजे या सैतानांनी किती
गाई मारल्या असतील ?
९. बकरी ईद जवळ आली की, महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रचंड प्रमाणात निष्पाप पवित्र गाई, बैल, वासरे यांची चोरटी तस्करी होते. धर्मांध बकरी ईदला गायींच्या प्रचंड सामूहिक कत्तली करतात. हिंदुस्थानात धर्मांध हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या गायींच्या मुद्दाम कत्तली करतात.
१०. बकरी ईदच्या दिवशी मोठ्या शहरातच नव्हे, तर लहान-सहान गावातही गाई-वासरांच्या प्रचंड कत्तली होतात. सरकार खाटकांना अटक करण्याचे धाडस दाखवत नाही. कायद्याने गोहत्या बंदी जिथे आहे, तिथेही पोलिसांच्या डोळ्यांसमोर गल्ल्यांमध्ये गोमांसाचा बाजार चालू असतो.
११. ५ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या Agriculture Organization ने भारतातल्या पशूंच्या कत्तलीची आकडेवारी दिली. त्यात एकाच वर्षात १ कोटी ६० लक्ष ७० सहदाा गाई-वासरांची कत्तल झाल्याची नोंद आहे. आज वर्षाला अडीच कोटींच्या जवळपास गाई-वासरांची कत्तल होते.
१२. एका वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुमार सांगतात, ‘‘अमेरिका आणि युरोप मधील गोमांसविक्री करणार्या (जसे फास्ट फूड) बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारत सरकारला भारतभर मांसविक्रीची मोठी योजना दिली आहे. भारताला एक प्रकारे सक्तीने मांसाहारी करण्याची ती योजना आहे. भारत सरकारने ती स्वीकारली. त्यांच्या नियोजनाखाली त्या योजना आता राबवल्या जात आहेत. गोहत्या बंदीची गोष्ट आज फार दूरची असून आता सरकारच गोहत्येच्या विविध योजना राबवील. गाय ही आम्हा हिंदूंकरता अत्यंत पवित्र आहे. गोरक्षणाकरता हिंदु
सहज प्राण देतो. आजही रस्त्याने जातांना गाय दिसली, तर नकळत अगदी सहज भक्तीभावाने गायीला तो स्पर्श करतो, वंदन करतो. मात्र
हिंदूंची यच्चयावत श्रद्धास्थाने नष्ट करण्याचा सरकारने विडाच उचलला आहे. हिंदुस्थानात ४ सहदाा कत्तलखाने असून या कत्तलखान्यांतून हिंदूंच्या श्रद्धांची कत्तल चालू आहे.’
१३. आधुनिक निधर्मी लोक गाई आणि वासरे यांच्याकडून डॉलर्स मिळतात म्हणून आनंदाश्रू ढाळतात ! : ‘आधुनिकांचा बौद्धिक दहशतवाद प्रत्यक्ष पिस्तुल घेऊन मारण्यापेक्षाही महाभयंकर आहे. हे आधुनिक निधर्मी लोक गायी आणि वासरे यांच्या दुर्दशेवर अश्रू ढाळतात. ते गाई वा वासरे यांची दुर्दशा दूर व्हावी; म्हणून अश्रू ढाळत नसून त्यांना समाप्त करून त्याद्वारे डॉलर्स मिळवण्याकरिता आनंदाश्रू ढाळत आहेत.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ७.१.२०१०)
मांसनिर्मितीचे दुष्परिणाम !
मांस निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात लागणारे पाणी : काही उदाहरणे
वर दिलेली आकडेवारी खालील संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे. (http://www.theguardian.com/news/datablog/2013/jan/10/how-much-water-food-production-waste)
स्वस्त मांस कि भरमसाट महागाई ?
पशूचे मांस हे स्वस्त आहे, असे व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचे म्हणणे आहे. हा अत्यंत फसवा आणि भोंगळ तर्क आहे. वस्तूस्थिती काय आहे ? सर्वाधिक पाण्याचा वापर बैल, रेडा इत्यादींचे मांस बनण्यासाठी होतो. अन्न निराळेच ! अमेरिकेतील एक गाय एक किलो प्रोटीनसाठी ७५ ते ३०० किलो गवत आणि अन्नपदार्थ खाते, तर आफ्रिकेतील गायीला ५०० किलोहून अधिक खाद्य लागते.
जनावरांना असे गवत अधिक लागू लागल्यामुळे एक नामी शक्कल काढली गेली. त्यांना गवत खायला घालण्याऐवजी धान्य खायला घालण्यात येऊ लागले. त्याचे परिणाम चांगले मिळाले. गवताची आवश्यकता संपली आणि मांसाची गुणवत्ताही तीच राहिली. त्यामुळे मांसाचे कारखानदार खुश झाले; पण मांस बनण्यासाठी जे धान्य जाऊ लागले, त्याचे काय ? अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापिठाच्या अभ्यासानुसार जगातील ४० टक्के धान्य आज या मांसनिर्मितीसाठी वापरले जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने केलेल्या अन्य अभ्यासाचा संदर्भ देऊन इंग्लंडमधील वर्ल्ड प्रिझर्वेशन फाउंडेशन या संघटनेने दिलेली पुढील माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.
या माहितीनुसार गोमांस खाण्यापेक्षा डुकराचे मांस खाणे अधिक स्वस्त आहे, असा प्रचार आता हे आक्रस्ताळे व्यक्तीस्वातंत्र्यवाले करणार आहेत काय ? हा प्रश्न गोरक्षकांनी त्यांना विचारला पाहिजे. धर्मांध मुसलमानांची बाजू घेणारे यावर काय म्हणणार आहेत ?
– अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद, मुंबई.
अधिक दुधाच्या लोभापायी देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर !
देशी गायीच्या दुधात अनेक रोगांना समूळ नष्ट करण्याची क्षमता !
जगभरात दुधाच्या शुद्धतेसाठी आदर्श असलेल्या भारतीय दुधाळू संपदेला ग्रहण लागले आहे. देशी गायींच्या अनेक जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सिंथेटिक दुधाचा वापर, हिरव्या चार्याची कमतरता आणि पशूवध यांमुळे त्यांच्या पोषणाची गंगा आटत चालली आहे. दुध वाढवण्याच्या लोभापायी भारतीय आणि विदेशी जातींचे गोवंश यांच्यात क्रॉस ब्रीड करण्यात येत आहे. त्यामुळे अमृतावरच अन्याय होत आहे. न्युझीलंडमध्ये प्राध्यापक डॉ. वुडफोर्ड यांनी त्यांच्या शोधपत्रात स्पष्ट केले आहे की, भारताच्या सर्व गायींमध्ये बीटा कॅसिन-२ आढळून येते, ज्यात शरीरस्वास्थ्य आणि बुद्धीवर्धक सर्वच गुणधर्म आहेत. त्यात अनेक रोगांना समूळ नष्ट करण्याची क्षमता वैज्ञानिक आधारे सिद्ध झाली आहे.
भारतीय गोवंशाची निर्मिती समुद्रमंथनातून !
वैदिक मान्यतेनुुसार भारतीय गोवंश समुद्रमंथनातून निर्माण झाला आहे. त्यामुळे तो जंगली प्रवृत्तीपासून लांब राहिला आहे. भारतीय गोवंशाच्या दुधाची गुणवत्ता वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही सिद्ध झाली आहे. न्यूझीलंडचे डॉ. कीथ वुडफोर्ड यांनी संशोधनाअंती काढलेल्या निष्कर्षानुसार प्राचीन काळी युरोपीय जातीच्या गायींमध्ये म्युटेशन असल्यामुळे दुधात विषारी प्रोटीन निर्माण होणे चालू झाले. भारतीय जातीच्या गायींमध्ये म्युटेशन नसल्यामुळे दुधाची गुणवत्ता टिकून राहिली.
अमेरिकेत लावण्यात आलेल्या शोधानुसार विदेशी जातींच्या गायींमध्ये बीटा कॅसिन-ए नावाचा दुग्ध प्रोटीन आढळून येतो, जो विषारी समजला जातो. या दुधाच्या प्रोटीनमुळे पचनाच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. ते पचनाच्या पूर्वीच रक्तप्रवाहात मिसळते. त्यामुळे हृदयरोग, मधुमेह, स्कीजोफ्रेनिया, तसेच अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते.
गायीच्या दुधात स्वर्णभस्म निर्माण होते !
भारतीय पशूंच्या जाती नेहमीच कौतुकास्पद राहिल्या आहेत. गोवंशाच्या मुत्रात रेडिओलहरी शोषून घेण्याची क्षमता आढळून येते. भोपाळ वायूदुर्घटनेच्या वेळी शेणाने सारवलेल्या घरांवर वायूगळतीचा परिणाम अल्प झाल्याचे सिद्ध झाले आहे. गायीच्या दुधात स्वर्णभस्मही निर्माण होते. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियानेही गायीच्या दुधाला सर्वोत्तम म्हटले आहे. गायीचे तूप ग्रहण केल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही. – डॉ. डी.के. सधाना, पशु शास्त्रज्ञ, एन्डीआरआय, करनाल
देशी गायीच्या दुधापासून बनलेल्या दह्यात असा विषाणू असतो, ज्यात एड्सविरोधी गुणधर्म असतो. भारतीय जलवायूच्या विविधतेमुळेही दुधाची गुणवत्ता वाढते. – डॉ. मनोज तोमर, शास्त्रज्ञ, जिल्हा विज्ञान केंद्र
भारतात देशी गायींविषयी उदासीनता !
१. पश्चिम उत्तरप्रदेशमध्ये गाय आणि म्हशी यांच्या तुलनेत गायींची संख्या ६० टक्के आहे, जी काळानुसार अल्प होत आहे.
२. पशूपालनाविषयी उदासीनता आणि अंदाधुंद गोहत्या यांमुळे देशात देशी गायी अल्प होत आहेत.
३. जगात सर्वोत्तम जातीच्या गिर गायीची संख्या सौराष्ट्रात १० सहस्रांहूनही अल्प आहे; परंतु ब्राझिलमध्ये या गायी सर्वाधिक आहेत.
४. अनेक कृषी विद्यापिठांमध्ये साहीवाल, गिर, थारपारकर, अंगोल आणि राठी यांसह उत्तम जातीच्या गायींचे विभाग चालू करण्यात आले आहेत; परंतु विदेशी अनुदानासाठी क्रॉस ब्रीडला प्रोत्साहन देण्यात येत आहे.
५. जगभरात २५० गायींच्या जातीमध्ये ३२ जाती भारतीय गोवंशांच्या आहेत.
गोवंश रक्षणासाठी हे कराच !
१. प्रत्येक घरी निदान एका गायीचे पालन करणे, ते शक्य नसल्यास गोशाळेतील एखाद्या गायीच्या पालन-पोषणाचा व्यय करणे
२. पंचगव्यापासून निर्माण झालेल्या स्वास्थ्यवर्धक लाभदायी असे दंतमंजन, साबण, उटणे, धूप, मच्छर निरोधक उदबत्ती अशा उत्पादनांचा नित्य वापर करणे
३. घरामध्ये गायीचेच दूध, दही, ताक आणि तूप यांचा वापर करणे
४. घरामध्ये आजारपणाच्या काळात स्वस्त, सुलभ आणि दोष निर्माण न करणार्या पंचगव्य औषधींचा उपयोग करणे
५. लक्षावधी गोवंशाच्या मृत्यूचे कारण बनत असलेल्या प्लास्टिक पिशव्या न वापरणे
६. गोवंश हत्या करून निर्माण होत असलेली उत्पादने समजून घेऊन त्यांच्या वापराच्या विरोधात जनजागरण करणे, उदा. चामड्यापासून बनवलेल्या चपला, बूट, कोट, पर्स, सुटकेस, पट्टे, गालीचे, फर्निचर कव्हर्स, क्रिकेट बॉल, फूटबॉल, कलात्मक मूर्ती, गोमांस आणि चरबीपासून निर्माण केलेले तूप, आईस्क्रीम, चॉकलेट, टूथपेस्ट आणि पावडर, काही साबण, कोल्ड क्रीम, लिपस्टीक, परफ्यूम,
नेलपॉलिश, शाम्पू, सिंथेटिक दूध इत्यादी
७. गोहत्या करून निर्माण होत असलेली औषधे, उदा. इन्शुलिन, डेक्सोरेंज सिरप, विविध कॅल्शिअम पूरक औषधींच्या वापरास विरोध करणे ( औषध साहित्यात ँदन्ग्हा लिहिलेली सर्व औषधे गोवंशाच्या मांसापासून सिद्ध होत असतात, हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे.)
८. सेंद्रिय खत वापरून निर्माण केल्या गेलेल्या खाद्यांन्नांचाच वापर करणे
९. संकटात सापडलेल्या आणि कत्तलखान्याकडे जात असलेल्या गोवंशाला वाचवण्यासाठी साहाय्य करणे’
(विश्व हिंदू परिषदेची दिनदर्शिका – २०१०)
गोरक्षणासाठी कसे प्रयत्न कराल ?
१. गोवंशाच्या बेकायदेशीर वाहतुकीवर लक्ष ठेवा.
२. गोवंशाची होणारी बेकायदेशीर वाहतूक वैध मार्गाने रोखा. जनावरे कह्यात घ्या.
३. नियम समजून घेऊन गार्हाणे प्रविष्ट करा.
४. ‘गोवंश कत्तलीसाठीच नेला जात आहे’, असे गार्हाणे प्रविष्ट करा.
५. गुरे कह्यात येईपर्यंत त्यांच्यापासून दूर जाऊ नका. आरक्षकांना गोरक्षणाचा कायदा माहिती नसतो. त्यांना तो समजावून सांगा. त्याची प्रत त्यांना द्या. त्यासाठी आधी गोरक्षणाचा कायदा समजून घ्या.
६. ज्या हिंदूंकडे जागा असेल, त्यांनी एकतरी गाय पाळण्याचा प्रयत्न करावा.
७. ‘गाय वाचली, तरच हिंदु वाचेल’, असे सर्वत्र फलक लावावेत. – अधिवक्ता श्री. देवदास शिंदे