शालेय पाठ्यपुस्तकांतील विकृतीकरणाच्या विरोधात दिलेला लढा
१. ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ (एन्.सी.ई.आर्.टी.)
शालेय पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम बनवणार्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ (एन्.सी.ई.आर्.टी.) यांसारख्या काही संस्था, विद्यालये आणि विविध राज्यांतील शिक्षण मंडळे हिंदुविरोधी अन् विकृत इतिहास सादर करतात. हिंदूंचा स्वाभिमान जागृत होऊ नये, यासाठी भारताला सर्वांगाने लुबाडणार्या धर्मांध आक्रमकांचा उदोउदो, क्रांतीकारकांचा अवमान आणि भारताला घडवणार्या छत्रपती शिवरायांसारख्या राजांना नगण्य स्थान, असे या सर्व विकृतीकारांचे धोरण आहे. या सर्वच शिक्षण मंडळांच्या विरोधात समितीचे आंदोलन चालू आहे; पण आज प्रामुख्याने ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या विरोधात समितीने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा या चार राज्यांत केलेले आंदोलन अन् त्याला मिळालेले यश आपल्यासमोर मांडणार आहे.
प्रथम ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या अभ्यासक्रमातील मुगलांचा उदोउदो करण्यात आलेली उदाहरणे मांडतो.
- मुगल साम्राज्य स्थापन करणारा बाबर हा ‘नीतीमान’ होता.
- हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणारा आणि सहस्रावधी हिंदू स्त्रियांची विटंबना करणारा हिंदुद्वेष्टा अकबर हा ‘महान राज्यकर्ता’ अन् ‘सर्वधर्म-समभावी’ होता.
- ‘तेजोमहालय’ हे शिवमंदिर बुजवून तेथे ‘ताजमहल’ बांधणार्या, तसेच मंदिरे उद्ध्वस्त करणार्या शहाजहानचाही उदोउदो करण्यात आला आहे.
हा चुकीचा आणि विकृत इतिहास बदलून खरा इतिहास शिकवला जावा, यासाठी समितीने विविध राज्यांत पुढीलप्रमाणे प्रयत्न केले.
अ. महाराष्ट्र
‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदीप्यमान इतिहास केवळ ४ ओळींत तोही त्यांच्या चित्राशिवाय, तर भारताला लुटून येथील संस्कृतीचे भंजन करणार्या मुघल आक्रमकांचा इतिहास ६० पाने भरून दिला आहे. याची माहिती समितीला मिळाल्यावर प्रथम लोकप्रतिनिधींना जाग येण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेवर समिती, वारकरी संप्रदाय आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोर्चा काढण्यात आला; पण याची शासनाने कोणतीही दखल घेतली नाही, तरीही समिती विविध आंदोलनांच्या माध्यमातून या प्रकरणाचा पाठपुरावा घेत आहे.
इतिहासाच्या विकृतीकरणाचे पुरावे
आ. गोवा
आरंभी ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या अभ्यासक्रमाविषयी गोवा शासनाला निवेदन देऊन इतिहासाचे विकृतीकरण करणारे पाठ्यपुस्तक बदलण्याची मागणी करून हिंदू जनजागृती समितीने महाराष्ट्रासह गोवा राज्यातही राज्यव्यापी आंदोलनांना आरंभ केला. समितीने विविध संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी, इतिहासप्रेमी आणि विद्यार्थी यांना संघटित करून पणजी येथे १ एप्रिल २००९ या दिवशी राज्यव्यापी आंदोलन छेडून शासन, प्रशासन आणि गोवा शालांत मंडळ यांना चेतावणी दिली. या आंदोलनामध्ये ‘मराठी राज्यभाषा प्रस्थापन समिती’, शिवसेना, दिव्य जागृती ट्रस्ट आणि हिंदु महासभा या संघटना सहभागी झाल्या होत्या. आठ महिन्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सदर पाठ्यपुस्तकातील मोगलांचा उदोउदो करणारे दोन धडे वगळून त्याऐवजीr गोव्याचा इतिहास
समाविष्ट करण्याचा निर्णय गोवा शालांत मंडळाने घेतला. ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ची पाठ्यपुस्तके केंद्रशासनाची असली, तरी प्रत्येक राज्यशासनाला २० प्रतिशत पालट करण्याचा अधिकार आहे, त्यानुसार गोवा राज्यशासनाने हा निर्णय घेतला. समितीने ‘छत्रपतींच्या संपूर्ण कार्याची माहिती मुलांना दिली जावी, ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांचा चुकीचा इतिहास तपासण्याच्या दृष्टीने पुनःश्च अभ्यास करावा’ आणि प्रत्येक पाठ्यपुस्तकात ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत समाविष्ट करावे’, अशा मागण्या गोवा शासनाकडे केल्या आहेत. या मागण्यांचा पाठपुरावाही समिती करत आहे.
इ. अन्य राज्ये
आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांतील काही जिल्ह्यांत अशाच प्रकारचे आंदोलन समितीने केले. कर्नाटक राज्यात या आंदोलनाच्या निमित्ताने इतिहासतज्ञांच्या बैठकाही घेण्यात आल्या.
अजूनही अशी कित्येक राज्ये आहेत की, जेथे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा विकृत इतिहास शिकवला जात आहे. तो पालटण्यासाठी आपल्या सर्वांना संघटितपणे प्रयत्न करायला हवेत.
‘स्टार माझा’ वृत्तवाहिनीवरील श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती यांची मुलाखत
२. तेलंगण येथे अभ्यासक्रमातून खोट्या इतिहासाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान
तेलंगण येथे शिक्षणखात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या इयत्ता ६ वीच्या ‘अवर वर्ल्ड थ्रु इंग्लिश’ या पुस्तकात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा खोटा इतिहास मांडून ख्रिस्त्यांचे उदात्तीकरण करण्यात आले आहे. यामुळे कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून तेलंगण शासनाने हा धडा त्यांच्या अभ्यासक्रमातून त्वरित हटवावा, तसचे असा खाटे इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करणार्या उत्तरदायींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तेलंगण शासनाला आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना यासंदर्भात लवकरच समितीकडून निवेदन पाठवण्यात येणार असून आंदोलनाद्वारेही याविषयी आवाज उठवण्यात येणार आहे.
- प्रत्यक्षात या गोष्टीतही छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन आक्रमणकर्त्यांना ठार करून जॉनचे प्राण वाचवले आहेत, मात्र दिशाभूल प्रश्न करणारे प्रश्न विचारून शिवाजी महाराजांपेक्षा जॉन शूर होता, असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे.
- स्वराज्याची राजधानी असणार्या रायगडाची रचना पहाता कोणताही परकीय माणूस रायगडावर जाऊ शकत नाही, असे असतांना जॉन
रायगडावर पोहोचलाच कसा, असा प्रश्न उपस्थित होतो. - यो गोष्टीत सुरत येथून लुटून आणलेल्या दागिन्याच्या पेटीवर जनतेचा अधिकार आहे, असे प्रथम सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज नंतर ती पेटी जॉनला देतात. यावरून ते एक लुटारू होते, तसेच जनतेच्या संपत्तीचा उपयोग स्वतःसाठी करत होते, असे चुकीचे दाखवण्यात आले आहे.
पुस्तकात देण्यात आलेला खोटा इतिहास !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतवर आक्रमण करून सुरतेची लूट केली. या लुटीत सुरतमधील अॅडम स्मिथ नावाच्या व्यक्तीच्या
दिवंगत पत्नीचे चित्र असलेली आणि हिरेजडीत सोन्याची पेटी लुटली गेली. ती पेटी परत मिळवण्यासाठी अॅडमने त्याचा पुतण्या
जॉन याचे नियोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य असलेल्या रायगड येथे पाठवले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
दरबारात गेल्यावर त्याने सुरतच्या लुटीतील साहित्य पाहिले. त्यात त्याला त्याची ती पेटी दिसली. जॉनने ही पेटी त्याची असून ती
परत देण्याची मागणी केली. यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी या संपत्तीवर आता येथील जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्हाला
ती परत देता येणार नाही, असे सांगून जॉनला तीन दिवसांत रायगड सोडण्याची आज्ञा केली.
दुसर्या दिवशी सायंकाळी जॉन एकटाच रायगडावर बसला होता. त्या वेळी त्याला अचानक असे दिसले की, एक मराठा सैनिक मान खाली घालून एकटाच फिरत आहे. अचानक तीन व्यक्ती तलवार घेऊन त्या मराठा सैनिकाला मारण्यासाठी धावल्या. तो मराठा सैनिक छोट्या खिंडीकडे पळाला आणि त्यांनी आक्रमण करण्याची वाट पाहू लागला.
त्या तिघांपैकी एकाने जॉनवर तलवारीने प्रहार केला; पण त्याने परिधान केलेल्या ओव्हरकोटमुळे त्याला कोणतीही इजा झाली नाही. जॉनने त्याला जमिनीवर लोळवले आणि त्यानंतर तो अन्य दोन व्यक्तींकडे वळला. एवढ्यात तो मराठा सैनिक त्याच्या हातातील तलवार घेऊन धावून आला आणि त्याने त्या दोन आक्रमणकर्त्यांना ठार केले. जॉनने त्या मराठा सैनिकाचा तोंडावळा पाहिला असता तो सैनिक दुसरा कोणी नसून प्रत्यक्षात शिवाजी होता आणि त्यांच्या हातात तळपणारी तलवार ही भवानी तलवार होती.
एवढ्यात जॉनने लोळवलेला आक्रमणकर्ता उठून उभा राहीला आणि त्याने शिवाजीवर आक्रमण केले; पण त्याचा तोल जाऊन तो
तेथील कठड्यावरून खाली दगडांवर पडला. तेथे असलेल्या जॉनला पाहून शिवाजीचा तोंडवळा आनंदी होऊन त्यांनी तुझ्यामुळे माझा जीव वाचला. उद्या दरबारात येऊन तुला काय हवे ते घेऊन जा, असे सांगून जॉनचे आभार मानले. दुसर्या दिवशी जॉन दरबारात आल्यावर त्याची पेटी त्याला परत मिळाली आणि त्याचा सन्मान करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याला सूरत येथे परत पाठवले.