१. इस्लामी धर्मांतर केंद्रात केले जाणारे अत्याचार
‘हिंदू मुलगी प्रेमात अडकल्यानंतर मुसलमान तरुण तिला ‘इस्लाम धर्म स्वीकारल्यासच विवाह करीन’, असे धमकावतात. त्यानंतर तिला इस्लामी धर्मांतर करण्याच्या केंद्रात नेले जाते. तेथे धर्मांतरित होण्यास मुलीने नकार दिल्यास तिच्यावर अत्याचार केले जातात.’
२. मोलकरीण म्हणून वापर
मुसलमानाशी ‘निकाह’ केल्यावर एक हिंदू मुलगी त्याच्या घरी गेल्यावर त्याला आधीच दोन बायका असल्याचे तिच्या लक्षात आले. त्या वेळी तो मुसलमान तिला म्हणाला, ‘‘तुला तुझ्या आई-वडिलांनी घरातून बाहेर काढले आहे. तुला येथे रहायचे असेल, तर मोलकरीण म्हणून रहावे लागेल.’’
३. अश्लील ध्वनीचित्र-चकती (डीव्हीडी) किंवा लघुचित्रसंदेश (एम्.एम्.एस्.) बनवण्यासाठी वापर
‘अश्लील ध्वनीचित्र-चकतींना प्रचंड मागणी असल्याने ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या तरुणींचा वापर त्या बनवण्यासाठी केला जातो. इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे एका मुसलमानाने विवाहित हिंदू तरुणीला प्रेमजाळ्यात फसवून तिचे भ्रमणभाषवर नग्न चित्रीकरण केले. तसेच त्याचा लघुचित्रसंदेश बनवून तो सर्वत्र प्रसारित केला.’ (दैनिक ‘सकाळ’, १.१२.२००९)
४. वेश्याव्यवसायासाठी वापर
‘केरळ पोलिसांनी मध्यंतरी कोची आणि कोझ्झीकोड येथील `रेड लाईट’ विभागामध्ये छापे घालून काही मुसलमान मुलींना पडकले असता, त्यांपैकी बहुतांश मुली या मूळच्या मंगळुरू आणि बेंगळुरू येथील हिंदू अथवा खिस्ती होत्या. त्यांचे बळाने धर्मांतर केले गेले होते.’
५. इस्लामी राष्ट्रांत विक्री
अ. ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलींना कोची आणि कोझी येथील मनुष्यविरहित भागांतून जहाजाद्वारे प्रथम मंगळुरू, गोवा, चेन्नई किंवा लक्षद्वीप येथे पाठवले जाते. तेथून ‘विदेशात काम देऊ’, असे आश्वासन देऊन त्यांना अरब देशांत पाठवले जाते. तेथे गेल्यावर या मुलींना ‘वेश्या’ म्हणून अरबांना विकले जाते.’
अा. ‘केरळमधील काही तरुणींना बांगलादेशातही नेऊन विकण्यात आले. यातील काही तरुणींना तेथे घरकामासाठी ठेवण्यात आले, तर काही तरुणींचा अवैध धंद्यांसाठी वापर करण्यात आला.’
६. जिहादी कारवायांसाठी वापर
‘केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (‘सीबीआय’च्या) अहवालानुसार, देशभरातून `लव्ह जिहाद’द्वारे धर्मांतरित झालेल्या अनुमाने १०,००० मुलींना पाकिस्तानमधील आतंकवादी संघटना जिहादी कारवायांचे प्रशिक्षण देत आहेत.’ (साप्ताहिक ‘उदय इंडिया’, २९.१०.२०११)
अ. आतंकवाद्याला साहाय्य करणारी दीपा उर्फ शाहीन ! : ‘अलुवा, केरळ येथे शालेय बसचा (‘स्कूलबस’चा) चालक असलेल्या नौशादने दीपा चेरियन् (वय ३१ वर्षे) या युवतीला प्रेमजाळ्यात अडकवले. विवाह झाल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारणार्या दीपाचे ‘शाहीन’ असे नामकरण करण्यात आले. तिने पती नौशादच्या सांगण्यावरून लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी असलेल्या नाझीरला एर्नाकुलम् बंदीगृहात `सिमकार्ड’ पुरवले. त्यामुळे पोलिसांनी दीपा चेरियनला कह्यात घेतले.’ (‘रेडिफमेल डॉट कॉम’, २०.७.२०१२)
७. फसवणूक झाल्याच्या भावनेतून आत्महत्या
अ. केरळमधील ३ महाविद्यालयीन मुलींनी आत्महत्या करणे : ‘अंबलप्पुझा येथे ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या अनिता, वेणी आणि जुलिया या तीन मुलींनी त्यांच्या वर्गातील सौफर अन् शहनाझ या ‘नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट’ संघटनेच्या सदस्यांकडून होत असलेल्या शारीरिक शोषणाला कंटाळून आत्महत्या केली.
आ. बळाने धर्मांतर केल्याने कंटाळून आत्महत्या करणारी प्रतिभा प्रभाकरन ! : फेब्रुवारी २००५ मध्ये केरळमधील प्रतिभा प्रभाकरन फिरोझसमवेत पळून गेली. प्रतिभाच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतल्यावर ते दोघे न्यायालयासमोर उपस्थित राहिले. फिरोझने न्यायालयात सांगितले, ‘मी प्रतिभावर खरोखरच प्रेम करतो आणि तिला धर्मांतरासाठी आग्रह करणार नाही.’ त्यानंतर त्याने प्रतिभाला तिच्या कुटुंबियांशी संपर्क करू दिला नाही. लग्न झाल्यावर १-२ वर्षांनी फिरोझ आणि त्याचे कुटुंबीय इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रतिभावर दबाव आणू लागले. तिला पुन्नानी येथील इस्लामी धर्मांतर केंद्रात नेण्यात आले; परंतु तिथे तिने धर्मांतरित होण्यास कडाडून विरोध केला. त्यानंतर घरीच मौलवीला आणून तिचे धर्मांतर करण्यात आले. तिच्यावर बुरखा घालणे आणि नमाज पढणे यांसाठी बळाचा वापर करण्यात आला. या सर्वाला कंटाळून शेवटी तिने आत्महत्या केली.
८. ‘लव्ह जिहाद’मुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होणे
‘लव्ह जिहाद’ची समस्या धर्मांतराच्या प्रश्नापुरती मर्यादित नाही. त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत आहे. ‘निरागस प्रेमिका’ म्हणून जीवनाचा होणारा आरंभ होणार्या स्त्रीचा ‘वार्यावर सोडलेली परित्यक्ता स्त्री’ म्हणून शेवट होतो.’ – डॉ. श्रीरंग गोडबोले, पुणे
संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘लव्ह जिहाद’