धर्मांतराद्वारे हिंदु धर्म पोखरत आहे आणि धर्मशिक्षण नसल्याने धर्माभिमानशून्य बनलेला हिंदु समाज त्याला मोठ्या संख्येने बळी पडत आहे.धर्मांतर झालेली व्यक्ती तिच्या समाजाच्या सहस्त्राे वर्षांच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांपासून एका क्षणात दूर जाते. या लेखात धर्मांतरणामुळे हाेणारे दुष्परिणाम जाणुन घेऊया.
हिंदुस्थानात सहदााो वर्षांपासून धर्मांतराची समस्या बळावण्यामागे हिंदूंचेही काही दोष आणि अन्य कारणे आहेत. धर्मांतराची समस्या संपुष्टात आणण्यासाठी हिंदु समाजाने या दोषांविषयी अंतर्मुख होऊन त्यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे.
इतिहासात मानवता, संस्कृती आणि नैतिकता यांसाठी हिंदु समाजाने खिस्ती अन् मुसलमान यांच्यापेक्षा अधिक योगदान दिले आहे. हिंदूंनी कधीही स्वधर्म इतरांवर लादला नाही; उलट अवघे जग सुसंस्कृत करण्याची घोषणा केली. हिंदूंनो, धर्मांतर करून स्वधर्माचा दैदीप्यमान इतिहास कलंकित करू नका !