Menu Close

हिंदु समाजाला आणि संघटनांना आवाहन !

१. हिंदु समाजाला आवाहन

अ. हिंदूंनो, धर्मभोक्ते व्हा !

‘खिस्ती धर्म स्वीकारला, तरच स्वर्गात जाऊ’, हे थोतांड स्वर्गाच्याही पलीकडच्या उच्च लोकांची (महा, जन, तप आणि सत्य या लोकांची) संपूर्ण माहिती असणार्‍या या हिंदूंच्या देशात आपण किती दिवस ऐकायचे ? हिंदूंना पापी आणि जगण्यास अपात्र ठरवणार्‍या अहिंदूंसमोर ताठ मानेने उभे रहाण्याचे धैर्य हिंदू केव्हा दाखवणार ? धर्मभोक्ते केवळ मुसलमान आणि खिस्ती यांनीच असावे का ? हिंदूंनो, तुम्हीही धर्मनिष्ठ व्हा. तसे झाल्यास परधर्मीय तुमच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत.

आ. धर्मांतर करून जगाचा विनाश ओढवू नका !

‘कोणतीही तात्त्विक बैठक नसलेला खिस्ती धर्म अत्यंत कामचलाऊ आणि अपरिपूर्ण समजुतींवर आधारलेला आहे. अशा धर्माने जगावर राज्य केलेला गेल्या ४०० वर्षांचा काळ हा मानवी इतिहासातील ‘भयाण काळ’ म्हणून ओळखला जातो. खिस्त्यांच्या, म्हणजेच पाश्चिमात्यांच्या प्रभावाने झालेल्या पर्यावरणाच्या नाशामुळे संपूर्ण मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन उभी ठाकली आहे. अशा पाश्चिमात्य खिस्ती धर्माच्या प्रतिनिधींना आपण आपले धर्मांतर करू द्यायचे का ? त्यांच्या संख्येत भर घालायची का, याचा हिंदूंनी विचार करायला हवा. धर्मांमध्ये इस्लाम हा दुसरा पर्याय तर मुळीच नको. इस्लामी राजवट असलेल्या देशांत विध्वंस, विनाश अन् मागासलेपणा यांच्या व्यतिरिक्त अन्य काहीही घडत नाही, असे आजवर दिसून आले आहे. त्यामुळे जर जगाचे इस्लाममध्ये रूपांतर झाले, तर ती जगाची सर्वांत भीषण शोकांतिका ठरेल.’ – श्री. एम्.एस्. मेनन (साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’, ६ मे २००७)

इ. पाश्चात्त्यांना नकोसा असलेला खिस्ती धर्म आयात करून हिंदु धर्म नष्ट करण्याचे पातक ओढवून घेऊ नका !

‘अमेरिकेतील २८ प्रतिशत खिस्त्यांची खिस्ती पंथावरील श्रद्धा ढळली आहे. खिस्ती पंथातील लहान मुले चर्च सोडत आहेत आणि इतर ठिकाणी विश्वास ठेवत आहेत किंवा कुठलाही धर्म मानत नाहीत. आजपासून शंभर वर्षांनी अमेरिकेतील खिस्त्यांचे प्रमाण न्यून होईल.’ – ‘प्यू फोरम’ या संस्थेचे ‘धर्म आणि सामाजिक जीवन’ या विषयावरील सर्वेक्षण (२००८)

र्इ. हिंदूंनो, धर्मांतर करून स्वधर्माचा दैदीप्यमान इतिहास कलंकित करू नका !

इतिहासात मानवता, संस्कृती आणि नैतिकता यांसाठी हिंदु समाजाने खिस्ती अन् मुसलमान यांच्यापेक्षा अधिक योगदान दिले आहे. हिंदूंनी कधीही स्वधर्म इतरांवर लादला नाही; उलट अवघे जग सुसंस्कृत करण्याची घोषणा केली. जगाला सुसंस्कृतपणा शिकवणार्‍या हिंदूंच्या देशात धर्मांतरामुळे हिंदूंनी नामशेष होणे, हे त्यांच्या दैदीप्यमान इतिहासाला कलंकित करणारे आहे.

उ. हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात घ्या !

‘अ‍ॅलोपॅथी’त वरवरचे उपाय असतात, तर आयुर्वेद रोगाच्या मूळ कारणावर उपाय सांगतो. त्याचप्रमाणे खिस्ती प्रसारक वरवरचे उपाय सांगतात, उदा. खिस्ती व्हा. येशू सर्व त्रास दूर करील इत्यादी, तसेच ते पैसेही देतात. अशा उपायांमुळे व्यक्तीचे या जन्मातील भोग, उदा. दारिद्र्य काही चुकत नाही. थोडा लाभ झाल्यास व्यक्तीला पुढच्या जन्मी राहिलेले प्रारब्धभोग भोगावे लागतात. याउलट हिंदु धर्मात  सांगितलेल्या साधनेने सर्व त्रासांचे मूळ कारण दूर होते. त्यामुळे आर्थिक टंचाईसह सर्वच त्रास दूर होतात, तसेच अध्यात्मातही प्रगती होऊ लागते.’ – डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था (१४.९.२०११)

 

२. अहिंदू संघटनांकडून प्रलोभने स्वीकारून धर्मांतरित होणार्‍या हिंदूंनो, हे लक्षात घ्या !

अहिंदू संघटनांकडून प्रलोभने स्वीकारून धर्मांतरित होणारे निर्धन हिंदू बहुसंख्य हिंदूंना प्रश्न विचारतात, ‘आम्ही गरीब आहोत.  आमच्याकडे शासन लक्ष देत नाही. त्यामुळे जेव्हा अहिंदू प्रचारक आम्हाला जगण्यासाठी हात देतात, तेव्हा तो हात आम्ही का धरायचा नाही ? हिंदूंच्या संस्था आम्हाला काय देतात ?’ असे प्रश्न विचारणार्‍या हिंदूंनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

अ. ‘स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावहः ।’, म्हणजे ‘स्वधर्म पाळतांना मृत्यू आला, तरी परधर्म स्वीकारण्यापेक्षा तो मृत्यू श्रेयस्कर आहे’, असे धर्मतत्त्व आहे.

आ. दारिद्र्य हा प्रारब्धाचा (नशिबाचा) भाग आहे. धर्मांतर करणे, हा दारिद्र्याची समस्या सोडवण्याचा मार्ग नाही. साधनेने प्रारब्धावर मात करता येते; म्हणून साधना करणे, हाच योग्य मार्ग आहे.

इ. इस्लामी संघटनांना अरब राष्ट्रांकडून, तर खिस्ती संघटनांना खिस्ती राष्ट्रांकडून अर्थसाहाय्य मिळते. हे साहाय्य करण्यामागे या राष्ट्रांचे ‘हिंदुस्थानचे महत्त्व अन् हिंदु धर्म संपवणे’, हे दोन प्रमुख उद्देश आहेत. त्यामुळे या अहिंदूंच्या संघटनांकडून पैसे स्वीकारणे, म्हणजे राष्ट्र अन् धर्म द्रोह करण्यासारखे आहे.

र्इ. जगात एकही हिंदु राष्ट्र नसल्याने हिंदु संघटनांना विदेशातून अर्थसाहाय्य मिळत नाही. तसेच दारिद्र्यनिर्मूलन करणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे निर्धन हिंदूंनी हिंदूंच्या संस्थांकडून त्याविषयी अपेक्षा बाळगणे अयोग्य आहे.

३. हिंदुत्ववादी संघटनांना आवाहन

अ. अहिंदु धर्मप्रसारकांचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद करा !

‘अहिंदु धर्मप्रसारकांकडे परदेशांतून प्रचंड पैसा येतो. या धर्मप्रसारकांचे नियोजन, दूरदृष्टी, आक्रस्ताळेपणा न करता संयमाने धर्मांतर घडवण्याची हातोटी, हिंदूंच्या धर्मग्रंथांची साधारण माहिती आदी सूत्रांचा अभ्यास आणि निरीक्षण करून त्यांच्या प्रतिवादाची सवय हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी स्वतःला लावून घेतली पाहिजे.

आ. धर्मांतराच्या विरोधात अभ्यासपूर्ण लढा द्या !

एखाद्या देशात खिस्ती लोकांवर सामाजिक आणि सांस्कृतिक अन्याय झाल्याचे कळताच अन्य देशांतील खिस्ती त्याविरोधात अभ्यासपूर्ण लढा देतात. हिंदु संघटनांकडे असा अभ्यास आणि राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय दंडविधानांचे ज्ञान यांची वानवाच दिसते. धर्मांतराची घटना घडली की, हिंदु संघटनांकडून भावनिक पातळीवरील थयथयाट वा तात्पुरता दिशाहीन उद्रेक केला जातो; परंतु निश्चित स्वरूपाचा तोडगा काढला जात नाही. मूळ प्रश्नाचे आकलन करून घेणे, सत्ताधार्‍यांवर दबाव आणून परकीय साहाय्य थांबवणे, धर्मांतरासंबंधात अन्य राष्ट्रांनी अवलंबलेल्या धोरणांचा अभ्यास करणे आणि मतांचे गणित न मांडता धर्मांतर रोखणे आदी गोष्टी हिंदु संघटनांकडून अपेक्षित आहेत.

इ. धर्मांतराविषयी परस्पर सहकार्याने न्यायालय किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे गार्‍हाणे न्या !

जेथे धर्मांतराचे प्रयत्न होतात वा प्रत्यक्ष धर्मांतर होते, तेथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी न्यायालय किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे निर्भयपणे गार्‍हाणे मांडले पाहिजे. काही तांत्रिक सूत्रांमुळे धर्मांतरासंबंधी नेलेले गार्‍हाणे जिल्हाधिकारी किंवा न्यायालय यांच्यासमोर टिकणे कठीण असते. अशा वेळी हिंदु स्वयंसेवी संघटना, अधिवक्ते आणि समाजसेवक यांनी गार्‍हाणे नेणार्‍या हिंदूला न्यायालय प्रक्रियेत स्वतःहून साहाय्य केले पाहिजे.’ – श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी.

र्इ. आपल्या नगराजवळील आदिवासी भागांमध्ये स्वधर्मप्रसार करा !

संदर्भ : ‘हिंदू जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण’ एवं ‘धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान !