Menu Close

हिंदूंना धर्मशिक्षण देणे

१. हिंदूंना धर्मशिक्षण देणे

आदिवासी पाड्यांतील हिंदूंचेच नव्हे, तर सर्वच स्तरांवरील हिंदूंचे धर्मांतर होण्यामागील मुख्य कारण धर्माविषयीचे अज्ञान हे आहे. हे अज्ञान दूर करण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था प्रत्येक नगरात, देवळात आणि शाळेत केली पाहिजे. धर्मशिक्षण मिळाल्याने हिंदू स्वधर्माप्रमाणे आचरण करतील आणि त्यांना स्वधर्माच्या श्रेष्ठत्वाची अनुभूती येईल. अशी अनुभूती आल्याने धर्माभिमानी झालेले हिंदू धर्मांतराला बळी पडणार नाहीत.

२. लहान मुलांवर लहानपणापासून धार्मिक संस्कार करणे

हिंदूंनी त्यांच्या मुलांना लहानपणापासून नित्यनेमाने रामरक्षा, हनुमानस्तोत्र, तसेच ‘कराग्रे वसते लक्ष्मी’, ‘शुभंकरोती’, ‘वदनी कवळ घेता’ इत्यादी आचारपालनाशी संबंधित श्लोक शिकवले पाहिजेत. रामायण अन् महाभारत या धर्मग्रंथांतील प्रसंग सांगून त्यांना धर्मप्रेमी केले पाहिजे. स्वाभिमानी बनवणारे हे संस्कार लहानपणीच न झाल्यास मोठेपणी हिंदू ते शिकत नाहीत. धर्मांतरानंतर मात्र ‘नमाज’ वा ‘प्रेअर’ ते प्रामाणिकपणे करू लागतात.

३. हिंदुजागृती व्यापक प्रमाणात करणे

अहिंदूंचा सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमणाचा विकृत इतिहास, धर्मांतरितांची कालांतराने होणारी परवड आणि धर्मांतरामुळे होणारी समाज, राष्ट्र अन् धर्म यांची हानी इत्यादी सूत्रांविषयी हिंदु समाजात व्यापक प्रमाणात जागृती करणे, हाही एक धर्मांतर रोखण्याचा  महत्त्वाचा मार्ग आहे. हिंदुजागृतीचे हे कार्य पुढीलप्रमाणे करता येईल –

अ. वृत्तपत्रांमध्ये धर्मांतरामुळे होणार्‍या हानीविषयी पत्रलेखन करणे, लेख लिहिणे आदी माध्यमांतून जागृती करणे

आ. शाळा, महाविद्यालये, कार्यालये, महिला मंडळे, जातीसंस्था, व्यावसायिक केंद्रे, धार्मिक जत्रा इत्यादी ठिकाणी कार्यक्रम, जागृतीपर पत्रके, पुस्तिका, भित्तीपत्रके आदींच्या माध्यमांतून या धोक्याविषयी जागृती करणे

इ. हिंदूंच्या धर्मांतराच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणार्‍या ‘प्रार्थना सभा’, ‘आशीर्वाद सभा’ इत्यादी कार्यक्रमांत सहभागी न होण्याविषयी जागृती करणे

र्इ. धर्मांतर करू इच्छिणार्‍या हिंदूंची प्रत्यक्ष भेट घेऊन धर्मांतर न करण्याविषयी त्यांचे प्रबोधन करणे

४. अन्य पंथियांच्या शाळा-महाविद्यालयांवर बहिष्कार घालणे

खिस्ती (कॉन्व्हेंट) शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पूर्णतः खिस्तीकरण होईल, असे शिक्षण दिले जाते, तर मदरसे, अंजुमन इत्यादी इस्लामी शाळांत विद्यार्थ्यांचे इस्लामीकरण होईल, असे शिक्षण दिले जाते. अन्य धर्मीय शाळा-महाविद्यालये हिंदु विद्यार्थ्यांना स्वधर्मापासून दूर नेतात आणि परधर्माप्रमाणे आचरण करण्यास शिकवतात. म्हणूनच अशा शाळा-महाविद्यालयांतून हिंदूंच्या भावी पिढीचे धर्मांतर  होण्याचा मोठा धोका आहे. यासाठी प्रत्येक हिंदूने अन्य धर्मियांच्या शाळा-महाविद्यालयांवर बहिष्कार घालून स्वतःच्या पाल्यांना हिंदु शाळा-महाविद्यालयांत पाठवायला हवे !

५. अहिंदूंमध्ये हिंदूंचे धर्मांतर न करण्याविषयी धाक निर्माण करणे

‘हिंदूंचे वेगाने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतरित झालेल्यांचे शुद्धीकरण करणे, हा एक उपाय तर आहेच; पण हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांना धाक बसेल, यासाठी संघटित होणे, हाही या समस्येवरील अधिक प्रभावी उपाय आहे.’ – डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था. (२.४.२००७)

६. हिंदूंनो, अद्वितीय हिंदु धर्माचे प्रचारक बना !

अ. ऋषीमुनींची ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण विश्वाला आर्य, म्हणजेच सुसंस्कृत करू’ ही घोषणा सत्यात आणण्याची प्रतिज्ञा करा !

मुसलमान म्हणतात, ‘सर्व जग इस्लाममय करू.’ खिस्ती म्हणतात, ‘या सहदााकात सर्व जग येशूच्या पायांशी आणू.’ त्या दृष्टीने त्या दोघांचे प्रयत्नही चालू आहेत. हिंदू म्हणतात, ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।’ (अर्थ : संपूर्ण विश्वाला आर्य, म्हणजे सुसंस्कृत करू.); पण कृती मात्र काहीच करत नाहीत. ही निष्क्रीयता हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालणारी आहे. हिंदूंनो, सन्मानाने जगायचे असेल, तर स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि हिंदु धर्माचा प्रसार, हिंदुजागृती अन् धर्मरक्षण हा मार्ग अवलंबण्याची शपथ घ्या ! यासंदर्भात करायच्या काही कृती पुढे दिल्या आहेत.

  • १. स्वतः धर्मशिक्षण घेणे : स्वतः धर्मशिक्षण घेतल्याने आपल्याला हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येईल. हिंदु धर्माचे महत्त्व कळल्याने स्वतःतील धर्माभिमान वाढेल. धर्माभिमान वाढल्यावर हिंदु धर्माचा प्रसार परिणामकारकपणे करता येईल. ‘सनातन संस्थे’सारख्या आध्यात्मिक संस्थांच्या सत्संगाला जाणे, सनातन-निर्मित अध्यात्मविषयक ग्रंथांचा अभ्यास करणे यांसारख्या कृती करून धर्मशिक्षित व्हा !
  • २. हिंदु धर्माचा प्रसार करणे
    • अ. स्वतःचे घर आणि दुकान यांच्या दर्शनी भागातील भिंतींवर धर्मशिक्षण देणारी आणि हिंदु धर्माची महती सांगणारी माहिती रंगवून घ्या !
    • आ. धर्मशिक्षण देणार्‍या संघटनांच्या ‘धर्मशिक्षणवर्ग’, ‘बालसंस्कारवर्ग’ इत्यादी उपक्रमांसाठी स्वतःची जागा वा धन द्या, या उपक्रमांचे आयोजन करा !
    • इ. सार्वजनिक ठिकाणी आणि देवळांत ‘सनातन संस्था’ निर्मित धर्मशिक्षण देणारे फलक प्रदर्शित करा !
  • ३. हिंदुजागृती करणे
    • अ. हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म विषयक जागृती करणारे लिखाण प्रतिदिन सार्वजनिक फलकांवर लिहा !
    • आ. हिंदु धर्मावरील आघात, काश्मिरी हिंदूंच्या व्यथा इत्यादींविषयी जागृती करणार्‍या प्रदर्शनांचे आयोजन करा !
    • इ. हिंदु संघटना, राजकीय पक्ष, संप्रदाय इत्यादींना हिंदूंना धर्मशिक्षण देणे अन् धर्मरक्षण या कार्यांत सक्रीय सहभागी होण्याविषयी पत्रे पाठवणे, प्रत्यक्ष भेटी घेणे इत्यादींद्वारे आवाहन करा !
  • ४. धर्मरक्षण करणे
    • अ. पूर, दंगली इत्यादी आपत्समयी संकटात सापडलेल्या हिंदूंना सर्वतोपरी साहाय्य करण्याचा प्रयत्न करा !
    • आ. धार्मिक उत्सवांत बळाने वर्गणी वसूल करणे, ध्वनीप्रदूषण, संस्कृतीहीन कार्यक्रम आदी अनुचित प्रकार रोखा !
    • इ. व्याख्याने, पुस्तके इत्यादींच्या माध्यमातून हिंदु धर्म, देवता, संत आदींवर टीका करणार्‍या धर्मद्रोही संघटनांच्या विरोधात आवाज उठवा !
    • ई. हिंदूंच्या देवतांचे विडंबन करणारी विज्ञापने असणारी उत्पादने, विडंबनात्मक कार्यक्रम (उदा. नाटके, चित्रपट, संमेलने) यांना, तसेच हिंदूंना ‘अतिरेकी’ म्हणून हिणवणार्‍या प्रसारमाध्यमांना विरोध करा आणि त्यांच्यावर बहिष्कार घाला !
    • उ. ‘हिंदुद्रोही कायद्यांना विरोध करा !’, यांसारख्या धर्मरक्षणाच्या चळवळी, तसेच हिंदुहिताची सर्व आंदोलने यांत सहभागी व्हा !

‘हिंदु जनजागृती समिती’ या उपरोल्लेखित विषयांसंदर्भात वैध (सनदशीर) मार्गाने कार्यरत आहेत. आपणही या कार्यात प्रतिदिन थोडासा वेळ अथवा धन अथवा अन्य शक्य त्या गोष्टी अर्पण करून सहभागी व्हा ! तसेच उपरोल्लेखित कृती करण्याच्या संदर्भात साहाय्य हवे असल्यास ‘हिंदु जनजागृती समिती’ आपणास ते करतील.

आ. हिंदु धर्माची अलौकिकता जगासमोर आणा !

‘येशूच्या मृत्यूने आणि त्याच्या रक्ताने जगातील पाप धुऊन गेले’, असे खिस्ती सांगतात. अशाने ‘आपली पापे धुणारा कोणीतरी आहे’, असे म्हणून पाप करायला समाज मोकळा नाही का होणार ? अशी शिकवण न देता ‘मानवाकडून पापाचरण होऊच नये’, अशी शिकवण हिंदु धर्म देतो. इस्लाम ‘काफिरांना ठार मारा’, अशी शिकवण देतो, तर हिंदु धर्म नास्तिकांचे शिरोमणी शोभतील, अशा चार्वाकांना ऋषीपद देतो.  प्रत्यक्ष देवतांचे अस्तित्व नाकारणार्‍यांनाही हिंदु धर्माने कधी तलवारीच्या पात्यावर ठेवले नाही. हिंदु धर्मामध्ये दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. या धर्मात आत्म्याचे निरीक्षण आहे. दया, प्रीती, व्यापकता आणि सर्वसमावेशकता आहे. हा धर्म संपूर्ण मानवजातीला सर्वोच्च आणि सातत्याने मिळणार्‍या आनंदाकडे घेऊन जाणारा आहे. तो व्यक्ती आणि समाज यांच्यात धार्मिक उन्माद निर्माण करत नाही. अशी अलौकिकता अन्य कुठल्या धर्मात पहायला मिळते का ? आज हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान जगाला सांगण्याची वेळ आली आहे. हिंदूंनो, या धर्मकार्यात स्वतःला झोकून द्या आणि सार्‍या जगाला उच्चरवाने सांगा, ‘अद्वितीय हिंदु धर्म हीच
जगताची आधारशिला आहे !’

संदर्भ : ‘हिंदू जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण’ एवं ‘धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान !