सारणी
- १. येशूच तारणहार असल्याचे बिंबवणे
- २. प्रलोभने दाखवणे
- ३. खिस्त्यांचे कथित औदार्यपूर्ण सेवाकार्य
- ४. दुर्गम भागातील हिंदूंना लक्ष्य करण
- ५. कारागृहातील बंदीवानांना लक्ष्य करणे
- ६. अज्ञानी हिंदूंची फसवणूक
- ७. हिंदु धर्मियांप्रमाणे आचरण करण्याचे नाटक !
- ८. हिंदु धर्मावर टीका करणे
- ९. हिंदूंशी विवाह करणे
- १०. बळाचा वापर करणे
- ११. धर्मांतर करण्याची अन्य माध्यमे
हिंदूंच्या खिस्तीकरणासाठी खिस्ती धर्मप्रचारकांकडून विविध डावपेच वापरले जातात. या डावपेचांची प्रातिनिधिक उदाहरणे, प्रसंग अन् अनुभव पुढे दिले आहेत.
१. येशूच तारणहार असल्याचे बिंबवणे
अ. पत्र
‘येशूच तारणहार आहे, म्हणून खिस्ती धर्म स्वीकारा’, अशा आशयाची पत्रे हिंदूंना मिशनर्यांकडून पाठवण्यात येतात. ऑक्टोबर २००७ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील आक्सापूर येथील शिक्षक श्री. भळके यांना एका खिस्ती मिशनर्याने असेच एक पत्र पाठवले होते. ‘अशा आशयाचे पत्र तुमच्या ओळखीच्या लोकांनाही पाठवा’, असेही श्री. भळके यांना या पत्रातून सांगण्यात आले होते.
आ. पत्रके
विविध चर्चकडून येशूच तारणहार असल्याचे बिंबवण्यासाठी स्थानिक ठिकाणी त्या आशयाची पत्रके वाटली जातात. ‘मुंबईच्या धारावी परिसरातील ‘दी पॉटर्स हाऊस’ या चर्चने वाटलेल्या पत्रकांत ‘येशूने कहा मार्ग, सत्य, जीवन मैं हूं । जो मुझपर विश्वास करेगा, वह मरकर भी जिएगा ।’, असे लिखाण होते. ‘येशू आजार बरे करतो. काळी जादू, मूठ, करणी, वशीकरण यांपासून मुक्ती देतो’, असेही त्या पत्रकांत म्हटले होते.’
इ. पुस्तके
- १. रेल्वेस्थानकावर खिस्त्यांकडून धर्मप्रसार करणार्या पुस्तिकांचे निःशुल्क वितरण : रेल्वेस्थानकांवर खिस्ती धर्मप्रचारक हिंदु प्रवाशांना खिस्ती धर्माचा प्रचार करणार्या पुस्तिका विनाशुल्क वाटतात. या पुस्तिका मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांत असतात. कंटाळवाणा रेल्वेप्रवास सुकर होण्यासाठी हाती जे येईल, ते वाचण्याची प्रवाशांची मानसिकता असते. त्यामुळे रेल्वेस्थानकावर वाटली जाणारी पुस्तिका प्रवाशांकडून वाचली जाईल, याविषयी खिस्ती प्रचारक निश्चिंत असतात.
- २. येशूविषयीच्या विनामूल्य पुस्तिकांसह धर्मांतरविषयक आवेदनपत्र देणे : येशूविषयीच्या विनामूल्य पुस्तिकांसह एक लहानसे आवेदनपत्र (फॉर्म) खिस्ती प्रचारकांकडून दिले जाते. त्यात शेवटी प्रतिज्ञेत म्हटले असते, ‘माझ्या पापांमुळे येशूला क्रुसावर चढून मरावे लागले. यासाठी ईश्वराने मला क्षमा करावी. णी आजपासून माझा उद्धारकर्ता म्हणून येशू खिस्ताला मानण्याचे निश्चित केले आहे.’ या प्रतिज्ञेनंतर स्वतःचे नाव, पत्ता, वय इत्यादी लिहिण्यासाठी जागा सोडण्यात आली असते. हे आवेदनपत्र पाठवण्यासाठी स्थानिक चर्चचा पत्ता दिलेला असतो.
र्इ. ‘येशूच्या भजल्यास स्वर्गप्राप्ती होते’, असे सांगणार्या नाटकाचे आयोजन !
२९.८.२००९ या दिवशी मडगाव (गोवा) येथे सादर करण्यात आलेल्या ‘स्वर्ग के फाटक और नर्क की आग’ या नाटकाद्वारे ‘येशूला भजल्यास स्वर्गप्राप्ती होईल’, असे दाखवण्यात आले. या नाटकात पुढील प्रसंग होते.
- १. दोन कामगारांपैकी येशूला मानणारा एक जण दुसर्याला येशूला भजण्यास सांगतो. ‘मी अनेक पापे केली असल्याने येशूचे नाव कसे घेऊ’, असे दुसरा विचारतो. त्यावर पहिला त्याला म्हणतो, ‘‘येशू तुझी सर्व पापे धुऊन टाकील.’’ यानंतर दोघेही येशूला प्रार्थना करतात. तेवढ्यात त्यांच्यावर भिंत कोसळून दोघेही मरण पावतात. त्यांनी येशूचा स्वीकार केल्याने ते मेल्यावर स्वर्गात जातात.
- २. अँथनी हा धनवान, सामाजिक कार्यकर्ता अन् येशूला न मानणारा असतो, तर पुंडलीक हा साधा दुकानदार असतो अन् त्याने येशूचा स्वीकार केलेला असतो. र्े दोघेही अपघातामध्ये मरण पावतात. पुंडलीक याने येशूला स्वीकारल्यामुळे त्याला स्वर्गप्राप्ती होते अन् अँथनीने येशूला न स्वीकारल्यामुळे त्याला नरकात जावे लागते.
उ. वैयक्तिक संपर्क
- १. अडले-नडलेले हिंदू यांच्या घरी जाऊन खिस्ती मिशनरी प्रार्थना म्हणतात.
- २. उच्चभ्रू वसाहतींतील तरुणांना व्यसनांपासून वा अंमली पदार्थांपासून मुक्ती देण्याच्या नावे पंचतारांकित हॉटेल्समध्ये बोलावतात. तेथे विदेशी गायक अन् धर्मप्रसारक त्यांच्याशी संगीत, नृत्य आदींद्वारे जवळीक साधून त्यांचे धर्मांतर करतात.
- ३. येशूच्या चित्रकथा आणि अॅनिमेटेड चित्रपट यांचे विनामूल्य वितरण करणे.
- ४. प्रवासात लहान मुलांना येशूविषयी सांगून भुलवण्याचा प्रयत्न.
२. प्रलोभने दाखवणे
- १. निर्धन हिंदु मुलांना त्यांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्याचे प्रलोभन दाखवणे
- २. हिंदु विद्यार्थ्यांना खेळण्यांसह बायबलच्या प्रती देणे
- २. कामधंद्याच्या शोधात असलेले तरुणांना उच्चपदाच्या नोकरीचे, व्यवसाय चालू करून देण्याचे आमीष दाखवणे.
- ३. निर्धन हिंदूंना धान्य, कपडे, पैसे, शिक्षण, औषधे आदींचे प्रलोभन दाखवणे.
- ४. अपघातग्रस्त किंवा नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना पैसे आणि साहाय्य यांचे प्रलोभन दाखवणे.
३. खिस्त्यांचे कथित औदार्यपूर्ण सेवाकार्य
‘खिस्ती मिशनर्यांनी चालवलेली विविध औदार्यपूर्ण कामे, म्हणजे धर्मांतराचे त्यांचे कार्य निर्विघ्नपणे चालावे, यासाठी धारण केलेले मुखवटे आहेत. ‘स्वतःचे संख्याबळ वाढवून त्याच्या सामर्थ्यावर स्वतःसाठी एक खिस्ती राज्य उभे करायचे’, ही महत्त्वाकांक्षा त्यांच्या या
सर्व हालचालींच्या मुळाशी आहे. या एकाच उद्देशाने ते कोट्यवधी रुपये व्यय करत आहेत.’ – नियोगी आयोग, मध्यप्रदेश (१९५५)
अ. समाजसेवी संस्था
वृद्धाश्रम, कुष्ठरोग निर्मूलन संस्था, परित्यक्तागृहे, शाळा इत्यादी सेवाकार्यांच्या आडून हिंदूंच्या धर्मांतराचे काम मिशनरी करत आहेत. सेवाकार्य करणारे खिस्ती जणूकाही जगातील सगळे सौजन्य त्यांच्याकडेच आहे, असे वागतात. त्यामागे धर्मांतर करण्याचा त्यांचा उद्देश आहे, हे विलंबाने लक्षात येते.
आ. रुग्णसेवा अत्यंत प्रेमपूर्वक करत असल्याचे खिस्त्यांचे नाटक
रुग्णसेवा करणार्या समस्त खिस्ती मिशनर्यांचा हेतू रुग्णांचे धर्मांतर करणे, हाच असतो. अमेरिकी फादर जॉन्सन सांगतात, ‘‘रुग्णालये उभारून आम्ही लोकांचा विश्वास संपादन करतो.’’ याचाच अर्थ रुग्णालयामध्ये रुग्णांची सेवा करणे, हे खिस्त्यांसाठी धर्मांतराचे साधन होते आणि आहे.
इ. अनाथालये
‘चर्चशी संबंंधित कुठल्याही अनाथालयात मूलतः हिंदु असणारी; पण आता स्वतःची मुळे पूर्णपणे उखडली गेलेली लहान-मोठी मुले
पहावयास मिळतात. ज्यांना कोणीच वाली नाही, अशा मुलांना मिशनरी स्वतःच्या जाळ्यात ओढतात. त्याखेरीज आई-वडील निर्धन असणार्या मुलांना उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवून अनाथालयात आणले जाते आणि त्यांचे धर्मांतर केले जाते. अशा अनाथालयांतून मुला-मुलींच्या विक्री झाल्याची प्रकरणेही घडली आहेत. काही वर्षांपूर्वी पुणे येथे एका खिस्ती अनाथालयातून अनाथ मुलांची विक्री केल्याच्या प्रकरणी काही जणांना अटकही झाली होती.
र्इ. आश्रमशाळा
‘पुण्यातील ‘महाराष्ट्र हौसिंग बोर्ड’ येथील ‘गुरुकुल गोदावरी बालकाश्रम’ या संस्थेचे खिस्ती व्यवस्थापक मॅथ्यू यानमल यांनी आश्रमशाळेतील हिंदु मुलींचे धर्मांतर केल्याची माहिती जून २०१० मध्ये संबंधित मुलींनीच दिली. मॅथ्यू यानमल यांनी विविध चर्चसमवेत संगनमत करून अनेक मुलांचे धर्मांतर केले होते. त्यांनी या नवखिस्ती मुलांचा अन्यत्र धर्मांतर घडवण्यासाठी वापर केला असण्याची शक्यता आहे.’
उ. खिस्त्यांचे बालकांची काळजी वहाण्याचे ढोंग
‘वर्ल्ड व्हीजन’, ‘ईशवाणी’ इत्यादी संस्था दरिद्री, पीडित अन् असाहाय्य मुलांची छायाचित्रे असलेली आवाहनपत्रे वाटतात. त्यात म्हटले असते, ‘वर्षाला काही सहदाा रुपये दान देऊन या मुलांपैकी एका मुलाचे पालक व्हा.’ प्रत्यक्षात हा जमा झालेला निधी त्या मुलांपर्यंत पोहोचतच नाही. धर्मप्रसारक तो धर्मांतरासाठी वापरतात.’ – सुनीला सोवनी
४. दुर्गम भागातील हिंदूंना लक्ष्य करण
दुर्गम भागातील हिंदूंवर खिस्ती मिशनर्यांनी सध्या लक्ष केंद्रित केले आहे. याविषयीचा एक अनुभव पुढे दिला आहे. ‘हिंदूंचा पवित्र रामसेतू असलेल्या रामेश्वर (तामिळनाडू) येथे एक जुने पडलेले चर्च आणि दुसरे भव्य नवीन चर्च पाहून मला आश्चर्य वाटले. जाण्यासाठी अतिशय कठीण मार्ग असलेल्या या दुर्गम गावाची लोकसंख्या अल्प असली, तरी तेथील झोपड्यांवरसुद्धा ‘क्रॉस’ दिसले. या वेळी तेथे ७-८ नन्स दिसल्या. त्या तेथील वस्तीत फिरत होत्या़ दुर्गम भागात खिस्त्यांकडून धर्मांतर पद्धतशीरपणे चालू आहे, हे माझ्या लक्षात आले.’ – श्री. धीरज बेंगरूट, पुणे (१.३.२००९)
५. कारागृहातील बंदीवानांना लक्ष्य करणे
एका राज्यातील एका मुख्य कारागृहात काही मास राहिलेल्या एका हिंदु बंदीवानाने तेथील खिस्ती धर्माच्या प्रसाराविषयी सांगितलेली माहिती पुढे दिली आहे.
अ. प्रार्थनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे
कारागृहात खिस्ती मिशनरी प्रत्येक गुरुवारी प्रार्थनेचा कार्यक्रम ठेवतात. प्रत्येक बंदीवानाला ‘प्रार्थनासभेला या’, असे आमंत्रण दिले जाते. प्रार्थनेसाठी नियमित जाणार्या बंदीवानांना गळ्यात घालण्यासाठी ‘क्रॉस’, खिस्ती पंथाची ५१ मण्यांची जपमाळ, येशूची कुठेही चिकटवता येतील, अशी पुष्कळ छायाचित्रे आणि एक बायबल दिले जाते.
आ. हिंदु बंदीवानांना प्रलोभने दाखवणे
- उपयुक्त वस्तू देणे : खिस्ती मिशनरी कारागृहात हिंदु बंदीवानांना लेखण्या, वह्या, तसेच खोल्यांमध्ये बसून खेळता येतील, असे खेळ भेट देतात. अल्प शिकलेल्या बंदीवानांना पत्रव्यवहाराच्या पाठ्यक्रमाची पुस्तके आणून देतात.
- नाताळाला प्रत्येक बंदीवानास १०० रुपयांपर्यंत भेटवस्तू देणे : नाताळच्या वेळी खिस्ती मिशनरी कारागृहात कार्यक्रम ठेवतात आणि बंदीवानांना आकर्षित करण्यासाठी एक हातरुमाल, टूथब्रश, टूथपेस्ट, प्रâूटीसारखे पेय, अन्य शीतपेये अन् मिठाई अशा १०० रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू देतात.’ – एक हिंदू (२०१०)
६. अज्ञानी हिंदूंची फसवणूक
अ. कथित चमत्कार करणार्या पेट्यांच्या माध्यमातून फसवणूक
‘केरळमध्ये, विशेषत: समुद्रतटावरील निर्धन हिंदूंच्या वस्त्यांमधील चर्चमध्ये ‘चमत्कार करणार्या पेट्या’ ठेवण्यात आल्या आहेत. तेथील निर्धन हिंदूंना त्यांची इच्छा एका कागदावर लिहून या पेट्यांमध्ये टाकण्याचे आवाहन केले जाते. भोळे हिंदू ‘मच्छीमारीची बोट हवी आहे, मुलांच्या शाळेचे शुल्क भरण्यासाठी पैसे हवेत’, अशा इच्छा लिहून त्या चिठ्ठ्या या ‘चमत्कार करणार्या पेट्यां’मध्ये टाकतात. दोन आठवड्यांनंतर खिस्ती मिशनरी त्या सर्वांच्या इच्छा-आकांक्षा या पेट्यांच्या माध्यमातून पूर्ण करतात. याला दैवी चमत्कार समजून या निर्धनांची कुटुंबेच्या कुटुंबे खिस्ती धर्म स्वीकारतात.’ – फ्रन्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार (२००६)
आ. प्रार्थना आणि आशीर्वाद सभा !
वसई (जिल्हा ठाणे) येथील ‘प्रार्थना-आशीर्वाद’ केंद्रात चालणारे धर्मांतर ! : ‘वसई (जिल्हा ठाणे) येथील ‘प्रार्थना-आशीर्वाद’ हे खिस्त्यांचे केंद्र दोन एकरांपेक्षाही अधिक जागेत वसलेले आणि ५ ते ६ सहदाा लोक बसू शकतील, अशी व्यवस्था असलेले आहे. ‘या केंद्रात सर्व प्रकारचे शारीरिक आजार बरे केले जातात’, असा समज पसरलेला असल्याने शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या मध्यमवर्गीय व्यक्ती येथे येतात. येथे येणार्या प्रत्येकाला सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत थांबणे सक्तीचे असते. प्रत्येक शुक्रवारी हिंदीतून आणि शनिवारी अन् रविवारी मराठीतून येशूची प्रार्थना केली जाते. केंद्राकडे उपचारांसाठी येणार्या हिंदूंकरता भुईगाव ते वसई स्थानक अशी बसगाड्यांची विनामूल्य व्यवस्थाही केली जाते. या केंद्रातील व्यासपिठावर खिस्ती अनुयायी वेगवेगळे खोटेनाटे चमत्कार करून दाखवतात. त्यानंतर व्यासपिठाच्या एका बाजूस खिस्ती अनुयायांना आणि दुसर्या बाजूस काही रुग्णांना उभे केले जाते. या रुग्णांमध्ये केंद्रात काम करणारे
काही खिस्ती अनुयायी गुपचूप मिसळतात. विशिष्ट मंत्रोच्चार केल्यावर त्यांतील काही अनुयायी अंगात आल्याप्रमाणे नाटक करू लागतात. ‘हे रुग्ण रोगमुक्त झाले’, असे सांगितले जाते. चार आठवडे नियमितपणे या केंद्रात येऊनही शारीरिक व्याधी पूर्णपणे बरी न झाल्यास अशा रुग्णांसाठी ४ दिवसांचे विशेष शिबीर घेतले जाते. त्यात येशूची महती सांगून त्यांच्याकडून खिस्ती धर्माचे पालन करवून घेतले जाते. त्यानंतर ‘येशूच पालनकर्ता आहे. तुम्ही आता येशूचे झालात. यापुढे येशूने सांगितलेल्या धर्माचेच पालन करा’, असे सांगण्यात येते. अशा प्रकारे ४ सप्ताहात हिंदु रुग्ण जाळ्यात अडकला नाही, तर शिबिराच्या माध्यमातून त्याच्या धर्मांतराचा प्रयत्न केला जातो.’ – कु. नेहा मुकुंद घाणेकर आणि कु. रिमा लिपारे, ठाणे.
७. हिंदु धर्मियांप्रमाणे आचरण करण्याचे नाटक !
‘हिंदूंच्या धर्मांतराचे कार्य हिंदु संस्कृती अन् परंपरा यांचा स्वीकार केल्यास वेगाने करता येईल’, असे चर्चला वाटते. यासाठी हिंदु संस्कृती, प्रथा आणि वेशभूषा यांचा वापर खिस्ती प्रचारकांकडून पद्धतशीरपणे केला जातो.
अ. वर्तमानातील काही उदाहरणे
- १. दक्षिण भारतातील अनेक चर्चचे रूपांतर आश्रमांमध्ये करण्यात आले आहे.
- २. चर्चचे फादर अन् नन्स स्वतःला ‘आचार्य’, ‘साध्वी’ अशा उपाध्या लावतात.
- ३. चर्चमधील चॅपेल (प्रार्थनागृह) मेणबत्त्यांऐवजी निरांजनांनी सजवले जाते.
- ४. चर्चचे प्रवेशद्वार हिंदूंच्या मंदिरांप्रमाणे भासेल, याची दक्षता घेतली जाते.
- ५. काही संघटना हिंदूंना जवळची वाटणारी ‘ईशवाणी’, ‘श्रीवाणी’, तसेच ‘नोबेलियन’च्या जागी ‘ज्ञानपीठ’ इत्यादी नावे धारण करतात.
- ६. खिस्ती शाळांमधून भरतनाट्यमही शिकवले जाते; मात्र त्यातील वैदिक मुद्रांच्या जागी खिस्ती मुद्रा वापरल्या जातात.
- ७. ‘इव्हान्जेलिकल चर्च’चे चिन्ह तर कमळात बसवलेला ‘क्रॉस’ असे आहे.
अा. हिंदूंच्या धर्मग्रंथांप्रमाणे बायबलची रचना करणे आणि त्यात देवीच्या वेशभूषेत ‘मदर मेरी’ला दाखवणे
‘भगवद्गीता, रामायण, महाभारत या हिंदूंच्या धर्मग्रंथांतील काही श्लोक अंतर्भूत असलेली बायबलची भारतीय आवृत्ती काढण्यात आली आहे. तिच्यात ‘मदर मेरी’ने साडी परिधान केल्याचे अन् कपाळाला कुंकू लावल्याचे दाखवले आहे. या आवृत्तीत बायबलमधील १० आज्ञांची
सांगड हिंदु धर्मातील सत्य, ब्रह्मचर्य, शांती आदी दहा तत्त्वांशी घातली आहे.’
इ. ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या परंपरांचा अवलंब !
- १. केरळमधील चर्चमध्ये बायबलच्या वाचनाला ‘वेदपठण’ म्हणतात. तेथे काही चर्चसमोर ‘तीर्थक्षेत्र’ नावाचा फलक आहे.
- २. काही चर्च मंगळवारी आणि शुक्रवारी हिंदूंना आकर्षित करण्यासाठी, अर्थात हिंदूंनी या वारी देवीच्या देवळात जाऊ नये, यासाठी प्रार्थनेचे आयोजन करतात.
- ३. अनेक चर्चसमोर मंदिरांप्रमाणे गरुडस्तंभाप्रमाणे ‘क्रॉस’स्तंभ उभारलेला आहे.
८. हिंदु धर्मावर टीका करणे
हिंदूंच्या अंतःकरणातील रुजलेली स्वधर्मश्रद्धा नष्ट करणे, ती श्रद्धा छिन्नविच्छिन्न केली की, त्यांच्या मनात एक प्रकारची पोकळी
निर्माण होते. मग खिस्ती धर्माने ती पोकळी भरून काढणे, हे खिस्त्यांनी हिंदु धर्मावर टीका करण्याचे कारण.
- हिंदु धर्मातील प्रथांमुळे लाभ होण्यापेक्षा अनेकांची हानी झाल्याचे सांगणे
- हिंदूंमधील जातीव्यवस्थेचा अनुचित लाभ घेऊन हिंदु धर्माला ‘ब्राह्मणी धर्म’ असे हिणवून ब्राह्मणद्वेष पसरवणे आणि
हिंदूंना येशूकडे वळवण्याचा प्रयत्न करणे
९. हिंदूंशी विवाह करणे
काही धर्मवेडे खिस्ती तरुण आणि तरुणी एकातरी हिंदूचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने विवाहासाठी हिंदु व्यक्तीची निवड करतात आणि तिच्यावर विवाहापूर्वी वा विवाहानंतर खिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणतात.
१०. बळाचा वापर करणे
- १. कर्नाटकमधील चर्चमध्ये धर्मांतरासाठी हिंदु मुलींचा छळ !
- २. वनवासी भागातील हिंदूंना धर्मांतरासाठी मारहाण केली जाणे
- ३. दबावतंत्रांचा वापर करणे
- अ. एका धर्मांतरिताने त्याच्या पूर्ण कुटुंबाला खिस्ती करावे, यासाठी त्याच्यावर दबाव आणणे
- आ. धर्मांतर न करणार्या हिंदूंना जिवे मारण्याची धमकी !
- ४. आपद्ग्रस्त मुलांचे अपहरण !
- ५. त्रिपुरात बाप्तीस्ट चर्चने जातीय दंगे घडवून धर्मांतराचा हेतू साध्य करणे
- ६. धर्मांतरासाठी आतंकवाद्यांचे साहाय्य !
११. धर्मांतर करण्याची अन्य माध्यमे
- अ. हिंदूंसाठी शिबिरे अन् सहली यांचे आयोजन !
- आ. नृत्य शिकवणे आणि नाताळचे आतिथ्यभोजन देणे भाषेच्या माध्यमातून धर्मांतर
- इ. स्थानिक भाषा रोमन लिपीत लिहिण्यास प्रोत्साहन देणे : खिस्त्यांकडून स्थानिक भाषा रोमन लिपीत लिहिण्याचा पुरस्कार केला जातो. त्यामागे ‘त्या लिपीत छापल्या गेलेल्या खिस्ती धर्माच्या वाङ्मयाचा प्रसार सुलभ व्हावा’, हा हेतू आहे.
संदर्भ : ‘हिंदू जनजागृती समिती’ पुरस्कृत ग्रंथ ‘धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान !’
1 Comment
Comments are closed.