मंदिर सरकारीकरणाच्या व्यतिरिक्त मूर्तीभंजन आणि मंदिरांतील चोर्या यांच्या विरोधात समितीने गोव्यात एक मोठी चळवळ उभी केली होती. त्याविषयी थोडक्यात सांगणे अगत्याचे वाटते.
१. गोवा शासनाने ३५० हून अधिक मंदिरे आणि घुमट्या यांना अनधिकृत ठरवणे आणि त्या विरोधात हिंदुत्ववाद्यांनी आंदोलन करणे
सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार गोवा शासनाने ३५० हून अधिक मंदिरे आणि घुमट्या अनधिकृत ठरवल्या होत्या. यात श्री दामोदर देवस्थान, फातर्पा; श्री महादेव देवस्थान, साकोर्डा आदी ४५० वर्षांहून अधिक पुरातन आणि गोव्याचा आध्यात्मिक वारसा असलेल्या मंदिरांचाही समावेश होता.
याविषयी हिंदुत्ववादी संघटना आणि मंदिरांचे विश्वस्त यांनी आंदोलन केल्यानंतर शासनाने काही मंदिरांना वगळून नवीन सूची सिद्ध केली. लवकरच या सूचीतील मंदिरे उद्ध्वस्त केली जातील.
२. गेल्या ८ वर्षांमध्ये एकाही मूर्तीभंजकाला अटक न होणे
गोव्यात २००४ सालापासून आतापर्यंत हिंदुद्वेष्ट्यांनी ३५ हून अधिक मंदिरांमधील ५५ हून अधिक देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली आहे. मूर्तीभंजनाच्या घटनांमध्ये इतकी वारंवारता असूनही त्याविषयी गोव्यातील शासनाने एकाही मूर्तीभंजकाला साधी अटकही केलेली नाही.
http://www.hindujagruti.org/activities/campaigns/religious/save-temples/goa-idol-desecration/
३. मंदिरांत चोर्या घडूनही एकाही गुन्हेगाराला अटक न होणे
गोव्यात गेल्या ११ महिन्यांत ६० हून अधिक मंदिरांत, तर गेल्या काही वर्षांत २५० हून अधिक मंदिरांत चोर्या होण्याच्या घटना घडूनही अद्याप एकाही गुन्हेगाराला अटक झालेले नाही.
४. विविध आंदोलनांद्वारे शासनाला जागे करणे
याविरुद्ध शासनाला जागे करण्यासाठी समितीने विविध प्रकारे आंदोलने केली, तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला. ही चळवळ पुढेही चालू रहावी, यासाठी छोट्या आणि मोठ्या मंदिरांच्या विश्वस्तांचे संघटन करून ‘गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’ची स्थापना करण्यात आली आहे.
मंदिरे ही हिंदूंची आधारशिला आहे. त्यांचे रक्षण केले, तरच हिंदु संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन होईल, हा दृष्टीकोन ठेवून समितीने ही आंदोलने केली आणि ईश्वराच्या कृपेने त्यात यशही येत आहे. आपण सर्व संघटनांनी या दृष्टीने राष्ट्रव्यापी आंदोलन चालू केल्यास मंदिर सरकारीकरण ही समस्याच नष्ट होईल आणि मंदिरे ही खर्या अर्थाने चैतन्यस्त्रोत बनतील, याची खात्री वाटते.