१. पंढरपूरच्या मंदिर समितीकडून अर्पणात आलेला गोवंश कसायाला विकणे !
महाराष्ट्र शासनाच्या कह्यात असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थानातील गोशाळेला अनेक भक्तमंडळी गायींचे दान करतात. या गायींच्या पोषणाचा खर्च टाळण्यासाठी आणि गायींना विकून उत्पन्न मिळवण्यासाठी मंदिर प्रशासनाने गोवंश कसायांना विकल्याचे उघडकीस आले.
अ. गोवंश कसायाला विकल्याची माहिती मिळताच हिंदू जनजागृती समितीने त्वरित उचललेली पावले
१. २९.६.२०१० या दिवशी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने मंदिर व्यवस्थापनाने केलेल्या गैरकारभाराचा निषेध करून महाराष्ट्र शासनाकडे निवेदन देण्यात आले.
२. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
३. प्रसिद्धीपत्रकाद्वारे हा विषय सर्वदूर पोहोचवला.
४. महाराष्ट्राच्या विधानसभा अधिवेशनातही या प्रकरणी आवाज उठवून मंदिर समिती बरखास्त करण्याची आणि संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. समितीच्या वतीने या प्रकरणाचा पाठपुरावा चालू आहे आणि जनजागृतीही करण्यात येत आहे.
२. पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरचा कोट्यावधि रुपयांचा घोटाळा
हिंदू विधीज्ञ परिषदेने माहितीच्या अधिकाराखाली मिळवली माहिती
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे सरकारीकरण झाले आणि या पवित्र तीर्थक्षेत्री निधर्मी राज्यकर्त्यांच्या पापांचे काळे ढग दाटून आले. शासनाने नियुक्त केलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने गेली काही वर्षे भ्रष्टाचार करून या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य मलीन केले. हा भ्रष्टाचार हिंदू विधीज्ञ परिषदेने माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मिळवून उघड केला आहे. या संदर्भातील पत्रकार परिषद १५ जुलै या दिवशी मुंबई आणि पंढरपूर येथे झाली. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या भ्रष्टाचाराचे नमुन हिशेबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी ठेवल्या जात नाहीत.
- लेखापरीक्षणात यापूर्वी लेखापरीक्षकांनी सांगितलेल्या सुधारणा केलेल्या नाहीत.
- प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी होतो; परंतु दुग्धोत्पादनातून किती उत्पन्न मिळते, याचा तपशील नाही. केवळ गोधनाची विक्री केल्याचे उत्पन्न दिसते.
- ४८ लाख रुपयांपेक्षा अधिक व्यय लेखापरीक्षकांकडून तपासूनच घेतलेला नाही.
- ख्रिस्ताब्द २००७ ते ख्रिस्ताब्द २०१० पर्यंत मंदिराच्या भाडेकरूंचे विजेचे देयक बिर्लामंदिर समितीनेच भरले. गेली १० वर्षे एकाच शासकीय लेखापरीक्षकाकडून लेखापरीक्षण करून घेतले.
- २०००-०१ मध्ये मंदिरात जमा झालेल्या वस्तूंच्या सूचीमध्ये १ सहस्र ४५० मिलीग्रॅम सोन्याचे मूल्य दिलेले नाही. मंदिराच्या दागिन्यांच्या मोजमापात घोटाळा करण्यात आला आहे.
- मंदिराच्या नावावर असलेल्या शेकडो एकर भूमीचा पत्ताच नाही.
- मंदिराच्या गोशाळेतील गोधनाचे संवर्धन न करता गेल्या १० वर्षांत १ लक्ष ४३ सहस्र रुपयांना काही गोधन विकले आहे. यांपैकी काही गायी कसायांना विकल्याचा संशय आहे.
- लेखापरीक्षणातील त्रुटी दूर केल्याच नाहीत.
- लेखापरीक्षणात दागिन्यांची नोंदच नाही, तर ख्रिस्ताब्द २००३ ते २००६ आणि ख्रिस्ताब्द २००९-१० मध्ये दागिन्यांचे मूल्यांकनच केले नाही.
हिंदू जनजागृती समितीच्या मागण्या
१. भ्रष्टाचारी आणि गोवंशाची विक्री करणारे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करा !
२. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थान समिती बरखास्त करा !
३. पंढरपूर देवस्थानासह शासनाच्या कह्यातील सर्व देवस्थाने शासनमुक्त करा !
४. शासनाच्या कह्यातील सर्व मंदिरे भाविकांच्या कह्यात द्या !
वारकर्यांनो, पंढरपूरमधील वारकर्यांच्या पुढील असुविधा कधी दूर होणार, याचा राज्यकर्त्यांना जाब विचारा !
१. पंढरपुरात मद्य आणि मांस यांची विक्री अद्याप चालूच !
२. वारीच्या मार्गात स्वच्छतागृहे, रस्ते, पिण्याचे पाणी यांची कमतरता.
३. चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी किंवा प्रदूषण करणार्यांवर कारवाईसाठी प्रयत्न नाहीत !
४. वारकरी भवन बनवण्याविषयी शासन उदासीन !
Documents indicating misappropriation
Downloads (All information is in Marathi language. Only Audit Report is in English)
• Answer to RTI query by Hindu Vidhidnya Parishad
• Observation report by Officer of Vitthal Mandir Committee
• Pamphlet exposing misdeeds of Vitthal Mandir Committee published by HJS
• Sample report of Audit of Vitthal Mandir Cimmittee
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !
३. पंढरपूर विठ्ठल मंदिराला अर्पण केलेल्या जमीनीचा गैरवापर