शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वराच्या चौथर्यावर चढून महिलेने घेतले दर्शन !
शनिशिंगणापूर (नगर) येथील प्रसिद्ध जागृत आणि स्वयंभू श्री शनैश्वराच्या चौथर्यावर चढून २८ नोव्हेंबर या दिवशी एका महिलेने श्री शनैश्वराचे दर्शन घेतले. गेल्या काही वर्षांपासून पुरुषांनादेखील शनि चौथर्यावर जाऊन दर्शन घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. महिलांसाठी ही बंदी प्रथमपासून लागू होती. देशभरातील अनेक मंदिरांमध्येही धर्मशास्त्राने घालून दिलेले, तसेच पूर्वापार चालत आलेले मंदिरप्रवेशाच्या संदर्भातील नियम आहेत, त्या पाळण्यातच सर्वांचे हीत असते; मात्र तथाकथित पुरोगामी स्त्रीमुक्तीचा ढोल बडवत या परंपरा मोडू पहात आहेत. तमिळनाडू येथील शनीच्या मंदिरावरून अमेरिकेचा उपग्रह जाऊ शकत नाही, असे तीन वेळा सिद्ध झाल्याने अमेरिकेने आता त्याचा मार्ग पालटला आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याचे उत्तर बुद्धीवादी देऊ शकतात का ? धर्माच्या संदर्भात स्त्री-पुरुष समानतेची सूत्रे आणणे, हे हास्यास्पद आहे. देवस्थान किंवा गाभार्यातील उर्जेचा स्त्रियांच्या शरिरावर विपरित परिणाम होऊ नये; म्हणून काही ठिकाणी स्त्रियांना मूर्तीजवळ किंवा गाभार्यात प्रवेश नसतो. येथे धर्माने उलट स्त्रीच्या प्रकृतीची काळजीच घेतलेली असते, हे तथाकथित बुद्धीवादी आणि स्त्रीवादी यांच्या लक्षात येत नाही.
२६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या वतीने कथित स्त्रीमुक्तीचा बागुलबुवा करत धार्मिक जनता, तसेच स्थानिक नागरिक यांच्या विरोधालाही न जुमानता शनीच्या चौथर्यावर चढण्याचा आततायीपणा केला जाणार आहे. मात्र शनिशिंगणापूर येथे धार्मिक प्रथा मोडू पहाणार्या नास्तिकतावाद्यांचा प्रयत्न हाणून पाडणार, तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी ‘हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळ’ व्यापक स्तरावर राबवणार, असा निर्धार नगर येथील हिंदुत्ववाद्यांनी व्यक्त केला आहे.
श्री. संदीप खामकर यांनीही २६ जानेवारीला भूमाता ब्रिगेडच्या वतीने करण्यात येणार्या धर्मविरोधी कृत्यांच्या संदर्भात स्थानिकांमध्ये जागृती केली असून अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून ब्रिगेडचा उपक्रम यशस्वी होऊ देणार नाही, अशी चेतावणी दिली.
‘हिंदु धार्मिक परंपरा रक्षण माेहिम’
२६ जानेवारीला चलाे शनिशिंगणापूर…
कथित पुरोगामी, नास्तिकवादी यांच्यापासून हिंदूंच्या धार्मिक परंपरा आणि प्रथा यांच्या रक्षणार्थ अभियान हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत २६ जानेवारी या दिवशी भूमाता ब्रिगेडचा चौथर्यावर चढण्याचा प्रयत्न निष्फळ करण्यासाठी सर्व धार्मिक, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शनिशिंगणापूर देवस्थानचे रक्षण करणार असून त्याभोवती सुरक्षाकडे करणार आहेत. या अभियानासाठी गावातील महिलांसह महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शनिभक्त उपस्थित रहाणार आहेत. तरी अधिकाधिक महिला-शनिभक्त यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या अभियानात सहभागी होण्यासाठी सर्वत्रचे हिंदुत्ववादी, शनिभक्त आणि धर्माभिमानी हिंदू यांनी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांना ९४०४९५ ६५३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर ९, १० आणि १२ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या माध्यमातून समस्त हिंदूंना हिंदु धार्मिक परंपरा रक्षण चळवळीत सहभागी होण्यासाठी उद्घोष करण्यात येणार आहे. या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.
अभियानास राज्यभरातून अनेक हिंदुत्ववादी संघटना, आध्यात्मिक संस्था, संत-महंत, धर्माभिमानी, शनिभक्त यांचा उत्स्फूर्त पाठिंबा !
शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांना प्रवेशबंदी का ?
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानस्थित असलेल्या शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांना प्रवेशबंदी असतांना एका महिलेने चौथरा चढून शनिदेवाला तेलार्पण केले. या घटनेविषयी एबीपी माझा, आयबीएन् लोकमत इत्यादी दूरचित्रवाहिन्या आणि इतर माध्यमे यांवर स्त्रीमुक्ती, पुरुषसत्ताक संस्कृती, मंदिरसंस्कृतीचा प्रतिगामीपणा, बुरसटलेली विचारसरणी आदी दृष्टीकोनांतून चर्चा चालू आहे. हा विषय धार्मिक दृष्टीकोनातून अधिक महत्त्वाचा आहे; म्हणून सनातनचा दृष्टीकोन येथे दिला आहे.
१. शनिशिंगणापूर येथील शनिदेवाची स्वयंभू मूर्ती चौथर्यावर उभी आहे. मंदिर व्यवस्थापनाने काही वर्षांपूर्वीच चौथर्यावर चढून शनिदेवाला तेलार्पण करण्यास बंदी घातली होती. त्यामुळे सध्या तेथे सर्वच जाती-धर्माचे स्त्री-पुरुष श्री शनिदेवाचे दूरवरून दर्शन घेतात. त्यामुळे तेथे केवळ स्त्रियांना बंदी आहे, असे म्हणणे अयोग्य आहे.
२. अध्यात्मशास्त्रानुसार प्रत्येक देवतेचे कार्य ठरलेले असते. त्या कार्यानुसार त्या देवतेची प्रकटशक्ती कार्यरत असते. शनि ही उग्रदेवता असून तिच्यातील प्रकटशक्तीमुळे महिलांना त्रास होण्याची शक्यता असते. ४००-५०० वर्षांपूर्वी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे मंदिर उभे राहिले. तेव्हापासूनच तेथे स्त्रियांनी चौथर्याच्या खालून दर्शन घेण्याची परंपरा आहे.
३. सुवेरसुतक असतांना, तसेच चामड्याच्या वस्तू (बेल्ट, घड्याळाचा पट्टा) आदी परिधान केलेल्या पुरुषांनाही शनिदेवाच्या चौथर्यावर प्रवेशबंदी आहे. एवढेच नव्हे, तर चौथर्यावर चढण्यापूर्वी पुरुषांनी स्नानाद्वारे देहशुद्धी करणे, तसेच केवळ धूत श्वेतवस्त्र परिधान करणे आवश्यक असते. हे नियम पाळणार्या पुरुषांनाच शनिदेवाच्या चौथर्यावर
प्रवेश आहे.
४. हिंदु धर्मात काही देवतांची उपासना विशिष्ट कारणांसाठी केली जाते. अशा देवतांपैकी एक शनिदेव आहेत. विशिष्ट ग्रहदशा, उदा. साडेसाती आदी काळी त्यांची उपासना केली जाते. ही सकाम साधना असल्याने सकाम साधना करणार्याने त्या साधनेशी संबंधित नियमांचे पालन केले, तरच त्याचे फल प्राप्त होते. मनानुसार नियम केले, तर केवळ मानसिक समाधान मिळेल; पण त्यातून आध्यात्मिक लाभ होणार नाही.
५. हा विषय स्त्रीमुक्तीचा नसून पूर्णतः आध्यात्मिक स्तराचा आहे. त्यामुळे त्याची चिकित्सा सामाजिक दृष्टीकोनातून, तसेच धर्माचा अभ्यास नसणार्यांनी करणे अयोग्य ठरते. एखाद्या विषयातील तज्ञानेच त्या विषयावर चर्चा केली पाहिजे. एखाद्या वकिलाने एखाद्या रुग्णाला औषध देणे जसे अयोग्य असते, तसे एखाद्या धार्मिक विषयावर सामाजिक कार्यकर्त्यांनी दूरचित्रवाहिन्यांवर चर्चा करणे अयोग्य ठरते.
६. शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांना प्रवेश मिळावा, म्हणून स्त्रीमुक्तीचा टाहो फोडणारे धर्मद्रोही मशिदींमध्ये महिलांना प्रवेश मिळावा, म्हणून आरडाओरड का करत नाहीत ?
– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था
बुद्धीप्रामाण्यवादी पत्रकारांकडून अनावश्यक विरोधी प्रश्न
पत्रकार परिषदेच्या वेळी काही बुद्धीप्रामाण्यवादी पत्रकारांकडून श्रीशनिदेवाच्या दर्शनाने महिलांना त्रास होऊ शकतो, याचे वैज्ञानिक पुरावे द्या, अशा स्वरूपाचे अनावश्यक प्रश्न उपस्थित केले जात होते. पत्रकारांचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करूनही चुकीच्या प्रथांना छेद देऊन परिवर्तन करण्याची हिंदु धर्माची परंपरा आहे अशाप्रकारची वक्तव्ये करून अध्यात्मशास्त्र आणि धर्मशास्त्र जाणून घेण्याचा रस दाखवला नाही. (दोन्ही बाजू जाणून घेऊन योग्य बाजू समाजापर्यंत पोहोचवण्याचे दायित्व पत्रकारांचे आहे. कोणत्याही अभ्यासाशिवाय मनात एक बाजू पक्की करून घेऊन विरोधासाठी विरोध करणारे पत्रकार समाजाला योग्य दिशा देऊ शकतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
प्रश्न : शनिदेव उग्र असल्याने देवाच्या दर्शनाने महिलांच्या ओटीपोटावर परिणाम होतो, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे का ? महिलांना त्रास झाल्याचे एकतरी उदाहरण सांगावे. हा तुमचाच प्रसिद्धीचा स्टंट वाटतो.
उत्तर : प्रत्येक गोष्ट वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध होऊ शकत नाही. विज्ञानाचे नियम अध्यात्माला लावता येऊ शकत नाहीत. अध्यात्मशास्त्र हे अनुभूतींचे शास्त्र आहे. अध्यात्माचे नियम समजून घेण्यासाठी त्यासाठी पात्र व्हावे लागते, म्हणजेच त्यासाठी साधना करावी लागते. ज्याची जशी श्रद्धा, तसे त्याला फळ मिळते, असे गुरुचरित्रात सांगितले आहे. ऋषिमुनींनी शेकडो वर्षांपूर्वीच घालून दिलेले नियम चुकीचे असूच शकत नाहीत.
प्रसिद्धीचा स्टंट करण्याची आम्हाला काहीच आवश्यकता नाही. प्रथा-परंपरा मोडण्याचे पुरोगाम्यांनी पहिले घोषित केले. त्यामुळेच आम्हाला धार्मिक परंपरांचे रक्षण करण्याची मोहीम उघडावी लागली. यासंदर्भात आम्ही पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन दिले आहे. हिंदु सहिष्णू आहेत; म्हणून कुणीही उठावे आणि हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा मोडण्याचा प्रयत्न करावा, हे सहन केले जाणार नाही.
प्रश्न : पुरोगामी महिलांना अडवण्यासाठी बळाचा वापर करणार का ?
उत्तर : हिंदु जनजागृती समितीचे सर्व उपक्रम सनदशीर मार्गाने असतात. त्याप्रमाणे शनिशिंगणापूर येथेही सनदशीर मार्गानेच हिंदु धार्मिक प्रथा-परंपरा रक्षण चळवळ राबवण्यात येणार आहे. कुठे आततायीपणा होत असल्याचे निदर्शनास आल्यास आम्ही तेथे उपस्थित असणार्या पोलिसांच्या निदर्शनास आणून देऊ.
प्रश्न : चुकीच्या परंपरांना छेद देऊन सुधारणा करण्याची हिंदु धर्माची परंपरा आहे. तसे येथेही महिला प्रवेशबंदीच्या चुकीच्या प्रथा बंद करायला नकोत का ?
उत्तर : देवदर्शन आणि चौथर्याचे पावित्र्य जपणे हा कर्मकांडाचा भाग येतो. कर्मकांडातील कृतींसाठी असलेले नियम पाळायलाच हवेत.
प्रश्न : महिलांच्या चौथर्यावरील प्रवेशामुळे देवाला काही होणार नाही. तुमच्या म्हणण्यानुसार पुरोगामी महिलांवरच त्याचा परिणाम होणार. मग तुम्ही त्यांच्या रक्षणासाठी मोहीम राबवत आहात का ?
उत्तर : देव अथवा पुरोगामी महिला यांच्या रक्षणासाठी नाही, तर धार्मिक प्रथा-परंपरा यांचे रक्षण व्हावे; म्हणून ही मोहीम राबवण्यात येत आहे.
श्री शनिशिंगणापूर येथील परंपरांच्या रक्षणाच्या मोहिमेच्या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत. हे आंदोलन कसे उभे राहिले ? त्यातील हिंदुत्ववाद्यांचा सहभाग, ग्रामस्थांची श्रद्धा, ईश्वराने साहाय्य केल्याविषयी आलेल्या अनुभूती आदी सूत्रे आपण या लेखातून पाहू.
नुकतेच एका महिलेने शनिदेवाच्या चौथर्यावर चढून देवाला तेल वाहिले. त्यामुळे सर्वत्र गदारोळही झाला. आता देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर दोन महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने श्री शनैश्वर देवस्थानचा इतिहास, पूर्वीचे निष्ठावंत विश्वस्त आणि राजकीय हस्तक्षेपामुळे झालेली हानी यांसंदर्भात नगर येथील मढी देवस्थानचे विश्वस्त श्री. मिलिंद सदाशिव चवंडके यांनी लिहिलेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.
[relatednews type=”newstags” count=”10″ terms=”shani-shingnapur” show_pagination=”1″]