महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेशबंदी आहे. असे असतांना स्त्रीमुक्तीचा कांगावा करत धर्मशास्त्राचा अभ्यास नसणार्या नास्तिकतावादी भूमाता ब्रिगेडसह अन्य पुरो(अधो)गामी संघटनांच्या महिलांकडून गर्भागृहात प्रवेश करण्याविषयी चेतावण्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरातील ऊर्जास्रोत आणि त्यामुळे निर्माण होणारे परिणाम यांविषयीची माहिती येेथे दिली आहे.
१. त्र्यंबकेश्वर देवालयाच्या गाभार्यात निर्मोण होणार्या ऊर्जा, चैतन्य सहन करण्याची ताकद ज्यांच्या शरिरात आहे, त्याच माणसांना गाभार्यात प्रवेश दिला जातो. त्र्यंबकेश्वरात शुक्ल, पाटणकर, दीक्षित इत्यादि ठराविक पुरोहितांचीच माणसे ठराविक काळात पूजा-अर्चा करतात. त्यांच्या व्यतिरिक्त ज्या मुलांनी गाभार्यात जाऊन पूजा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या अंगावर अनपेक्षितपणे पांढरे चट्टे पडलेले दिसून आले. याचे शास्त्रीय कारण असे की, ज्वालामुखीतून जसा ऊर्जेचा उद्रेक होतो आणि त्यातून गॅमा, अल्फा, क्ष किरण, तसेच इतर धन, ऋण या बारीक विद्युत कणांचा वर्षाव होतो, तसाच ज्योतिर्लिंगातातून होतो. त्र्यंबकेश्वरला हे सारे असे घडते; म्हणूनच आतापर्यंत काही वेळा तीन दिवस, सात दिवस हे त्र्यंबकेश्वराचे मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे, असे तेथील स्थानिक वयस्कर पुरोहितांनी सांगितले.
२. प्राचीन काळी भारतात ज्या ज्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला, त्या त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग निर्माण केली गेली, असे जाणकारांनी सांगितले. ठराविक दिवशी, ठराविक प्रहारात निसर्गतः जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तर तिथले चैतन्य, ऊर्जा, स्पंदने ही नेहमीच्या वेळी असतात, त्यापेक्षा अधिक तापमान निर्माण करणारी असतात. ही स्थिती त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आढळते.
३. ज्या ज्या वेळी पृथ्वीतलावर, विशेषत: भारतावर वैश्विक ऊर्जेशी निगडित वातावरणीय प्रकोप झाले (उदा. भारत-चीन युद्ध, पाकबरोबरचे युद्ध), त्या त्या वेळी किमान १ दिवस हे देवालय बंद ठेवावे लागले होते.
४. त्र्यंबकेश्वर हे शिवयोगयुक्त प्राचीन शिवयोगात वर्णन केलेले तीर्थस्थळ आहे. येथे ब्रह्मा, विष्णु आणि महेश युक्त जललिंग आहे.
(संदर्भ : विश्वचैतन्याचे विज्ञान, पू. डॉ. रघुनाथ शुक्ल, वरिष्ठ शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा)