नव्या पिढीने जनरल जी.डी. बक्शींचे बोस, द इंडियन सामुराई हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. या धारिका वा कागदपत्रे नुकतीच सार्वजनिक झाल्यामुळे गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा यांमुळे भारत स्वतंत्र झाला नसून तो सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजे सावरकरांच्या रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ? यातील सत्य आता नव्या पिढीस उमजेल.
देवतेच्या आशीर्वादामुळे उमाजी नाईक यांना इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड पुकारण्यास मोठे धैर्य मिळाले. आपला देश आणि धर्म यासाठी इंग्रजी सत्तेविरुद्ध बंडाच्या क्रांतीची पहिली मशाल पेटवणारे उमाजी नाईक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले क्रांतिवीर ठरले !
हिंदुस्थानातील ब्रिटीश राज्य आहे तसेच पुढे चालू रहाणे, हे हिंदी लोकांच्या खर्याखुर्या हिताला अत्यंत बाधक आणि नितांत घातक आहे. आदर्श सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टीने कोणत्याही लोकांवर हुकूमशाही किंवा जुलमी स्वरूपाचे सरकार असता कामा नये.
गणेश गोपाळ आठल्ये उपाख्य अण्णा आठल्ये यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८७९ या दिवशी शिपोशी (तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी) येथे झाला. वडिलांच्या सततच्या बदलीच्या नोकरीमुळे शिपोशी, अलिबाग आणि दापोली येथे त्यांचे शिक्षण झाले.
आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस हे जहालमतवादी होते. इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अखेरच्या लढाईचे नेतृत्व करण्याचे कार्य नियतीने नेताजींच्या हाती सोपवले.
स्वातंत्र्यानंतर सत्ता उपभोगणार्या सत्ताधार्यांना क्रांतीकारकाचे मोल काही कळलेच नाही. स्वत:च्या तुंबड्या भरण्यात मग्न असणार्या या राजकर्त्यांनी क्रांतीवीरांचीही उपेक्षाच केली यावर डॉ. शेवडे यांनी या लेखात प्रकाश टाकला आहे.
वन्दे मातरम् हे राष्ट्रगीत वर्ष १८८० मध्ये बंगाली देशभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ या एका ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित कादंबरीत लिहिले आहे. ती घटना संन्याशांचा उठाव म्हणून भारतीय इतिहासात प्रसिद्ध आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म २८ मे १८८३ ) या द्रष्ट्या, क्रांतीकारी देशभक्त अन् अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले आहे ! ‘राष्ट्र’ हेच त्यांचे जीवनमूल्य असल्याने त्यांचे एकमेवाद्वितीय साहित्य हे राष्ट्रहिताच्या अनुषंगानेच प्रसवलेले आहे. साहित्यिकही अनेक असतात आणि क्रांतीकारकही अनेक होऊन गेले; मात्र स्वातंत्र्यवीर सावरकारांसारखा क्रांतीवीर साहित्यिक हा ‘यासम हाच !’
राणी तपस्विनी ही झाशीची राणी लक्ष्मीबाई हिची भाची आणि झाशीचे सरदार नारायणराव यांची कन्या. त्या शक्ति-उपासकच होत्या. साहस आणि धैर्य या गुणांची ती प्रतिमूर्ती होती. राणी लक्ष्मीबाईप्रमाणेच ती घोडेस्वारी, शस्त्रचालन यांचा अभ्यास करीत असे. इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यास त्यांनी सैनिकांचे प्रबोधन केले.
जतींद्रनाथ दास यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९०४ या दिवशी कोलकाता येथे झाला. वयाच्या १६ व्या वर्षीच त्यांनी इंग्रजांविरुद्ध चालू असलेल्या असहकार आंदोलनात उडी घेतली. या आंदोलनाच्या अंतर्गत त्यांना २ वेळा कारागृहातही जावे लागले होते.