Menu Close

स्वातंत्र्यसेनानी

इंग्रजी सत्ता उलथवून लावण्यासाठी बॉम्बचा प्रथम वापर करणारे क्रांतीकारक खुदीराम बोस !

खुदीराम बोस ! भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर भारतभूच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी हुतात्मा झाला.

धर्मप्रेमी आणि धर्मरक्षक लोकमान्य टिळक !

लोकमान्य टिळक यांना जसे राष्ट्र प्रिय होते, तसाच धर्मसुद्धा त्यांना प्रिय होता. धर्माचरण, धर्मशिक्षण, धर्मरक्षण आदी कर्तव्येही त्यांना आवश्यक वाटत होती. लोकमान्यांच्या चरित्रात यांविषयीचे अनेक प्रसंग आहेत. ते प्रसंग भावी पिढीला पुनःपुन्हा सांगायला हवेत !

सेनापती तात्या टोपे म्हणजे रणांगणावरील आदर्श नेतृत्व !

वर्ष १८५७ चे स्वातंत्र्यसमर आपण हरल्यानंतर पुढचे १० मास तात्या टोपे वृकयुद्ध पद्धतीने म्हणजे गनिमी काव्याने हुलकावण्या देत आणि अचानक धाडी घालत ब्रिटिश सैन्यास सळो कि पळो करून सोडत होते.

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके !

आई अत्यवस्थ असल्याने तिला भेटण्यासाठी वासुदेवाने कार्यालयात सुट्टी मागितली; पण ती त्याला मिळाली नाही. उलट अपशब्द ऐकावे लागले. यामुळे तो पोहोचण्याआधीच आई मृत्यू पावली होती. आपल्या आईची शेवटची भेट होऊ न देणारा इंग्रज अधिकारी आणि एकंदर इंग्रज यांच्याविरुद्ध त्यांचे मन फार प्रक्षुब्ध झाले.

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पहिला क्षात्रवीर मंगल पांडे

मातृभूमीच्या चरणांवर आपल्या रक्ताचे अर्घ्य देऊन मंगल पांडे १८५७ च्या क्रांतीयुद्धातील पहिले क्रांतीकारक ठरले. त्यांच्या नावाचा प्रभाव एवढा विलक्षण होता की, या क्रांतीयुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज ‘पांडे’ याच नावाने संबोधू लागले.

पराक्रमी, धैर्यशील ‘स्वातंत्र्यप्रेमी विरांगना अवंतीबाई लोधी

अवंतीबाई लोधी एक पराक्रमी, धैर्यशील आणि प्रसंगावधानी स्त्री होती. पतीनिधनानंतरही या राणीने प्रजेचे मन जिंकून आपले राज्य अधिकाधिक विस्तृत केले. स्वातंत्र्यसंग्रामांत राणीने धैर्य आणि चातुर्य या गुणांनी आपले विस्तृत राज्य कंपनी सरकारच्या हातात न जाऊ देता सांभाळून राखले.

स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे थोर क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव

भारतमातेसाठी बलीदान करणारर्‍या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात. इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या जाचातून मुक्तता करणार्‍या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हे तिन्ही वीर देशभक्तीपर गीत गात गात आनंदाने फाशीला सामोरे गेले.

पूर्वांचल भारताची क्रांतीदेवता नागा सम्राज्ञी गायडिनलू

गायडिनलू स्वतः निरक्षर असूनही आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर एका विशेष ‘लिपी’ची तिने निर्मिती केली. ही लिपी तिने आपल्या सहकार्‍यांनाही शिकविली. या सांकेतिक भाषेच्या माध्यमाने आपल्या सहकार्‍यांशी सदैव संपर्कात राहून त्यांना इंग्रज सत्ताधार्‍यांविरुद्ध संघटित केले. आदिवासींच्या पारंपारिक शस्त्रांच्या साहाय्याने बलाढ्य इंग्रजसेनेशी लढा दिला आणि त्यांच्या ‘नाकी नऊ आणले.’

कन्हैयालाल दत्त

बाल कन्हैया आता युवा कन्हैया झाला होता. जसे वय वाढले, तशी कन्हैयामध्ये आणखी काही गुणांची भर पडली. त्याची प्रगल्भता वाढली. घरात होणार्‍या सुसंस्कारांमुळे, तसेच आजूबाजूला असलेल्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचे अवलोकन केल्यावर पदोपदी इंग्रज राजवटीतील अन्यायकारक घटना कन्हैयाच्या तरुण मनावर परिणाम करीत होत्या.

‘अभिनव भारत’चे इंग्लंड आणि प्रन्स या देशांतील आधारस्तंभ देशभक्त बॅरिस्टर सरदारसिंग राणा !

सौराष्ट्रामधील कंठरिया या गावात १२.४.१८७० या दिवशी एका लहानशा; परंतु प्राचीन संस्थानिकांच्या वंशात सरदारसिंग राणा यांचा जन्म झाला. सन १८९८ मध्ये ‘बॅरिस्टर’च्या अभ्यासासाठी ते लंडन येथे गेले.