कॅप्टन लक्ष्मीचा जन्म २४.१०.१९१४ या दिवशी मद्रास येथे झाला. वयाच्या २४ व्या वर्षी १९३८ मध्ये ती एम्.बी.बी.एस्. परीक्षा उत्तीर्ण झाली. सिंगापूरमध्ये तिने नेताजी सुभाषचंद्रांची भाषणे ऐकली आणि ती प्रभावित होऊन ‘आझाद हिंद सेने’कडे आकर्षित झाली.
भारतीय क्रांतीकारकांच्या दिव्य हौतात्म्यातून प्रेरणा घेऊन मिसरूडही न फुटलेली अनेक कोवळी मुले पोलिसी गोळीबाराला धैर्याने सामोरी गेली. त्यांचे हौतात्म्य सर्वपक्षीय राज्यकर्ते विशेषतः काँग्रेसी राज्यकर्ते विसरले, तरी आपण ते विसरून चालणार नाही.