Menu Close

हिंदु नेता – कार्यकर्ता

भारताच्या उत्थानासाठी त्यागाचे स्फुल्लिंग चेतवणार्‍या ‘विवेकानंद कन्या’ भगिनी निवेदिता !

भारतातील संस्कृती सूक्ष्मतेने समजून घेण्यासाठी समर्पित झालेल्या निवेदितांचे हे समर्पण दधिची ऋषींच्या वज्राप्रमाणे आणि नवविधा भक्तीतील समर्पण भक्तीप्रमाणे होते. जनसामान्यांनी त्यांचा 'विवेकानंद कन्या', या विशेषणाने सन्मान केला. निवेदितांच्या त्यागात भारताच्या उत्थानाचे जे स्फुल्लिंग होते, तेच आज नव्याने चेतवायची आवश्यकता आहे.

लाल बहादूर शास्त्री

लाल बहादुर शास्त्रीजींचे घर पाहिले, तर भावजागृती होते. तेथे सात्त्विकतेमुळे पुष्कळ चांगली स्पंदने जाणवतात; कारण स्वतः लाल बहादुर शास्त्रीजीच सात्त्विक होते. त्यांचे साधे राहाणीमान आणि नीतीमानता यांमुळे तेथे पुष्कळ चांगले वाटले.

लष्करी शिक्षणाच्या सैनिकीकरणाच्या प्रश्नावर सूत्रबद्ध, सडेतोड आणि अभ्यासपूर्वक बोलणारे डॉ. मुंजे

‘इंग्रज शासन हिंदुस्थानात जो पैसा व्यय करते, तो इंग्लंडमधून आणलेला नसतो. तो आमच्याच खिशातला असतो आणि तो आमचा पैसा इंग्रजांसाठी व्यय होतो. तो पैसा आमच्या श्रमाचा आणि घामाचा असल्याने आमच्या देशाच्या हितासाठी, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी व्यय व्हावा हे सांगण्याचा अधिकार आम्हाला आहेच !’

प.पू. गोळवलकर गुरुजी

माघ वद्य एकादशी शके १८२७ या तिथीला (१९ फेब्रुवारी १९०६ ला) नागपूरला माधवचा (गोळवलकर गुरुजी) जन्म झाला. माधवचे मराठीइतकेच हिंदी आणि इंग्रजी भाषांवरही प्रभुत्व होते. त्याने शंकराचार्य, रामानुजाचार्य यांचे संस्कृतमधील ग्रंथ वाचले होते. त्याचे पाठांतर उदंड होते.

उत्कृष्ट वक्तृत्वकौशल्य असलेले महामना मदनमोहन मालवीय !

समग्र क्रांतीची दृष्टी असणारे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. त्यांचे मन काठोकाठ करुणेने भरले होते आणि त्यांच्या प्रदीर्घ आयुष्यात कसलाही डाग त्यांनी उमटू दिला नाही. फाळणीच्या वेळी हिंदूवर जे अनन्वित अत्याचार झाले, त्या धक्क्याने त्यांचा देहांत झाला. काँग्रेस पक्षात एकेकाळी अशी माणसे सापडत असत.