चिदंबरम् हे तीर्थक्षेत्र आकाशतत्त्वाशी संबंधित शिवक्षेत्र आहे. हे मंदिर म्हणजे शिवाचे एक गूढ रहस्यच आहे. यालाच चिदंबरम् रहस्य, असे म्हणतात. हे अधिकतर शिवाच्या निर्गुण तत्त्वाशी संबंधित क्षेत्र आहे.
भारताच्या दक्षिण-पूर्व किनार्यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्वरम् ! रामेश्वराच्या दर्शनाला हिंदु धर्मपरंपरेत विशेष महत्त्व आहे. रामेश्वरम् हे हिंदूंच्या पवित्र चारधाम यात्रेपैकी दक्षिणधाम आहे. हिंदूंच्या जीवनयात्रेची पूर्णता बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वरम् अशा चार धामांच्या यात्रेनंतरच होते.