हिंदु भगिनींनो, नवरात्री निमित्त
स्त्रीशक्ति जागृत करून रणरागिणी बना !
अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रोत्सव सुरू होतो. हा आदिशक्तीच्या उपासनेचा सण आहे. आपण सर्वांनी आनंदी राहावे आणि आदर्श जीवन जगता यावे यासाठी देवाने सणांची निर्मिती केली आहे; परंतु सध्या सण आणि उत्सवांकडे केवळ मौजमजेचे रूप म्हणून पाहिले जाते. त्याचबरोबर त्यात गैरप्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे देवीतत्व जागृत करणाऱ्या नवरात्रोत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. नवरात्रोत्सव म्हणजे आपल्यात असलेल्या दुर्गादेवीची शक्ती जागृत करणे. सध्या स्त्री कमकुवत असल्याने तिच्यात प्रतिकार करण्याची क्षमता कमी झाली आहे; त्यामुळे महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. आपणही आपल्यातील देवीतत्त्व भक्तीने जागृत करून स्वतःच्या आणि राष्ट्राच्या रक्षणार्थ सिद्ध व्हायला हवे. चला तर मग नवरात्रोत्सवातील गैरप्रकारांना आळा घालून या सणाचे पावित्र्य जपण्याचा संकल्प करून देवीची कृपा संपादन करूया. आपल्यातील क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होऊया. हाच खरा नवरात्रोत्सव आहे.
हिंदू बांधवांनो, नवरात्रोत्सव आदर्शरित्या साजरा करा !
नवरात्रोत्सवात हे नसावे !
नवरात्रोत्सवात हे असावे !
तुम्ही काय करू शकता ?
नवरात्रोत्सव मंडळ आणि गरबा आयोजक
अहिंदू आणि ‘लव्ह जिहाद्यां’ना या सणापासून दूर ठेवा, हिंदू युवती आणि महिलांचे रक्षण करा !
हिंदु युवतींनो, स्वतःतील शक्तितत्त्व जागृत करा !
आज देशात विविध ठिकाणी बलात्कार, हिंसा, आतंकवादी आक्रमण यांसारख्या अनेक अप्रिय घटना वाढत आहेत. अशा अप्रिय घटना होत असताना अन्य कोणावरही निर्भर न राहता स्वत:च आपले रक्षण करा !
समाजाच्या रक्षणासाठी आपल्या भागामध्ये नि:शुल्क ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग’ चालू करा !
7738233333
‘लव्ह जिहाद’ची वास्तविकता जाणा !
हिंदु युवतींना जाळ्यात ओढून, फसवून, धर्मांतर करून त्यांचे शोषण करणाऱ्या या गुप्त जिहाद विषयी हिंदु जनजागृती समिती एक दशकांहून अधिक काळ जागृती करत आहे. लव्ह जिहाद वर आधारित समितीचा ग्रंथ अनेक घरांपर्यंत पोहचला आहे आणि अनेक युवतींना लव जिहादला बळी पडण्यापासून वाचवले आहे.