Menu Close

विजयादशमीनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत ठिकठिकाणी शस्त्रपूजन

उपस्थित राष्ट्रप्रेमींनी घेतली हिंदु राष्ट्रस्थापनेची शपथ !

उसर, अलिबाग येथील विठ्ठल – रखुमाई मंदिरातील शस्त्रपूजन

मुंबई – सर्वत्रच्या हिंदूंनी विजयादशमी उत्साहात साजरी केली. प्रथेनुसार या दिवशी ठिकठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत शस्त्रपूजन करण्यात आले. तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शपथ घेण्यात आली.

भांडुप शिवनेरी कंपाऊंड येथील हनुमान मंदिर येथे शस्त्रपूजनासाठी उपस्थित धर्मप्रेमी

सदिच्छा सेवा मंडळ, नवघर, वसई पूर्व येथे उपस्थित धर्मप्रेमी

डावीकडे श्री परशुराम तपोवन आश्रम, वसई येथील आश्रमाचे संस्थापक पूज्य बी.पी. सचिनवाला

पोदी हनुमान मंदिर, नवीन पनवेल

चिंचवली शेकिन, खोपोली येथील हनुमान मंदिर

मुळगाव, खोपोली येथे उपस्थित धर्मप्रेमी

एकविरा आई मित्रमंडळ, काटरंग गाव, खोपोली येथे उपस्थित धर्मप्रेमी

खिडुकपाडा येथे उपस्थित धर्मप्रेमी

मुंबईत भांडुप शिवनेरी कंपाऊंड येथील हनुमान मंदिर; पालघर (वसई) येथील सदिच्छा सेवा मंडळ आणि श्री परशुराम तपोवन आश्रम; ठाणे येथील उमा-नीळकंठ मारुति मंदिर आणि संतोषीमाता मंदिर येथे शस्त्रपूजन करण्यात आले. रायगडमध्ये खोपोली येथे खिडूकपाडा, चिंचवली शेकिन हनुमान मंदिर; मूळगाव, तसेच काटरंग गाव येथील एकविरा आई मित्रमंडळ; पनवेल येथील पोदी हनुमान मंदिर, पाली येथील परळी, अलीबाग येथील बेलोशी, उसर आणि वर्‍हाड पाली या ठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले.

सर्व ठिकाणी स्थानिक धर्मप्रेमी, धर्मशिक्षणवर्गातील युवक-युवती, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसह एकूण ३०० अधिक जण उपस्थित होते.

कौतुक

ठाणे येथील संतोषीमाता मंदिराचे श्री. विष्णु सुंभे आणि सौ. आशा सुंभे यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. भविष्यात अशा उपक्रमांसाठी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. श्री. आणि सौ. सुंभे यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले.

Related News