विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवेदन
कोल्हापूर (महाराष्ट्र) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, हद्दीतील राजकीय पक्ष/पदाधिकारी यांचे झेंडे, फलक, बॅनर, होर्डिंग्ज आदी हटवण्याच्या संदर्भातील आदेश असतांना त्यानुसार शहरात कार्यवाही चालू झाल्यावर काही भागांत नागरिकांनी त्यांच्या घरावर, खासगी मालमत्तेवर लावलेले, तसेच जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले धार्मिक ध्वज काढण्याचे प्रकार झाले आहेत. या ध्वजाचा विधानसभा आचारसंहितेशी काहीही संबंध नसतांना नाहक हे ध्वज काढले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरांवरील, जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल साहाय्यक समाधान शेंडगे यांना देण्यात आले. (असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासनाला ते लक्षात कसे येत नाही ? – संपादक)
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहजिल्हासंयोजक श्री. अभिजित पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु महासभेचे श्री. राजू तोरस्कर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे उपस्थित होते.