Menu Close

अल्पवयीन मुलींची अश्‍लील दृश्ये दाखवल्यावरून निर्मात्या एकता कपूर यांच्याविरुद्ध गुन्हा

‘गंदी बात’ या वेब सिरीजमधील दृश्यांवरून पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद !

  • अश्‍लीलता पसरवून समाजाची नीतीमत्ता ढासळण्यास कारणीभूत असलेल्या अशा निर्मात्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे !
  • वेब सीरिज ‘सेन्सॉर बोर्डा’च्या अखत्यारीत आणून त्यांवर बंधने आणणे आवश्यक का आहे, हेच अशा घटनांतून लक्षात येते. – संपादक 

मुंबई – ‘अल्ट बालाजी’ ओटीटीवरील अश्‍लील ‘वेब सीरिज’मध्ये (ऑनलाईन प्रसारित करण्यात येणार्‍या व्हिडिओजच्या मालिकेमध्ये) अल्पवयीन मुलींचे अश्‍लील चित्रीकरण केल्याप्रकरणी अल्ट बालाजीच्या व्यवस्थापकीय संचालिका शोभा कपूर आणि त्यांची मुलगी निर्मात्या एकता कपूर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बोरीवली (मुंबई) येथील स्वप्नील हिरे यांच्या तक्रारीवरून एम्.एच्.बी. पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला.

हिरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये ‘गंदी बात’, ‘क्लास ऑफ २०१७’ आणि ‘क्लास ऑफ २०२०’ या वेब सीरिजमध्ये अल्पवयीन मुलींचे अश्‍लील चित्रीकरण करण्यात आले आहे’, असे म्हटले आहे. ‘अल्पवयीन मुलींना शाळेच्या गणवेशात अश्‍लील कृत्ये करतांना दाखवण्यात आले आहे, तसेच त्यांच्या तोंडी अश्‍लील संवादही दिले आहेत. याचा मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो’, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडे तक्रार करण्यासह हिरे यांनी बोरीवली येथील जिल्हा न्यायालयातही तक्रार केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर १८ ऑक्टोबर या दिवशी पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

गेल्याच महिन्यात २७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने लहान मुलांशी संबंधित अश्‍लील मजकुराविषयी मोठा निर्णय दिला होता. मुलांसाठी असा अश्‍लील मजकूर पहाणे, प्रकाशित करणे आणि डाऊनलोड करणे हा गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News