Menu Close

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिर वक्‍फ बोर्डाचे असल्‍याचा दावा

भारतावर मोगलांनी अनेक शतके राज्‍य केल्‍याने सर्व भारतच वक्‍फ बोर्डाचा आहे, असा दावा करण्‍यात आल्‍यास नवल वाटू नये ! त्‍यामुळे वक्‍फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्‍यापेक्षा तो रहित करणे योग्‍य ठरणार आहे ! – संपादक 

वक्‍फ बोर्डाने दावा केलेले शिवमंदिर

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील सआदतगंजमधील अडीचशे वर्षे जुन्‍या शिवमंदिराची वक्‍फ बोर्डाची मालमत्ता म्‍हणून कागदावर नोंद करण्‍यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण न्‍यायालयात पोचले आहे.

वर्ष २०१६ मध्‍ये वक्‍फ बोर्डाने शिवमंदिर आणि आजूबाजूची भूमी स्‍वतःची भूमी म्‍हणून घोषित केली. यानंतर वक्‍फ बोर्डाने ही भूमी गुंड मुख्‍तार अन्‍सारीची पत्नी अफशान अन्‍सारी हिला भाडेतत्त्वावर दिली. अफशान अन्‍सारी हिने वक्‍फ बोर्डाकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्‍या भूमीची विक्री केल्‍याचा आरोप आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News