डिचोली येथे अनेक आस्थापनांना भेटी देऊन हलाल प्रमाणित उत्पादने न विकण्याचे आवाहन
डिचोली (गोवा) – हिंदु जनजागृती समितीने यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात अभियान आरंभले आहे. या अंतर्गत समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच डिचोली येथे अनेक आस्थापनांना भेटी देऊन या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी डिचोली येथील गोवा बागायतदारची शाखा, ‘डीजी मार्ट’, दीनदयाळ संस्था, बार्देश बाजार आदींचे व्यवस्थापन यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये सर्वश्री ह.भ.प. किरण तुळपुळे, सर्वश्री कृष्णा मराठे, विजय होबळे, सत्यवान म्हामल, सिद्धेश्वर नाईक, गोविंद चोडणकर, युवराज गावकर आदींचा समावेश होता.
गेल्या काही वर्षांपासून भारतात हेतूतः ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्यापार्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागत आहे. साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे आदी विविध उत्पादनेही ‘हलाल प्रमाणित’ होऊ लागली आहेत. भारत सरकारच्या अधिकृत ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI) आणि ‘अन्न अन् औषध प्रशासन’ (FDA) या संस्था उत्पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची आवश्यकताच काय? ‘हलाल प्रमाणिकरण’ व्यवस्थेतून मिळणार्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे. या अघोषित हलालसक्तीच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात अभियान राबवले जात आहे. आस्थापनांनी अशा प्रकारच्या हलाल प्रमाणित उत्पादनांची विक्री थांबवून अभियानास सहकार्य करावे, असे आवाहन समितीने डिचोली येथील विविध आस्थापनांना केले आहे.
हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याची सभापती रमेश तवडकर आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्याकडे मागणी
‘हलाल प्रमाणिकरण’ व्यवस्था बंद करून ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आणि स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.