Menu Close

आपली ओळख ‘हिंदु’ आहे, हे ठसवल्याविना आपल्यावरील इस्लामी संकट संपणार नाही – सात्यकी सावरकर

केडगाव (जिल्हा पुणे) येथे राष्ट्रभक्तीचे कार्य करणार्‍या ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला !

डावीकडून डॉ. नीलेश लोणकर, श्री. सात्यकी सावरकर, श्री. लक्ष्मण नाईकवाडी आणि श्री. महेश पाठक

केडगाव (जिल्हा पुणे, महाराष्ट्र) – स्वतःची ओळख ‘हिंदु’ म्हणून जगासमोर येणे, हीच आता काळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. इस्लामी संकट आपल्या डोक्यावर घोंगावतांना ही ओळख टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्याची पुण्यभू आणि पितृभू हिंदुस्थान, भारत आहे तो प्रत्येक जण हिंदु आहे. या भूमीचे रक्षण करणे, हे आपले दायित्व आहे. जातीभेद, मतमतांतरे विसरून सर्व हिंदु समाजाने एकत्र येऊन मतदान करावे आणि मतदान करतांना १०० टक्के जे पक्ष हिंदुहिताचा विचार करतात, अशाच पक्षांना हिंदूंनी एकागठ्ठा मतदान करावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी समाजाला संघटित होऊन राष्ट्राला वर्तमान धर्मसंकटापासून वाचवण्याचे आवाहन केले. ‘भगवा नसेल शिरावरी, तर हिरवा बसेल उरावरी’, असे सूचक संबोधन त्यांनी केले. ‘स्वा. सावरकर युवा विचार मंच’ आयोजित ‘स्वयंभू’ या स्वा. सावरकर यांच्या विचारांवर आधारित दिवाळी अंकाचे प्रकाशन करतांना ते बोलत होते.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचारमंचा’च्या ‘स्वयंभू’ दिवाळी अंकाचे प्रकाशन २६ ऑक्टोबर या दिवशी पार पडले. या प्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचाचे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर, ‘धर्मवीर गडा’चे सेवेकरी लक्ष्मण नाईकवाडी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन करण्यात आले.

संस्थेच्या कार्याला २५ वर्षे पूर्ण होत असतांना व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते २१ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविकानंतर संस्थेतील वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिवर्ष दिवाळी अंकामध्ये कविता देणारे लेखक डॉ. पराग पाथ्रुडकर, तसेच लेखक अनिल पाटील आणि इतर मान्यवर यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा शेवट संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून करण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदूसंघटनाच्या कार्याविष‌यीचे मुखपृष्ठ !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदूसंघटन, जातीभेद निर्मूलनाचे विचार, त्यांची राष्ट्रापती असलेली तळमळ आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान तळागाळात पोचवणे, या उद्दे‌शाने या दिवाळी अंकाची निर्मिती चालू झाली. यंदाचे या अंकाचे २१ वे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ हे वैशिष्ट्यपूर्ण असते. मुखपृष्ठ या वर्षी सावरकरांच्या हिंदूसंघटनाच्या कार्याविष‌यी आहे. विवेक देशमुख यांनी या वर्षी मुखपृष्ठासाठी चित्र रेखाटले आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News