Menu Close

बांगलादेशात आता पोलीस आणि सैनिक यांच्याकडून निदर्शने करणार्‍या हिंदूंना मारहाण

मुसलमान दुकानदाराने सनातन धर्माचा अवमान केल्याने हिंदू करत होते निदर्शने !

बांगलादेशात धर्मांध मुसलमानच नव्हे, तर मुसलमान पोलीस आणि मुसलमान सैनिक हेही हिंदूंवर आक्रमण करत आहेत. यातून हिंदूंचा विनाश अटळ आहे. ही स्थिती पालटून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणे अत्यावश्यक झाले आहे ! – संपादक 

चितगाव (बांगलादेश) – सनातन धर्माचा अवमान करणार्‍या मुसलमानाच्या दुकानासमोर आंदोलन करणार्‍या हिंदूंवर येथील हजारी गोली भागात पोलीस आणि सैनिक यांनी आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. येथे हिंदूंची झडती घेण्यात आली, तसेच त्यांना मारहाणही करण्यात आली. ३० हिंदूंना पोलिसांनी पकडले. पोलिसांच्या आक्रमणात ५ हिंदू गंभीररित्या घायाळ झाले. हिंदूंनीच त्यांच्यावर आक्रमण केल्याचा दावा पोलीस आणि सुरक्षायंत्रणा करत असून यानंतरच त्यांनी हिंदूंवर कारवाई केल्याचा दावा केला जात आहे.

१. उस्मान मुल्ला या मुसलमान दुकानदाराने ५ नोव्हेंबरच्या सायंकाळी सनातन धर्मावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. या वेळी तो म्हणाला होता की, ‘हिंदूंची ‘इस्कॉन’ ही आध्यात्मिक संस्था रानटी आहे. तिच्यावर बहिष्कार घातला पाहिजे.’ यावरून त्याच्या दुकानाबाहेर हिंदूंनी निदर्शने करत त्याच्यावर कारवाईची मागणी केली. त्याला हिंदूंनी क्षमा मागण्यास भाग पाडले, अशी माहिती तेथील एका हिंदु नेत्याने ‘सनातन प्रभात’ला दिली.

हिंदूंवर पोलीस आणि मुसलमान सैनिक आक्रमण

२. या वेळी उस्मानवर कारवाई करण्याऐवजी पोलीस आणि इतर सुरक्षायंत्रणा यांनी हिंदूंना लक्ष्य करण्यास चालू केले. त्याने उस्मानला सुरक्षित ठिकाणी नेले आणि हिंदूंचा शोध चालू केला.

३. चितगावमधील व्हिडिओजमध्ये पोलीस एका अरुंद भागात हिंदूंना अटक करतांना दिसत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फोडल्याचे व्हिडिओही समोर आले आहे. या व्हिडिओजमध्ये एका घरात पोलीस लाठ्या मारतांना दिसत आहेत. पोलिसांनी ३० हिंदूंना अटक केली आहे. या वेळी सैन्याच्या तुकड्याही उपस्थित होत्या आणि त्यांनीही हिंदूंना मारहाण केली.

४. चितगावमध्ये हिंदू त्यांच्यावरील अत्याचारांच्या विरोधात सातत्याने आंदोलन करत आहेत. दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या हिंदूंवर बांगलादेश पोलिसांनी नुकताच देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणी २ हिंदूंना अटक करण्यात आली होती, तर १९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

बांगलादेशी सैन्याने हिंदु दुकानदारांकडून सोने, पैसे आदी लुटल्याचा संशय !

या वेळी बांगलादेशी सैन्याने चितगावांतील हिंदुबहूल भागावर आक्रमण केले. या भागात हिंदूंची दागिने, कपडे आदींची दुकाने आहेत. सैनिकांच्या कारवाईमुळे हिंदु दुकानदार आणि नागरिक सैरावैरा पळू लागले. या वेळी सैनिकांनी दुकानांतून सोने आणि पैसे लुटले, असा आरोपही केला जात आहे, अशी माहिती चितगावातील हिंदु नेत्यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News