कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सल्ला
सोमरस म्हणजे मद्य, हे सिद्धरामय्या यांना कुणी सांगितले ? तोंड आहे म्हणून काही बरळणारे शुद्धीत आहेत का ? कि तेही काही सेवन करून बोलत आहेत, अशी शंका मनात येते ! – संपादक
बेंगळुरू (कर्नाटक) – देवसुद्धा पूर्वी मद्यपान करायचे. मद्य म्हणजे सोमरस. हे तेव्हापासून प्रचलित आहे; पण याचा अर्थ असा नाही की, मी मद्यपान करणार्यांच्या बाजूने आहे. मी तुम्हाला कधीही ‘मद्यपान करा’, असे म्हणणार नाही. तुम्ही दूध प्या, दूध हा एक पोषणमूल्याने भरलेला पदार्थ आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले.
यापूर्वी जे.एच्. पटेल मुख्यमंत्री असतांना मद्यपानबंदीविषयी चर्चा झाली होती. या संदर्भात स्थापन केलेल्या समितीत मीही होतो. मद्यपानबंदीवर अभ्यास करण्यासाठी गुजरात आणि केरळ राज्यांनाही भेट दिली होती. तिथे मद्यपानबंदी असूनही सर्वत्र मद्य उपलब्ध होत होते. त्यामुळे मद्यपानबंदी अशक्य आहे आणि मद्यपानासाठी कायदेशीर उपाय नाहीत, हे लक्षात आले, असे सिद्धरामय्या म्हणाले. (जर असे असेल, तर ते या राज्यांना लज्जास्पदच होय ! – संपादक)
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात