Menu Close

बांगलादेशात १ लाखाहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून केले आंदोलन !

तरीही धर्मांध मुसलमान आणि पोलीस यांच्याकडून काही हिंदूंना मारहाण

यातून बांगलादेशातील हिंदूंची स्थिती काय आहे, हे लक्षात घ्या ! अशा हिंदूंना भारतातील हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी साहाय्य करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन कृतीशील होणे आवश्यक आहे ! – संपादक 

बांगलादेशातील हिंदूंचे आंदोलन (संग्रहित छायाचित्र)

रंगपूर (बांगलादेश) – येथे सनातन जागरण मंचाने हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला लाखाच्या संख्येने हिंदू उपस्थित होते. हिंदूंकडून ‘जय भवानी’, ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात आल्या. हिंदू आंदोलकांनी भगवा ध्वजही फडकवला. या काळात जिहादी मुसलमानांनी काही हिंदूंना मारहाण केल्याची घटनाही घडली. यात २० हिंदु तरुण घायाळ झाले आहेत. हिंदु आंदोलकांना पोलिसांनीही मारहाण केली. घायाळांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हा आंदोलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांनी देशातील हिंदूंवर भेदभाव केल्याचा आरोप केला.

१. हिंदूंनी या आंदोलनाद्वारे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार प्रा. महामद युनूस यांना ८ मागण्यांचे निवेदन दिले आहे. यात मागण्यांमध्ये हिंदूंवरील आक्रमणांच्या प्रकरणांच्या जलद सुनावणीसाठी जलद न्यायाधिकरण स्थापन करणे, अल्पसंख्यांक संरक्षण कायदा तातडीने लागू करणे, हिंदु धार्मिक कल्याण ट्रस्टची पायाभरणी करणे, पाली शिक्षण मंडळाचे आधुनिकीकरण, अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी ५ कलमी कृती आराखडा घोषित करणे आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची स्थापना या मागण्या आहेत.

२. महंमद युनूस यांनी यापूर्वी अल्पसंख्यांक समुदायांवरील आक्रमणांचा निषेध केला होता. या आक्रमणांचे वर्णन ‘घृणास्पद’ असे करण्यात आले होते आणि युवकांना हिंदू, ख्रिस्ती आणि बौद्ध कुटुंबांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले होते.

हिंदूंच्या मालमत्ता आणि घरांची लूट चालूच आहे ! – चिन्मय दास

वर्ष १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडला त्यांपैकी ७० टक्के हिंदू होते. त्यांची घरे आणि साहित्य लुटले. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही ही प्रवृत्ती कायम आहे, असे चिन्मय दास यांनी आंदोलनाच्या वेळी मार्गदर्शन करतांना म्हटले.
ते म्हणाले की, ५ ऑगस्टनंतर देशात आतंकवादी आणि जिहादी नेते तुरुंगातून सुटले आहेत; पण एकही हिंदू सुटला नाही. हिंदू कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक नाहीत. भविष्यात हिंदु त्या पक्षाला मतदान करतील जो लोकशाही टिकवेल. आज देशातील ३ कोटी सनातनी एकत्र आले आहेत.

चिन्मय दास यांना रंगपूर सोडण्याचा आदेश

चिन्मय दास यांनी २१ नोव्हेंबरच्या रात्री पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांना रंगपूरमधील हॉटेल सोडण्यास सांगण्यात आले. ‘आम्हाला इथे ठेवता येणार नाही’, असे पोलिसांनी त्यांना सांगितले.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News