Menu Close

दुर्गाडीच्या (कल्याण, महाराष्ट्र) डागडुजीला हरकत घेणारा वक्फ बोर्डाचा दावा फेटाळत दुरुस्ती करणार

डागडुजीचे काम जलदगतीने करण्याविषयी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना !

केवळ दावा करून गडदुर्गांच्या संदर्भात हस्तक्षेप करणारा वक्फ बोर्डचा कायदाच रहित होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! – संपादक 

काही भागात किल्ल्याची झालेली पडझड

कल्याण – येथील ऐतिहासिक दुर्गाडी गडाची डागडुजी आणि नूतनीकरण यांचे काम मागील ६ महिन्यांपासून चालू होते; मात्र गडाच्या दुरुस्तीला वक्फ बोर्डाची हरकत असल्याचे सांगत दुरुस्तीचे काम थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पत्राची चौकशी करून कळवण्याविषयी महापालिकेला सांगितले होते; मात्र महापालिका प्रशासनाने पत्राचा संदर्भ जोडता येत नसल्याचे नमूद करत ही हरकत फेटाळली आहे, तसेच गडाच्या डागडुजीचे काम न थांबवता ते लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

काय आहे प्रकरण ?

कल्याण शहरातील दुर्गाडी गडाची दुरवस्था झाल्याने त्याच्या डागडुजीचे काम करायचे होते. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत हे काम रखडले होते. नागरिकांनी याविषयी खेद व्यक्त केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करत गडाच्या दुरुस्तीचे काम चालू करण्याचे आदेश देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. जून २०२४ मध्ये गडाच्या दुरुस्तीला प्रारंभ करण्यात आला. नेवासा दगडाद्वारे गडाची दुरुस्ती केली जात आहे. त्याला वक्फ बोर्डाची हरकत असल्याचे सांगत दुरुस्तीचे काम थांबवण्याची मागणी केली होती.

नूतनीकरणाचे काम वेगाने करणार !

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता संपदा मोहरीर म्हणाले, ‘‘वक्फ बोर्डाचा हवाला देत एका नागरिकाने गडाच्या कामाला हरकत घेणारे पत्र दिले होते. न्यायालयाचा अपमान होऊ नये; म्हणून या पत्राची शहानिशा करण्यासाठी महापालिका प्रशासनाला कळवण्यात आले होते; मात्र प्रशासनाने तपासणीअंती काम बंद न करता ते चालू ठेवण्याविषयी कळवले आहे.’’ (छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि कल्याण शहराला लाभलेल्या सुवर्णक्षणांची ओळख असलेल्या दुर्गाडी गडाचे वैभव जपण्यासाठी पाऊल उचलणार्‍या महापालिका प्रशासनाची अभिनंदनीय कृती ! – संपादक)

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News