चिन्मय कृष्णदास यांची सुटका आणि बांगलादेशी हिंदूंचे रक्षण यांसाठी भारत सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी !
घरात आणि घराबाहेरही असुरक्षित असणार्या बांगलादेशातील हिंदूंप्रमाणे स्थिती ओढावल्यास भारतातील हिंदू काय करतील ? अशी मागणी का करावी लागते ? – संपादक
हडपसर (जिल्हा पुणे, महाराष्ट्र) – बांगलादेशातील हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्या बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे प्रमुख चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदु अल्पसंख्यांकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका करावी आणि हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली. १ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, ससाणेनगर, हडपसर या ठिकाणी या संदर्भातील आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी या घटनेवर निषेध व्यक्त केला आणि ‘शासनाने यावर कारवाई करावी’, अशी मागणी केली. या वेळी २०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
या आंदोलनात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’चे अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे श्री. सचिन घुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे पुणे जिल्हाप्रमुख श्री. मुकुंद मासाळ, मेजर सुधीरचंद्र जगताप, ‘श्रीराम मंदिर ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष श्री. संदीप अप्पा राऊत, भाजप महिला मोर्चा पुणेच्या सरचिटणीस सौ. उज्ज्वला जितेंद्र गौड, ‘परिवर्तन महिला आधार केंद्रा’च्या संस्थापक अध्यक्षा सौ. शोभा लगड, ‘रुद्रतेज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गायकवाड, ह.भ.प. दत्तात्रय महाराज चोरघे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
भारतातील ९ राज्यांमध्ये अल्पसंख्यांकांचे प्राबल्य वाढलेले आहे ! – ह.भ.प. दत्तात्रय महाराज चोरघे
बांगलादेशमध्ये ९१.०८ टक्के मुसलमान आहेत, तर ७.९६ टक्के हिंदू आहेत. इतर अल्पसंख्यांक (बौद्ध, ख्रिस्ती इत्यादी) मिळून १ टक्क्याहून अल्प आहेत. बांगलादेशातील हिंदूंची सध्या अशी अवस्था आहे की, ते घरातून बाहेरही निघू शकत नाहीत आणि घरातही असुरक्षित आहेत. हिंदु महिलांवर घरात जाऊन अत्याचार केले जात आहे. वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानात असणारे २३ टक्के हिंदू आता जेमतेम १ ते २ टक्के उरले आहेत. भारतामध्येही ९ राज्यांमध्ये अल्पसंख्यांकांचे प्राबल्य वाढलेले आहे. हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.
भारत सरकारने हस्तक्षेप करून वर्ष १९७१ प्रमाणे कारवाई करायला हवी ! – डॉ. नीलेश लोणकर
वर्ष १९७१ मध्ये भारताने बांगलादेश सैन्याला राजनैतिक, आर्थिक आणि सैन्य साहाय्य संमत केले होते, तसेच स्वतंत्र बांगलादेशाला मान्यता दिली होती. बांगलादेश मुक्तीयुद्धानंतर बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताच्या सैन्याच्या हस्तक्षेपामुळे साहाय्य झाले होते. बांगलादेशातील हिंदु समाज गेल्या काही दशकांपासून धार्मिक अत्याचार, मंदिरांवरील आक्रमणे, महिलांवरील अत्याचार आणि मालमत्तेच्या लूटमारीचा सामना करत आहे. त्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करून वर्ष १९७१ प्रमाणे कारवाई करायला हवी.
उपस्थित मान्यवर : समस्त हिंदु आघाडीचे श्री. हनुमंत जाधव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वश्री बाबा बाविस्कर आणि कपिल खुराणा, अखंड हिंदु संघाचे श्री. काशीराम मोघे, ‘रामानंद युथ क्लब’चे श्री. मयूर चांदगुडे यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
भाजपच्या सौ. उज्ज्वला गौड यांनी आंदोलन चालू असतांना ये-जा करणार्या हिंदूंना आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘जे हिंदू आंदोलनात सहभागी होऊ शकत नाहीत, त्यांनी किमान थांबून आंदोलनामधील फलक तरी वाचूया आणि आपले धर्मकर्तव्य बजावूया’, असे सांगितले.
१. श्री. मुकुंद मासाळ, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, पुणे जिल्हाप्रमुख – सर्व हिंदु बांधवांनी एकत्र येऊन हिंदूंच्या समस्यांकडे लक्ष देण्याची सरकारकडे मागणी केली पाहिजे.
२. श्री. संदीप अप्पा राऊत, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम मंदिर ट्रस्ट – सर्व हिंदूंनी एकत्र येऊन भारत सरकारवर दबाव टाकून चिन्मय स्वामी यांना सोडण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
३. श्री. अमित गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, रुद्रतेज प्रतिष्ठान – प्रत्येक हिंदूच्या घरात एक तरी शस्त्र असायला हवे, ते दुसर्यांवर वापरण्यासाठी नाही, तर स्वतःचे रक्षण करण्यासाठी.
४. श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती – बांगलादेशातील महिलांवर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले आहेत की, जगात दुसर्या कोणत्याही देशात असे अत्याचार हिंदु महिलांवर झाले नाहीत. चिन्मय स्वामी यांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव टाकण्यात यावा, अशी भारत सरकारकडे मागणी करतो.