Menu Close

हुपरी येथील मुस्‍लिम सुन्‍नत जमियतच्‍या वतीने उभारण्‍यात आलेल्‍या अवैध मदरशाचे बांधकाम तात्‍काळ तोडा – हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समिती

अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला ते लक्षात येत नाही का ? – संपादक 

कोल्‍हापूर (महाराष्ट्र) – हुपरी येथील मुस्‍लिम सुन्‍नत जमियतने अवैधपणे उभालेल्‍या मदरशाला कागदपत्रे सादर करण्‍यासाठीचा कालावधी संपल्‍याने प्रशासनाने या मदरशाचे बांधकाम तात्‍काळ तोडावे, या मागणीचे निवेदन हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीच्‍या वतीने निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय तेली यांना १२ डिसेंबर या दिवशी देण्‍यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, महाराष्‍ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. राजू तोरस्‍कर, श्री. विकास जाधव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्‍वामी, अखिल भारत हिंदु महासभा जिल्‍हाध्‍यक्ष श्री. संदीप सासने, ‘महाराजा प्रतिष्‍ठान’चे संस्‍थापक-अध्‍यक्ष श्री. निरंजन शिंदे, श्री. मनोहर सोरप, हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीचे श्री. आनंदराव पवळ आणि श्री. नितीन काकडे, मराठा उद्योजक श्री. प्रसन्‍न शिंदे, श्री. संतोष पाटील उपस्‍थित होते.

जिल्‍हाधिकार्‍यांना दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की, या संदर्भात जमियतकडे कोणत्‍याही प्रकारची कागदपत्रे नसतांना जमियतने हा विषय न्‍यायप्रविष्‍ट आहे आणि तसेच हे प्रकरण वक्‍फ बोर्डाकडे सादर केल्‍यामुळे मदरशाचे अतिक्रमण काढू नये, असे निवेदन हुपरी नगर परिषदेत दिले आहे. वास्‍तविक या जागेच्‍या संदर्भात सध्‍या कोणताही दावा, वाद न्‍यायप्रविष्‍ट नसून सदरचे अतिक्रमण निष्‍कासित करून भूमी खुली करण्‍याच्‍या संदर्भात न्‍यायालयाचा कोणताही मनाई  अथवा स्‍थगितीचा आदेश नाही. त्‍यामुळे सदरच्‍या मदरशाचे अनधिकृत बांधकाम तात्‍काळ तोडावे.

Related News