‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा लागू करण्याची ८७५ हून अधिक मंदिर विश्वस्तांची एकमुखी मागणी !
शिर्डी – श्री साई पालखी निवारा, शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी प्रत्येक मंदिरांसाठी सुरक्षा समिती स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. याचबरोबर मंदिरांच्या भूमीचे बेकायदेशीर हस्तांतरण रोखण्यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ कायदा शासनाने तात्काळ लागू करावा यांसह एकूण १० ठराव ‘हर हर महादेव’च्या गजरात एकमताने संमत करण्यात आले. मंदिर महासंघाच्या या मागण्या घेऊन लवकरच मा. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरवले असून त्यासाठी राज्याचे रोजगारहमी मंत्री श्री. भरतशेठ गोगावले यांनी विशेष सहकार्य करू, असे आश्वासन दिले आहे.
या परिषदेसाठी ‘श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट’चे विश्वस्त, पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपति, भीमाशंकर देवस्थान, रांजणगाव आणि जेजुरी देवस्थान, श्रीक्षेत्र बेट कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज समाधी मंदिर, अखिल भारतीय पुरोहित महासंघाचे प्रतिनिधी, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ, संत पिठांचे प्रतिनिधी यांच्यासह राज्यभरातून ८७५ हून अधिक मंदिर विश्वस्त प्रतिनिधी उपस्थित होते. यापुढील काळात देशासाठी आदर्श असे मंदिरांचे संघटन महाराष्ट्रात उभे करण्याचे निश्चय सर्वांनी केला.
एकमताने संमत करण्यात आलेले ठराव !
मंदिरे, तसेच मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात दर आठवड्यातून एकदा ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करणे, काशी आणि मथुरा तीर्थत्रक्षेत्रांचा खटला जदलगती न्यायालयात चालवावा; सरकारने राज्यातील सर्व मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत; मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला निधी महाराष्ट्र सरकारने विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी; धर्मादाय आयुक्त कार्यालये मंदिरांना विविध कारणांसाठी देणगी देण्यासाठी आज्ञापत्रे पाठवत आहेत. अशी नियमबाह्य सरकारी पत्रे महाराष्ट्र्र शासनाने रोखावीत आणि मंदिरांचा निधी केवळ धार्मिक कार्यासाठी उपयोगात आणला जावा, अशी सूचना धर्मादाय आयुक्त कार्यालयाला करावी; महाराष्ट्रातील पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्य मंदिरांचा तात्काळ जीर्णोद्धार करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी; तीर्थक्षेत्रे, श्रीक्षेत्रे, गडकिल्ले यांवर असलेल्या मंदिरांवर झालेल्या अतिक्रमणाचे महाराष्ट्र सरकारने सर्वेक्षण करून तात्काळ ती अतिक्रमणे दूर करावीत; महाराष्ट्रातील ‘क’ वर्गवारीतील मंदिरे सर्व कागदपत्रे उपलब्ध करूनही ‘ब’ वर्गात वर्गीकृत केली जात नाहीत. याची शासनाने दखल घेऊन त्या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी; मंदिर परिसर मद्य-मांस मुक्त होण्यासाठी सरकारने अधिसूचना काढावी; राज्यातील मंदिरांच्या पुजार्यांना प्रतिमाह मानधन देण्याचा निर्णय घ्यावा !
मंदिरांच्या समस्यांवर चर्चा
दोन दिवसांच्या मंदिर परिषदेत मंदिरांच्या विविध समस्यांवर चर्चा, तज्ञ अन् मान्यवरांचे मार्गदर्शन, तसेच गटचर्चा आयोजित करण्यात आल्या. यात ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय’, ‘मंदिरांमधील वस्रसंहिता’, ‘धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि मंदिरांचा समन्वय’ आदी विषय होते. त्यातून वरील ठराव संमत करण्यात आले.
२५ डिसेंबर
शिर्डी येथील तृतीय ‘महाराष्ट्र्र मंदिर न्यास परिषदे’त ८७५ हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती
मंदिर आणि मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणाच्या विरोधातील संघर्ष तीव्र करत ‘मंदिर तेथे आरती’ करण्याचा निर्धार !
शिर्डी – राज्यातील १०८ मंदिरांमध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांची माहिती देणारे धर्मशिक्षण फलक लावणे, १००हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, मंदिरांमध्ये बालसंस्कारवर्ग चालू करणे यांसह मंदिरे आणि मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करत ‘मंदिर तेथे आरती’ करण्याचा निर्धार ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त दुसर्या दिवशी समस्त मंदिर विश्वस्त तथा प्रतिनिधींनी केला. श्री साई पालखी निवारा, निमगांव, शिर्डी येथे आयोजित तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त महाराष्ट्रभरातून ८७५ हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते तथा मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते.
मंदिरांच्या आवारात केवळ हिंदूनाच व्यवसायाची अनुमती द्या – श्री. सुनील घनवट, मंदिर महासंघ
वक्फ बोर्डच्या माध्यमातून अहिंदूनी मंदिरांच्या आणि हिंदू बांधवांच्या जमिनींवर अतिक्रमण केले आहे. अनेक ठिकाणी हिंदूंना त्यांच्या आपल्या मंदिरांना त्यांची भूमी गमवावी लागली आहे. याचा सामना करताना वक्फ कायद्यात केवळ सुधारणा न करता तो पूर्णपणे रद्द करा, अशी मागणी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीने केंद्र सरकारकडे केली आहे. हिंदूंच्या देवीदेवतांना न मानणार्या अहिंदूंची दुकाने मंदिराच्या आवारात असून प्रसाद, फुले इत्यादींची विक्री ते करतात. इतकेच नव्हे, तर त्याला थुंकी लावून ‘थुक जिहाद’ करतात. यापुढे ज्या वेळी आपल्या गावची जत्रा, उत्सव असेल तेव्हा अन्य धर्मियांची दुकाने तिथे लागणार नाहीत याची काळजी घेऊया. सध्या आखाडा परिषद आणि साधू-संतांनी यंदाच्या ‘प्रयागराज’ येथील कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनाच कुंभमेळा परिसरात व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे, जो अत्यंत स्तुत्य आहे, असे मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी म्हटले.
मंदिर परिसरात हिंदू व्यापार्यांनाच ‘ओम प्रमाणपत्र’, तर हिंदू कामगारासाठी ‘हिंदू वर्क फोर्स’ची निर्मिती ! – श्री. रणजित सावरकर
ज्याप्रकारे आज ‘हलाल’च्या माध्यमातून सर्वत्र धर्मांध जाळे पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून यासाठीच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून ‘ओम प्रमाणपत्र’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘ओम प्रमाणपत्र’ चालू केले आहे. हे प्रमाणपत्र मंदिरासह प्रत्येक हिंदू व्यापार्यांनी घेणे अत्यावश्यक आहे. यापुढील काळात मंदिरात प्रत्येक ठिकाणी कामासाठी हिंदू कामगार मिळावेत, यासाठी लवकरच आम्ही ‘हिंदू वर्क फोर्स’ची निर्मिती करणार आहोत. यामध्ये हिंदू असतील त्यांनाच नोकरी दिली जाईल, असे प्रतिपादन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी या वेळी केले.
या प्रसंगी ‘अखिल भारतीय संत समिती’ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिकेतशास्त्री देशपांडे म्हणाले, ‘ ‘ज्याप्रमाणे हलाल प्रमाणपत्र आहे, त्याचप्रमाणे आता हिंदूंनी ‘ओम’ प्रमाणपत्र घेण्यास आणि तेथूनच वस्तू खरेदी करण्यास प्रारंभ केला पाहिजे.’’ नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज म्हणाले, ‘‘घटनेने सर्वांना समान अधिकार दिले असून ते कुणाकडून काय खरेदी करावे आणि करू नये हे ठरवू शकतात. त्यामुळे हिंदूंनी नेहमीच कोणतीही वस्तू विशेषकरून प्रसाद हा हिंदूंकडूनच खरेदी करण्याचा निर्णय घ्यायला हवा.’’
मंदिर सदस्य नोंदणी आणि मंदिर महासंघाच्या सोशल मिडिया सेलचा प्रारंभ !
या परिषदेत मंदिर महासंघाच्या सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला, तसेच मंदिर महासंघाच्या ‘फेसबूक पेज’, ‘इन्स्टाग्राम’, तसेच ‘एक्स’ (ट्विटर) च्या अकाऊंटचा प्रारंभ सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये; तारकेश्वर गडाचे मठाधिपती पू. आदिनाथ शास्त्री; मल्हारा, अचलपूर येथील श्री धरमाळ संस्थानचे महंत देवरावबाबा; संजिवनी गडाचे पू. शंकर महाराज महंत; पुणे येथील ‘ओम जय शंकर आध्यात्मिक प्रतिष्ठान’ मठाचे प.पू. पप्पाजी पुराणिक महाराज यांच्या वंदनीय उपस्थितीत करण्यात आले. यासाठी एक ‘क्यूआर कोड’ देण्यात आला असून त्याद्वारे थेट नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासह ‘सनातन पंचांग २०२५’च्या अँड्राईड (Android) आणि आयओएस् (iOS) ॲपचे उद्घाटनही करण्यात आले.
या प्रसंगी ‘ग्लोबल महानुभाव संघा’चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पू. सुदर्शन महाराज कपाटे म्हणाले, ‘‘हिंदूंच्या धार्मिक स्थानांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी हिंदूंनी एकत्र येणे महत्त्वाचे आहे. सनातन हिंदु धर्माचे प्रत्येक मंदिर आपले आहे, अशी भावना हिंदूंमध्ये निर्माण होईल, तेव्हा हिंदू मंदिरांवरील अतिक्रमणाचा प्रतिकार करू शकतात. अहिंदू दिवसातून ५ वेळा एकत्र येतात, तर हिंदूंनी किमान दिवसातून एकदा तरी एकत्र यायला हवे. मंदिरांच्या रक्षणासाठी मंदिर-न्यास परिषद कार्य करतच आहे; मात्र या कार्यात प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने योगदान द्यायला हवे.’’
याप्रसंगी यवतमाळ येथील भाजप उपाध्यक्ष श्री. रवी ज्ञानचंदानी म्हणाले, ‘‘महाआरती परिवार संघटनाच्या माध्यमातून प्रत्येक मंदिरात प्रत्येक आठवड्याला हनुमान चालिसा पठणाचा सार्वजनिक कार्यक्रम आम्ही चालू केला आहे. जळगाव जिल्ह्यातील पूसद येथे प्रतिदिन २५ मंदिरांवर एकाच वेळी सकाळी ६ वाजता हनुमान चालिसाचा कार्यक्रम चालू करण्यात आला आहे.’’ या प्रसंगी ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक म्हणाल्या, ‘‘काळानुरूप स्वतःला बदलणे आवश्यक आहे. प्रत्येक संस्थेचा प्रसिद्धी प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. जेणेकरून तो प्रसिद्धीमाध्यमांशी सातत्याने संपर्कात राहील.’’
श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता संजीव देशपांडे यांचा सत्कार !
तुळजापूर येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरात कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात यशस्वी आणि नि:शुल्क लढा देणारे छत्रपती संभाजीनगर येथील अधिवक्ता संजीव देशपांडे यांचा महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरूवातीपासून चिकाटीने लढा देणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पूजनीय अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांची वंदनीय उपस्थिती होती. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हा कायदेशीर लढा चालू आहे.
उपस्थित मान्यवर – अखिल भारतीय पुरोहित महासंघाचे अध्यक्ष श्री. सतीश शुक्ल, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, श्री भीमाशंकर जोतिर्लिंग देवस्थानचे श्री. मधुकरअण्णा गवांदे, श्रीगोंदा अहिल्यानगर येथील श्रीराम देवस्थानचे ह.भ.प. नाना महाराज शिपलकर, अहिल्यानगर येथील श्रीकृष्ण मंदिराच्या प्रमुख ह.भ.प. प्रभाताई भोंग, भक्तीप्रसाद आश्रमाचे ह.भ.प. संदीप महाराज पिसे, श्री तुळजाभवानीमाता मंदिर सिद्ध गरीबनाथ मठाचे महंत मावजीनाथ महाराज, ज्ञानदर्शन गुरुकुल श्रीक्षेत्र हनुमानगडचे अध्यक्ष महंत ह.भ.प. अभिमन्यू महाराज खाडे, शिरापूर येथील श्रीराम मंदिर येथील ह.भ.प. घनश्याम महाराज शिंदे, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे उपस्थित होते.
विशेष – या परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाची ‘कोअर टिम’, तसेच जिल्ह्याचे संयोजक, सहसंयोजक, तसेच तालुक्याचे संयोजक आणि सहसंयोजक यांचा व्यासपीठावरून परिचय करून देण्यात आला.
२४ डिसेंबर
७५० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ला प्रारंभ!
अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही; तर हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा ! – पू. रामगिरी महाराज, नगर
शिर्डी – प्रतिकृल परिस्थितीत संतांनी मंदिरांची संस्कृती टिकवून ठेवली. सद्यस्थितीत हिंदू केवळ तीर्थक्षेत्राला जातात; परंतु त्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करतात. अध्यात्म आपल्या श्वासात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात यायला हवे. हिंदू धर्माविषयी निष्क्रिय राहिले, तर भविष्यात जगणे कठिण होईल. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असूनही भारतातील एकही मशिद किंवा चर्च सरकारने ताब्यात घेतलेले नाही. अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही; मात्र हिंदूंचीच मंदिर सरकारच्या ताब्यात का ? त्यामुळे आता हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावीत, अशी मागणी नगर येथील सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थानचे मठाधिपती पू. रामगिरी महाराज यांनी केली. महाराष्ट्र मंदिर महासंघ, विरार येथील श्री जीवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई पालखी निवारा, शिर्डी येथे आयोजित तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या प्रथम दिनी ते बोलत होते. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून ७५० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी आहेत.
परिषदेचा प्रारंभ श्रीक्षेत्र बेट कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज समाधी मंदिराचे पू. रमेशगिरी महाराज, कोपरगाव येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती पू. राघवेश्वरानंदगिरी महाराज, सनातन संस्थेचे सद्गुरु सत्यवान कदम, मुंबई येथील समस्त महाजन संघाचे अध्यक्ष श्री. गिरीष शहा, श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर आणि मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. ‘भारतात खर्या अर्थाने रामराज्य आणायचे असेल, तर प्रत्येक मंदिराने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आवश्यक अशा मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे अपरिहार्य आहे’, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.
उपस्थितांचे स्वागत श्री. प्रदीप तेंडोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी श्री. तेंडोलकर म्हणाले, ‘‘मंदिरांचे संवर्धन हे भगवंताचे कार्य आहे. त्यामुळे या कार्यासाठी ईश्वरानेच आपणाला एकत्र आणले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मागील ३ वर्ष झालेली कार्ये निश्चितच उल्लेखनीय आहेत. या परिषदेच्या माध्यमातून सर्व विश्वस्तांना एक व्यासपीठ प्राप्त झाले आहे.’’ मंदिर महासंघाचा कार्यात्मक आढावा महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी मांडला. या वेळी श्री. घनवट पुढे म्हणाले की , लोकसभेच्या निवडणुकीत धर्मांधांनी त्यांची रणनिती मशिदींमध्ये ठरवली. मतदान कुणाला करावे, यासाठी फतवे काढले हे ठरवले, तर मग हिंदु धर्म आणि राष्ट्र यांविषयीची रणनीती मंदिरांमध्ये का निश्चित केली जाऊ नये ? या परिषदेला एकवटलेल्या हजारो विश्वस्तांनी रस्त्यावर उतरून मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्यासाठी मागणी केली, तर सरकारला मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करावीच लागतील. अशाप्रकारे प्रत्येक विश्वस्ताने ‘आपल्या मंदिरातून हिंदूसंघटन कसे करता येईल ?’, त्याचा विचार करून कार्य केल्यास भविष्यात हिंदूंना सुरक्षा देण्याचे कार्यही मंदिरांद्वारे करता येऊ शकते.
मंदिरांतूनच संस्कार केले, तरच राष्ट्रप्रेमी पिढी निर्माण होईल ! – श्री. गिरीष शहा
एक महिन्यापूर्वी मी अबुधाबीला श्री स्वामीनारायण मंदिर पहायला गेलो होतो. तेथील व्यवस्था उत्तम होती. रोज १० ते २० हजार यात्रेकरू दर्शन करायला येतात, तसेच तिकडे येऊन संस्कार आणि संस्कृती याविषयी ज्ञानवर्धन ंहोत होते. वास्तविक हेच ज्ञान आपल्याकडे पूर्वीपासून आहे. नालंदा आणि तक्षशीला विद्यापिठांतील पुस्तके, आपले वेद, योग, न्यायप्रणाली, गणित, आयुर्वेद हे सर्व आपल्या मंदिर संस्कृतीतून उगम पावले आहेत. भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून हिंदूंची मंदिरे ही गुरुकुले होती. शिक्षणपद्धती होती. सध्या परिस्थिती काय आहे ? केवळ मंदिर आमचे आहे. त्याच्या आसपास असे काहीच नाही. यातून आपल्याला बाहेर पडावे लागेल. मंदिरामध्ये १६ पैकी १५ संस्कार करण्याची व्यवस्था पाहिजे. गर्भाधान संस्कारसारखे संस्कार मंदिरात झाला, तर येणारी पिढी राष्ट्रप्रेमी निर्माण होईल, असे समस्त मुंबई येथील समस्त महाजन संघाचे अध्यक्ष श्री. गिरीष शहा यांनी म्हटले.
मंदिरांचे रक्षण हे प्रत्येक हिंदूंचे सामूहिक दायित्व ! – प.पू. रमेशगिरी महाराज, कोपरगांव
सद्यस्थितीत मठ, मंदिरे, देवस्थान यांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि त्यांचे सवंर्धन यांसाठी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली आहे. सनातन संस्थाही यासाठी कार्यरत आहे. समस्त हिंदूंनी स्वत: पुरता विचार सोडून दिला पाहिजे. मंदिरे हे हिंदूंची सामूहिक उपासना केंद्रे आहेत. भजन, नामजप, प्रार्थना यांद्वारे मंदिरांतून सामूहिक उपासना केली जाते. अशा मंदिरांचे भंजन होणे हा हिंदु धर्मांवरील घाला आहे. त्यामुळे मंदिरांच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन सनातन संस्कृतीचा ध्वज फडकवायला हवा, असे आवाहन श्रीक्षेत्र बेट कोपरगांव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज समाधी मंदिराचे पू. रमेशगिरी महाराज यांनी या वेळी केले.
या प्रंसगी मंदिर अभ्यासक श्री. संदीप सिंह म्हणाले, ‘‘मंदिर हे उत्पन्न मिळवण्याचे साधन नाही, तर भक्तीचे केंद्र आहे, हे समजणे आवश्यक आहे. मंदिर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगभरात अनेक औद्योगिक शहरे आता लयाला जात आहेत; याऊलट भारतात उज्जैन, पाटलीपूत्र, रामेश्वरम्, काशी अशी तीर्थक्षेत्रे असलेली शहरे हजारो वर्षांपासून जीवंत आहेत; कारण ती सर्व मंदिरांच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून होती. या देशाची अर्थव्यवस्था मंदिरांमुळे उभी आहे.’’
धर्मशिक्षणासह धर्मरक्षणाचीही भूमिका मंदिरांनी घ्यावी ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
मंदिरांच्या माध्यमातून हिंदु समाजाचे जन्महिंदुपासून कर्महिंदुमध्ये रूपांतर करण्याचे महत्कार्य होते. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. त्यामुळे धर्मरक्षणाच्या संदर्भात मंदिरांमधून त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार काही कृती होणे अपेक्षित आहे. ही आधारशीला खर्या अर्थाने तेव्हाच ठरेल, जेव्हा मंदिरांमधून धर्मरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका घेतली जाईल आणि प्रबोधन केले जाईल. यापुढील काळात मंदिरांना धर्मशिक्षणाचे केंद्र बनवायचे असेल, तर धर्मशिक्षणाच्या जोडीला धर्मरक्षणाचीही भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी या वेळी केले.
उपस्थित प्रमुख मान्यवर – मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सारवकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, शिर्डी मतदारसंघाचे खासदार श्री. भाऊसाहेब वाघचौरे, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थानचे अधिवक्ता सुरेश कौदरे, माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट’चे उपाध्यक्ष श्री. तुषार कवडे, व्यवस्थापक श्री. अशोक देवराम घेगडे, जेजुरीचे विश्वस्त श्री. राजेंद्र खेडे, पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या सौ. संगिताताई ठकार आणि रांजणगावचे विश्वस्त श्री. तुषार पाटील
या प्रसंगी शिर्डी मतदारसंघाचे खासदार श्री. भाऊसाहेब वाघचौरे म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षात मी ५५० हून अधिक मंदिरांचा जीर्णाेद्धार केला असून यापुढील काळात अन्यही मंदिरांचा जीर्णाेद्धार करण्याचे ठरवले आहे.’’
परिषदेतील विशेष घडामोडी : शिर्डीजवळील पुणतांबा येथे श्री महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना झाली आहे. या घटनेचा मंदिर परिषदेत निषेध करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी एकमुखाने राज्य सरकारकडे करण्यात आली.
२२ डिसेंबर
शिर्डी येथे 24 व 25 डिसेंबरला तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद
-
मंदिर सरकारीकरण, मंदिरांच्या भूमी बळकावणे, वक्फ बोर्डचे अतिक्रमण, वस्रसंहिता आदी विषयांवर चर्चा
-
मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ 1000 हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधी एकवटणार
शिर्डी (महाराष्ट्र) – आपल्या राजे-महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे संरक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्धस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले. आज मात्र भारताने ‘सेक्युलर’ वादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे केवळ मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरांचा भ्रष्टाचार, पैसे घेऊन ‘व्ही.आय.पी.’ दर्शन, मंदिरांची भूमी बळकावणे, ‘वक्फ बोर्ड’चे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण चालू आहे. अशा वेळी मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे हे हिंदु समाजाचे दायित्व आहे. एकूणच मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे, मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, दर्शनरांगांचे सुनियोजन करणे, तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यांसाठी मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, भक्त आदींचे संघटन आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ, मुंबई येथील श्री जिवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 24 आणि 25 डिसेंबर 2024 या दिवशी श्री साई पालखी निवारा, नगर-मनमाड रोड, निमगांव, शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून 1,000 हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला मालेगाव येथील श्री वैजनाथ महादेव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष निवृत्त सेना अधिकारी मेजर किसन गांगुर्डे, नाशिक गोरेराम मंदिराचे मालक श्री. दिनेश मुठे आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. प्रदीप देशमुख उपस्थित होते.
या वेळी श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘फेब्रुवारी 2023 जळगाव येथे पहिल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर ओझर, पुणे येथे दुसरी परिषद झाली. त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून दोन वर्षांच्या आत ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यात 800 हून अधिक मंदिरांमध्ये वस्रसंहिता लागू करण्यात आली आहे, तर 15 हजारांहून अधिक मंदिरांचे देशभरात संघटन झाले आहे.’’
गोरेराम मंदिराचे मालक श्री. दिनेश मुठे म्हणाले ‘‘या परिषदेला ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु जैन, स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, जय महाराष्ट्र या मराठी वृत्तवाहिनीचे संपादक श्री. प्रसाद काथे, जैन मंदिराचे श्री. गिरीश शहा, मंदिर क्षेत्रात कार्यरत डॉ. अमित थढाणी, मंदिर क्षेत्रात कार्यरत लेखक-अभ्यास श्री. संदीप सिंह, बाणगंगा ट्रस्टचे श्री. ऋत्विक औरंगाबादकर यांसह श्री अष्टविनायक मंदिरांचे विश्वस्त, महाराष्ट्रातील जोतिर्लिंग देवस्थानांचे विश्वस्त, संत पिठांचे प्रतिनिधी, अन्य मंदिरांचे विश्वस्त, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.’’
या मंदिर परिषदेत मान्यवरांचे मार्गदर्शन, मंदिरांशी निगडीत विविध विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. यामध्ये ‘मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे’, ‘मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे’, ‘वक्फ कायद्या’द्वारे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण आणि मंदिरे बळकावणे यांवर उपाय, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या परिसरात मद्य-मांस बंदी; दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार आदी विषयांवर चर्चा होणार आहे. ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी असून यामध्ये सहभागी होण्यासाठी 7020383264 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर महासंघाने केले आहे.