Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु सेवा महोत्सवा’त स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर

‘स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षण : काळाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन !

स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करतांना समितीचे कार्यकर्ते
स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करतांना समितीचे कार्यकर्ते

पुणे (महाराष्ट्र) – येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु सेवा महोत्सवा’त २१ डिसेंबर या दिवशी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. आरंभी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षण : काळाची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये ‘लव्ह जिहाद : एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र’ हा विषयही अंतर्भूत होता. त्यानंतर स्वसंरक्षण प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यामध्ये आतापर्यंत समाजामध्ये हिंदु बांधव आणि भगिनी यांवर जी प्राणघातक आक्रमणे झाली किंवा हत्येच्या घटना घडल्या, त्या घटना समोर ठेवून अशा प्रकारच्या प्रसंगांमध्ये प्रशिक्षित युवक-युवती कसा प्रतिकार करू शकतात ? हे दाखवणारे प्रसंग सादर करण्यात आले. या वेळी ३०० हून अधिक जिज्ञासूंनी याचा लाभ घेतला. या वेळी सनातनच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच ‘हिंदु सेवा संघा’चे श्री. जीवन धर्माधिकारी हेही या वेळी उपस्थित होते.

‘सव्यसाची गुरुकुलम्’चे संस्थापक आणि मुख्य आचार्य श्री. लखन जाधवगुरुजी यांना ग्रंथ भेट देतांना समितीचे श्री. कृष्णाजी पाटील

‘हिंदु आध्यात्मिक सेवा संस्थे’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गुणवंतसिंह कोठारी यांची प्रदर्शन कक्षाला सदिच्छा भेट !

हिंदु आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गुणवंतसिंह कोठारी (उजवीकडून चौथे) यांना ग्रंथ भेट देतांना समितीचे कार्यकर्ते

हिंदु आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गुणवंतसिंह कोठारी यांनी हिंदु जनजागृती समिती प्रकाशित ग्रंथ आणि धर्मशिक्षण देणार्‍या फ्लेक्स प्रदर्शन कक्षाला सदिच्छा भेट दिली. त्यांना ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ याविषयीचा हिंदी ग्रंथ भेट देण्यात आला. त्यांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिक दाखवणार्‍यांचे पुष्कळ कौतुक केले. ‘सव्यसाची गुरुकुलम्’चे संस्थापक आणि मुख्य आचार्य श्री. लखन जाधवगुरुजी यांनीही प्रदर्शन कक्षाला सदिच्छा भेट दिली. त्यांना ‘१६ संस्कार’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या प्रदर्शनाला विविध मान्यवरांनीही सदिच्छा भेटी दिल्या.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु सेवा महोत्सवा’त स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर करतांना समितीचे कार्यकर्ते
कक्षाला भेट देतांना जिज्ञासू

Related News