सातारा (महाराष्ट्र) – सध्या मनुष्याचे जीवन पुष्कळ धकाधकीचे आणि तणावपूर्ण झाले आहे. या तणावपूर्ण जीवनामध्ये आनंदाची वानवा जाणवते. आपल्याला जीवन आनंदी करायचे असेल, तर अध्यात्माला दुसरा पर्याय नाही. भगवंताचे नामस्मरण हाच आनंदी जीवनाचा भक्कम पाया आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांनी केले.
येथील मिलिटरी अपशिंगे या गावात ‘श्री भैरवनाथ देवस्थान मंदिर ट्रस्ट’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनामध्ये त्या बोलत होत्या. याचा लाभ मिलिटरी अपशिंगे आणि पंचक्रोशीतील १०० हून भाविकांनी घेतला.