कुंभक्षेत्री लावलेल्या ‘डरेंगे तो मरेंगे’ या फलकावर चालू असलेल्या टीकेचे प्रकरण
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – कुंभक्षेत्री आम्ही लावलेले फलक जागृतीपर असून ते योग्यच आहेत. हिंदूंना आम्ही जागृत करणार नाही, तर कोण करणार ?, असा प्रश्न महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीजधाम येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी उपस्थित केला. अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी आखाड्याच्या छावणीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी अखिल भारतीय श्री पंच निर्मोही आखाडा, निर्वाणी आखाडा आणि दिगंबर आखाडा, या तिन्ही वैष्णव आखाड्यांचे श्रीमहंत, महंत आदी उपस्थित होते.
प्रयागराज कुंभ में @_Jagadguru ने किया हिन्दु राष्ट्र का शंखनाद! 🚩🚩
जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज ने कह दी बड़ी बात !#PrayagrajMahakumbh#HinduRashtra #KumbhMela2025 pic.twitter.com/8XWj0MFO00— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) January 2, 2025
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी कुंभक्षेत्री ‘डरेंगे तो मरेंगे’ (घाबरलो, तर मरू), ‘सनातन सात्त्विक है, कायर नहीं’ (सनातन सात्त्विक आहे; पण घाबरट नाही) आणि ‘वक्फ के नाम पर संपत्ती की लूट है, धर्मनिरपेक्ष भारत में ये कैसी छुट है’ (वक्फच्या नावावर संपत्तीची लूट चालली आहे. धर्मनिरपेक्ष देशात ही सूट कशी दिली जात आहे ?) तसेच ‘हिंदूंनी एक व्हावे’, असे ४ फलक लावले होते. हे प्रयागराजच नव्हे, तर संपूर्ण उत्तरप्रदेशमध्ये चर्चेचा विषय ठरले. काहींनी त्यावर टीका करत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यानुसार महाराजांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज पुढे म्हणाले,
१. फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदूंची लोकसंख्या सातत्याने घटत आहे. सध्या बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार संपूर्ण जग पहात आहे. खरेतर बांगलादेशाचा वाद राजकीय आहे; परंतु तेथे जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य केले जात आहे.
२. काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंना विस्थापित केले गेले. ते आजही विस्थापित आहेत.
३. दुसरीकडे मंदिरे पाडून मशिदी बांधल्याचे सातत्याने पुढे येत आहे. अशा भयंकर परिस्थितीत आम्ही जगद्गुरु म्हणून हिंदूंना जागृत करणे आणि संघटित करणे, हे आमचे कर्तव्य आहे. तेच आम्ही या फलकांच्या माध्यमातून केले आहे.
४. हिंदूंना आम्ही जागृत करणार नाही, तर कोण करणार ? या भूतलावर मुसलमान, ख्रिस्ती आदींची स्वतंत्र राष्ट्रे आहेत; परंतु संख्येने १०० कोटी असलेल्या हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. त्यामुळे भारत हिंदु राष्ट्र झाले पाहिजे.
मंदिरे भक्तांच्याच स्वाधीन असावीत !
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज पुढे म्हणाले, ‘‘मंदिरांचे सरकारीकरण कदापि केले जाऊ नयेे; कारण ज्या विचारांचे सरकार सत्तेत येईल, त्याप्रमाणे मंदिराचा कारभार चालवला जातो. हा हिंदूंच्या श्रद्धेशी खेळ आहे. त्यामुळे मंदिरे ही भक्तांच्याच स्वाधीन असावीत.’’ ‘सनातन बोर्डा’च्या स्थापनेविषयी ते म्हणाले की, ‘वक्फ बोर्ड’च्या धर्तीवर ‘सनातन बोर्ड’ स्थापन करून फारसे काही साध्य होणार नाही. हिंदूंच्या समस्या सोडवण्याचे अनेक मार्ग आहेत. ते अवलंबायला हवेत. तथापि कुंभक्षेत्री होणार्या धर्मसंसदेत या विषयावर सांगोपांग चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल.’’
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची उपस्थिती !
या पत्रकार परिषदेला विविध आखाड्यांतील साधू-संतांसह हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हेही उपस्थित होते.