Menu Close

पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर हिंदु जनजागृती समितीचे साखळी आंदोलन पार पडले

बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याची मागणी नागरिकांना करावी लागणे, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! – संपादक 

साखळी आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

पुणे (महाराष्ट्र) – बांगलादेशामध्ये हिंदूंवरील आक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार, तसेच मंदिरे उद्ध्वस्त करणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ‘बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात’ या मागणीसाठी बालगंधर्व रंगमंदिराजवळील जंगली महाराज रस्त्यावर ५ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन घेण्यात आले. ‘भारत सरकारने या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवावा’, अशी मागणी या वेळी उपस्थितांनी केली.

या वेळी वारकरी संघटना, गोरक्षक, महाराष्ट्र मंदिर महासंघ, रणरागिणी शाखा आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, धर्मप्रेमी, नागरिक, वाचक, हितचिंतक असे २५० हून अधिक जण उपस्थित होते. आंदोलकांनी विविध घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन साखळी आंदोलन केले. बांगलादेशामधील हिंदूंचे रक्षण करा ! त्यांना संरक्षण द्या ! बांगलादेशी घुसखोरांना हाकला ! बांगलादेशी उत्पादनांवर बहिष्कार घाला ! बांगलादेशी हिंदूंवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी जागृत व्हावे ! अशा प्रकारच्या अनेक घोषणा लिहून हातात घेतलेले फलक अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. बांगलादेशामधील ही परिस्थिती भारतात येण्यास वेळ लागणार नाही; म्हणून सरकारने कठोर पावले उचलून निर्णायक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. जिल्हाधिकार्‍यांना वरील विषयासंदर्भात निवेदन देण्यात येणार असून यासाठी स्वाक्षर्‍यांची मोहीमही राबवण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

Related News