समस्त हिंदु आघाडीच्या वतीने उज्ज्वला गौड यांच्या नेतृत्वाखाली अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित !
- धर्मांधतेच्या विरोधात समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता आणि साहस कौतुकास्पद आहे !
- सर्वत्रच्या हिंदूंनी सतर्क राहून आपापल्या भागामध्ये धर्मांध असे काही करत नाहीत ना ? याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे ! – संपादक
पुणे (महाराष्ट्र) – येथील प्रसिद्ध नानावाडाच्या जवळ असलेल्या वसंत सिनेमा येथील पाठीमागे ३ थडगी बांधून ते अतिक्रमण केले गेले होते. पुण्यातील समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. त्या ठिकाणी दत्त मंदिर असतांनाही थडगी बांधण्यात आली होती. यानंतर ६ जानेवारीला समस्त हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून ही थडगी हटवली. या वेळी समस्त हिंदु आघाडीच्या वतीने उज्ज्वला गौड यांच्या नेतृत्वाखाली अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
🚨 Action Against Illegal Encroachments 🚨
🔸 Three illegal structures covered with chaadars near Datta Mandir, Pune, were dismantled by Hindu activists led by @GoudUjwala of Samasta Hindu Aghadi.
🔹 “We won’t tolerate desecration of temples!” – Ujjwala Gawde
💪 Activists… pic.twitter.com/fTZL0FbKS6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 7, 2025
वक्फ बोर्डाचा उद्दामपणा खपवून घेणार नाही ! – उज्ज्वला गौड
प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना उज्ज्वला गौड म्हणाल्या, ‘‘एकीकडे देशामध्ये वक्फ बोर्डाचा गंभीर प्रश्न सतावत आहे आणि या ठिकाणी गल्लोगल्ली चादरी टाकून थडगी बांधून भूमी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशीच अनधिकृत ३ थडगी वसंत सिनेमाच्या मागे बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले. यानंतर समस्त हिंदु आघाडीच्या बांधवांनी घटनास्थळी उपस्थित होत थडगी उद्ध्वस्त केल्या. हे लोक ज्याठिकाणी चादरी टाकतात त्या ठिकाणाला वक्फ बोर्ड दावा ठोकल्याविना रहात नाही. वक्फ बोर्डाचा उद्दामपणा आम्ही खपवून घेणार नाही. इथून पुढे जर असे काही दिसून आले, तरी ते उद्ध्वस्त करून टाकू. हा हिंदुस्थान साधूसंतांचा आहे. ज्याठिकाणी तुम्ही खोदकाम कराल, त्याठिकाणी केवळ ‘शिवलिंग’ सापडेल.’’ (अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठ हिंदूंची मंदिरे आणि पवित्र स्थानांवर होणार्या अतिक्रमणासाठी सतर्क रहातील, तर हिंदूंची मंदिरे सुरक्षित रहातील, हे नक्की ! – संपादक)
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात