Menu Close

आव्हानी (जिल्हा जळगाव) येथे ‘हिंदु राष्ट्र आव्हानी’ फलकाचे अनावरण !

‘हिंदु राष्ट्र आव्हानी’ फलकाचे अनावरण करतांना हिंदुत्वनिष्ठ

जळगाव (महाराष्ट्र) – जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील आव्हानी गाव ‘हिंदु राष्ट्र’ आहे, अशा आशयाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा संघटक श्री. यशवंत चौधरी, श्री. विनोद शिंदे, श्री. निखिल कदम, तसेच गावातील सरपंच श्री. जानकीराम दामोदर पाटील, उपसरपंच श्री. दिलीप दगा पाटील, श्री. ईश्वर भिल, गावातील अन्य प्रतिष्ठित उपस्थित होते. गावातील जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. ‘हिंदु राष्ट्र’ या ध्येयाने जिल्ह्यातील युवक प्रेरित होत असून हिंदु धर्माप्रती निष्ठा त्यांच्यात दिसून येत आहे.

Related News