नाशिक (महाराष्ट्र) – हिंदु धर्मकर्तव्य बजावत असतांना हिंदुत्वनिष्ठांवर ओढावलेल्या संकटातील प्रत्येक न्यायालयीन लढाईत हिंदु समाजातील प्रत्येक घटकाला निःस्वार्थपणे साहाय्य करणारे, हिंदूंचे संकटमोचक अधिवक्ता श्री. मिलिंद कुरकुटे यांचा सन्मान सकल हिंदु समाज, नाशिक, तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात आला. हा सन्मान सोहळा हिंदु जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या वेळी शहरातील असंख्य हिंदुत्वनिष्ठ बांधव उपस्थित होते.
अधिवक्ता कुरकुटे यांनी नाशिक येथील २ हिंदु भगिनींच्या वतीने न्यायालयात युक्तीवाद केला. धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यातून त्यांना बाहेर काढले आणि धर्मांधांचा जामीन फेटाळण्याच्या दृष्टीने युक्तीवाद केला.
अधिवक्ता कुरकुटे यांना शाल, श्रीफळ, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद’, ‘धर्मांतर’ हे ग्रंथ भेट देण्यात आले.