भिवंडी (महाराष्ट्र) – सर्व हिंदु महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणासह धर्मशिक्षण घेऊन लव्ह जिहादसारख्या समस्येला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हावे. आपल्या गावातील एकही युवती किंवा महिला धर्मांधांच्या षड्यंत्राला भुलणार नाही, यासाठी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळून हिंदु संस्कृतीचे आचरण केले पाहिजे. धर्मशिक्षण घेणे हाच सर्व प्रकारच्या जिहादवरील उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. दीक्षा पेंडभाजे यांनी येथे केले. भिवंडी येथील टेमघर पाडा येथे आयोजित ‘हिंदु महिला धर्मसभे’त त्या बोलत होत्या.
धर्माभिमानी ग्रामस्थ श्री. सुनील नाईक यांच्या पुढाकाराने, तसेच प्रखर धर्माभिमानी श्री. गजेंद्र गुळवी यांच्या योगदानाद्वारे सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेला १५० युवती आणि महिला उपस्थित होत्या. या प्रसंगी दुर्गावाहिनी, पनवेल प्रखंडच्या कु. प्रतीक्षा मुंबईकर यांनी अन्य मुलींसह तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यांची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित महिलांना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण शिकण्यासाठी प्रेरित केले.
महिलांनी जिजाऊंचा आदर्श ठेवावा ! – गुरुनाथ मुंबईकर, अध्यक्ष, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल, पनवेल प्रखंड
देव, देश आणि धर्म यांवर होत असलेले आघात पहाता प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक घरामध्ये माता जिजाबाई जन्माला यायला हवी. यासाठी महिला-भगिनींनी जिजाऊंचा आदर्श ठेवला पाहिजे. याच उद्देशाने ‘घर घर जिजाऊ’ हा उपक्रम चालू करण्यात आला आहे.