Menu Close

गुन्हेगारी रोखण्यासाठी बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकला – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सत्यविजय नाईक

सांखळी (गोवा) – गोव्यात हल्लीच्या काळात गुन्हेगारी, महिला आणि अल्पवयीन मुली यांवरील बलात्कार अन् ‘लव्ह जिहाद’च्या घटना आदींमध्ये वाढ झाली आहे. मंदिरांमधील चोरीच्या घटना वाढल्या आहेत. म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिरात झालेल्या चोरीच्या प्रकरणी सापडलेले आरोपी बांगलादेशी नागरिक होते. एकंदरीत गोव्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अनधिकृत वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकलून लावले पाहिजे, तसेच बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आता काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी केले. न्हावेली, सांखळी येथील श्री बेताळ देवस्थान सभामंडपात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. सत्यविजय नाईक बोलत होते. सभेला राष्ट्रीय बजरंग दलाचे श्री. सुबोध मोने व्यासपिठावर उपस्थित होते.

सभेला उपस्थित हिंदु धर्माभिमानी

या सभेला उपस्थित हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध होण्याची शपथ घेतली. सभेची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन सौ. सोनम शिरोडकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. नंदा गावस यांनी केले.

श्री लक्ष्मीनारायण देवस्थान समितीचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. प्रेमानंद गावस, सचिव श्री. चंद्रकांत गावस, न्हावेली पंचायतीच्या उपसरपंच सौ. कल्पना किशोर गावस, माजी सरपंच आणि विद्यमान पंचसदस्य श्री. कालिदास गावस, पंचसदस्य श्री. प्रसाद नाईक, माजी उपसरपंच तथा विद्यमान पंचसदस्य सौ. दिया सावंत अन् श्री लक्ष्मीनारायण देवस्थान समितिचे खजिनदार श्री. आनंद गावस यांची उपस्थिती होती. सभेला बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


क्षणचित्रे

१. न्हावेली येथील धर्माभिमानी श्री. नागेश गावस सकाळपासून सेवेत सहभागी झाले होते.

२. धर्मभिमानी श्री. आनंद गावस यांनी ध्वनीव्यवस्था आणि इतर साहित्याची सोय केल्यामुळे सभेच्या आयोजनात मोठे साहाय्य झाले.

३. सभेच्या वेळी सनातनच्या ग्रंथांना चांगला प्रतिसाद लाभला.

४. मायणी येथील कारसेवक श्री. सातू मायणीकर यांनी सभेची पूर्वतयारी, तसेच घरोघरी प्रसार करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

अल्पावधीत संघटित होण्याची सिद्धता करा ! – सुबोध मोने

मंदिरे, धर्म आणि राष्ट्र, तसेच आपल्या आयाभगिनी यांवर संकटे आल्यास त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपण अल्पावधीत एकत्रित येऊ, अशी यंत्रणा आपण सिद्ध केली पाहिजे. हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. मंदिरे आणि मठ यांना ‘लुटारू’
म्हणणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे.

Related News