प्रयागराज (उत्तरप्रदेश) – महाकुंभपर्वात कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचून हिंदु राष्ट्राचा प्रसार करण्यासाठी ‘एकही लक्ष हिन्दू राष्ट्र’, ‘सभी समस्याओं का एकमात्र समाधान हिंदु राष्ट्र हिन्दू राष्ट्र’, ‘कुंभ के संतोंकी गर्जना हिन्दू राष्ट्र’, असे मोठे फलक आणि भव्य होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. संत, भाविक आणि प्रसिद्धीमाध्यमे यांतूनच्यात या फलकांविषयी चर्चा चालू झाली आहे. या द्वारे हिंदु राष्ट्राविषयी जागृती निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी ‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीने कुंभनगरीत लावलेल्या एका भव्य होर्डिंग्जविषयी ‘कुंभनगरीत संतांचे हिंदु राष्ट्राविषयी आवाहन’, या मथळ्याखाली वृत्त प्रसारित करून लोकांची मते जाणून घेतली. या वेळी उपस्थित लोकांनी ‘होय हिंदु राष्ट्र हवेच !’, ‘हिंदु राष्ट्र आवश्यक आहे !’, अशा प्रतिक्रिया उत्स्फूर्तपणे दिल्या.