हिंदु जनजागृती समितीकडून महाकुंभपर्वात भेट
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – हिंदु धर्मावरील मंदिर सरकारीकरण, घटती हिंदू लोकसंख्या, वक्फ बोर्ड, बांगलादेशी घुसखोरी आदी आघातांविषयी हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे मत विश्व हिंदु परिषदेचे संघटन महामंत्री श्री. मिलिंद परांडे यांनी व्यक्त केले. हिंदु धर्मावर आलेली ही गंभीर परिस्थिती पालटण्यासाठी सर्वांनी मिळून कार्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
प्रयागराज येथे विहिंपच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, समितीचे श्री. सतीश सोनार आणि श्री. राजेश उमराणी उपस्थित होते.